कंटोळी (कर्टुल, रान भाजी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2009 - 03:17
kantolyachi bhaji
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ जुड्या कंटोळी (उभी चिरुन, धुवुन)
२ कांदे
१ टोमॅटो
अर्धा चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता
थोडे हिंग
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
ओल खोबर पाव वाटी (खवुन)
२ चमचे तेल
चवि पुरते मिठ

क्रमवार पाककृती: 

प्रथम तेलात वरील फोडणी घालावी व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. कांदा शिजला की त्यावर आल लसुण वाटणाची पेस्त घालावी. थोड परतून त्यात हिंग, हळद, मसाला घालावा. जरा परतवुन त्यावर चिरलेली कंटोळी घालावीत. परतवुन ही भाजी वाफेवर (झाकणावर पाणी ठेउन) शिजवावी. शिजली की त्यात टोमॅटो चिरुन घालावा, मिठ घालावे. परत थोडावेळ शिजत ठेवावे. आता भाजी शिजली की त्यात ओल खोबर घालून परतवून गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

kantoli.jpg
ह्या भाजीत बटाटा ही घालता येतो. तसच कंटोळी कडधान्यात घालता येतात. आमटीत घालता येतात. पिवळी कंटोळी जुन असतात. जर आतुन लालसर झाली असतील तर घेउ नये.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा कंटोळ्यांचा फोटो आहे.
SDC10357.jpg

हा तयार भाजीचा फोटो.
SDC10365.jpg

वाह! माझी आवडती. Happy
आमच्याकडे 'काटेली' म्हणतात. प्रकाशचित्र टाकलेत हे छानच.

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

जागु, मस्तच गं.. पण इथे अशी नाजुक कोवळी कंटोळी दिसत नाहीत. अगदी जाडजुड दिसतात. देव जाणे कंटोळीच की दुसरे काही कंटोळीच्या नावाने खपवतात.

जास्तीचे तेल टाकुन त्यात जिरेमोहरीहिंग फोडणी वर लाल मिरची पुड टाकुन मग कंटोळीचे गोल काप टाकुन परतुन कंटोळी कुरकुरीत करुनही छान लागते.

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

आहाहा जागु , काय मस्त आठवण करुन दिलीस ग! माझी फेव. भाजी आहे ही. आणि आईच्या
हातच्या भाजीला काय चव असते!

याच्या गोल चकत्या करून हळद तिखट हिंग आमचूर मीठ लावून रव्यात घोळून शॅलो फ्राय करायच्या. एकदम यम्मी....

अरे वा शोनू तुम्ही छान रेसिपी दिलीत. उद्या करुनच बघते.

माझी प्रतिक्रिया कुठे गेली ?
हि भाजी रानात आपोआप उगवते. पण कातकरी लोभाने अगदि कोवळी तोडतात. साधारण छोट्या लिंबाएवढी फळे असतील तर भाजी नीट करता येते.
पिकलेल्या फळांच्या बिया सुकवून ठेवून पुढच्या वर्षी पेरुन बघायला हव्या ( माझा प्रयोग यशस्वी झाला नव्हता )
गुजराथी लोकात ही भाजी फार लोकप्रिय झाल्याने याची एक हायब्रीड जात बाजारात आली. ( साधना म्हणतेय ती ) ती चवीला बरी लागतात, पण अस्सलाची चव नाही येत.

दिनेशदा - ह्या बिया वाळवल्या नाहीत तरी चालतात. पावसाळ्यात ही लाल झालेली कंटोळी जर एखाद्या ठिकाणी टाकली की त्याची त्या जागी रोपे उगवतात.

हो, माझी बहुतेक चूक झाली ती मी या बिया वर्षभर फ्रीजमधे ठेवल्या !!!

धन्स सावली.
शोभना भरल्या वांग्यासारखी केली तरी जास्त शिजवावी लागत असेल ना. कारण ही शिजायला थोडा वेळच लागतो.

आमच्या बेळगावकडे याला फागल म्हनतात.

आंबोलीलाही फागला म्हणुनच ओळखली जाते ही भाजी.. पण करतात मात्र फक्त मिरची टाकुन. आंबोलीच्या पाण्यालाच अशी अप्रतिम चव आहे की भाज्या अग्दी साध्या नुसती मिरची टाकुन करतात पण अतिशय चविष्ट लागतात.. इथे ढिगभर मसाले घालुनही ती चव येत नाही...

साधना अग काळ्या मातीपेक्षा लाल मातीतल्या भाज्या फळांना वेगळिच चव असते.
इथेही तसच आहे. डोंगराळ भागातील भाज्यांची चव आणि माळरानातील भाज्यांच्या चवीमध्ये फरक पडतो. लाल मातीतल्या भाज्या बिनखतानेही चांगल्या वाढतात. पण माळरानातील भाज्यांना खतांची गरज लागते. आणि हल्ली बिझनेस म्हणुन भरपुर खतांचा वापर केला जातो. त्यामूळे भाज्यांना पुर्वीची चव राहीली नाही. पण डोंगराळ भाज्यांना अजुन चांगली चव असते.

आजच कै. लक्ष्मीबाई धुरंधर ह्यांचं एक जुनं पाकृ चं पुस्तक माझ्या हाती पडलंय! त्यात कंटूर्लीच्या भाजीच्या तीन पाकृ दिल्या आहेत. मला ते नाव वाचल्यावर तुझीच आठवण झाली जागू! Happy
त्या पाकृ इथे देत आहे!

पाकृ १.

साहित्य : ५०० ग्रॅ कांटोळी, १ कि. कांदा, अर्ध्या नारळाचे दूध, मीठ, तिखट, हळद, जिरेपूड, ओले वाटाणे २५० ग्रॅ., १ टीस्पू साखर/ गूळ.

कांटोळी चिरून अर्धा च. मीठ चोळून त्यातील पाणी चिरून घ्या. कांदा बारीक चिरा. हिंगाची फोडणी करून कांटोळी परतून घ्या. चिरलेला कांदा व बाकीचे पदार्थ चुरून कांटोळ्यात टाकून चांगले शिजू द्यावेत. शिजल्यावर साखर/ गूळ घाला.

पाकृ २.

साहित्य : ५०० ग्रॅ. कंटोळी, १०० ग्रॅ. भिजवलेली चणा डाळ, १ टीस्पू मीठ, हळद, तिखट, १ टीस्पू सांबार मसाला/ काळा मसाला, अर्ध्या नारळाचे दूध.

कांटोळी जाड चिरून घ्यावी. १टीस्पू तेलाची हिंग घालून फोडणी करा, त्यात कांटोळी व चणाडाळ घालून परता. नन्तर इतर वस्तू व नारळाचे दूध घालून ढवळावे. शिजण्यापुरते पाणी घालून शिजल्यावर वाढावी.

पाकृ ३, मसाल्याची कांटोळी :

साहित्य : १ कि. कांटोळी, ५ कांदे, १२ सुक्या मिरच्या, १ भाजलेले हळदीचे कुडे, पाव वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस, २५ ग्रॅ धणे, १ दालचिनीचा तुकडा, ६ लवंगा, ६ वेलदोडे, २ टीस्पू सांबार मसाला, १ चमचा जिरे, २० लसूण पाकळ्या सोलून, १ कोथिंबीर जुडी, हिंग, मीठ.

कांटोळी पुरण भरण्यासारखी चिरावी. दोन कांदे भाजावेत. ३ कांदे चिरावेत. भाजलेल्या कांद्यासोबत इतर सर्व वस्तू बारीक वाटाव्यात व हे मिश्रण कांटोळ्यात भरावे. हिंगाची फोडणी करून त्यात चिरलेला कांदा खरपूस परता. कांटोळी घालावीत व शिजण्यापुरते पाणी घालून शिजवावी.

सगळ्याच पाकृ छान. अरुंधती मसाल्यावाली जास्त आवडली पाकृ. धन्यवाद.
पहिल्या पाकृ मध्ये तुम्ही १ कि. कांदा लिहील आहे. चुकुन झालय का ते ?

जागू, त्या पुस्तकात तसंच लिहिलंय गं! मी कॉपी टू कॉपी, माशी टू माशी लिहिलंय, आता खात्री करून घेतली....:अओ: कदाचित प्रिंटिंग मिष्टेक असेल.... आपल्या अंदाजाने कांदे घ्यायचे मग, दुसरं काय!

अग १ किलो कांदे म्हणजे कांद्याचीच भाजी झाली. ती प्रिंटींग मिस्टेक असेल.

इकडे खान्देशात ही भाजी "कटूर्ले" या नावाने ओळखली जाते. पावसाळ्यात बाजारात आली, की नुस्त्या ऊड्या पडतात ! खान्देशात शेंगदाणे + हिरवी मिरची यांचे वाटण लावून रस्साभाजी करतात. पण, नुस्त्या काच-या करून कांद्या बरोबर परतून करतात तशी भाजी मला जास्त आवडते! यम्मी !

महिन्यापुर्वि मालवन ल चिवला बिच जवल मि हि भाजि पाहिलि (उगवलेलि) . पाकृ अधि वाचली अस्ति तर नक्कि तोडुन आनलि असति!

जागू ताई मस्त रेसिपी!!
आम्ही याला कर्टुले म्हणतो!! आता करुन बघीन!
@मेधा
>>याच्या गोल चकत्या करून हळद तिखट हिंग आमचूर मीठ लावून रव्यात घोळून शॅलो फ्राय करायच्या.
हे करतांना बीया काढून टाकायच्या का??
@अकु,
>>आजच कै. लक्ष्मीबाई धुरंधर ह्यांचं एक जुनं पाकृ चं पुस्तक माझ्या हाती पडलंय!
मी प्रत्येक वेळेस हेच वाचते!! आता तु माझ्यासाठी एक झेरॉक्स काढ ना त्याची!! Happy Proud
म्हनजे बरं कि नाही!!

गिरिश, होमो, रोचिन धन्यवाद.
ही भाजी आत्ता सापडण कढीण आहे. जुलै ऑगस्टमध्ये भरपुर असतात कंटोळी.

छान रेसिपी! विरार भागात याला कंटवली असे म्हणतात. मुंबईत (दादरला) जरा महाग विकतात वसईच्या भाजीवाल्या! मस्त चव असते या भाजीची! Happy

अस्सल जंगली कंटोळी [दिनेशदानी न्हटल्याप्रमाणे लहान , हिरवी] तीन्-चार पावसाळी महिन्याच्या मोसमातच मुंबईत मिळतात, असा माझा अनुभव आहे. इतर वेळी मिळणार्‍या मोठ्या फळाच्या जातीला खास चव व स्वाद नसतो. कोंकणात सर्वसाधारणपणे हिरवी मिरची-कांदा वापरूनच ही भाजी करतात पण वर दिलेल्या रेसिपी अधिक मोहक वाटताहेत !

भाउ हल्ली काही जाड मोठी कंटोळी येतात बाजारात पण ती संकरीत केलेली असतात. त्याला त्या रानातल्या कंटोळिंची चव नसते.

Pages