रात्र जागताना

Submitted by sarveshithech on 26 July, 2009 - 05:02

दिवस वाहतो तुज सवे, पण चंद्र तो सरेना,
मनाची ही घालमेल मला उमजेना,
ही रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!

केल्या सर्व शर्था आता मार्ग सापडेना,
कोकिलेच्या सादे वरी नभ बरसेना,
ताणलेल्या डोळ्या मधुनी झोप डोकवेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!

आठवणी तुझ्या उशाशी निशिगंध दरवळलेला,
एक एक पाकळी जशी ही रंग मावळतीचा,
मख्मली बिछाना तरी मन करमेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!

नक्षत्रानी भरली ओंजळ सडा तो फुलांचा,
तुज साठी किती करू पण मन हे भरेना,
पाना वरल्या दवा परी ते क्षण वेचताना !!
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!

श्वासा परी स्पन्दने जशी ही, जीव गुंतला तुझ्याच पाशी,
जड झाले भावनांचे ओझे मला पेलवेना, पापण्यातला ओलावा का तुला दिसेना,
रात्र जागताना तुझे स्वप्न वेचीताना ! रात्र जागताना !!

गुलमोहर: 

वाह!!!! सुंदर. ...रात्र जागताना

_

छान आहे कविता Happy

पण एक छोटीशी शंका "अगदी सॉलीड छान कविता आहे. प्रेमात पड्लास कि काय
रवि" हि प्रतिक्रिया तुम्ही तुम्हालाच का दिल्येत. हि कविता कोणा रवि/वी ची आहे कि सर्वेषची?

कवीता छान आहे.
<<<अगदी सॉलीड छान कविता आहे. प्रेमात पड्लास कि काय .रवि>>> स्वतःचा स्वतःला दिलेला प्रतिसाद पण.

अगदी सॉलीड छान कविता आहे. प्रेमात पड्लास कि काय
- रवि

हा प्रतिसाद मझ्या मित्रनि माझ्याच सदस्य खात्यातुन दिला आहे म्हणुन हा सगळा घोळ.....