सूर्यास्त

Submitted by पाटील on 2 January, 2008 - 12:39

एकदम 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या' निघालय......, रे अजय!

धन्यवाद दाद. मी ईथे येका प्रकाशचित्रावर प्रतिक्रिया लिहताना सूर्यास्ताच्या एक्स्पोजर च्या तंत्राबद्दल लिहले होते.१ जानेवारिला निर्मळ, वसई जवळ कळंब गावी जायचा योग आला.तिथेच हे तंत्र परत वापरुन बघितले

आहे एकदम. Happy
आवडल मला.

सुर्यास्त खुपच छान आलायं... समुद्राचं पाणी काळं कसं काय बर केलंत? म्हणजे एखाद्या software च्या मदतीने कि फक्त योग्य कोन मिळाल्यामुळे ते तस दिसतयं? generally संध्याकाळी पाणी लाल - केशरी दिसतं ना?

नाही . प्रकाशचित्राची चौकट सोडली तर काही चित्र संपादन केलेले नाहिये.जर लाल केशरि रंग हवा असता तर तसेही एक्स्पोज करता आले असते पण परावर्तीत सूर्याची झळाली मिळाली नसती.

अजय,

मस्त टिपलाय सुर्यास्त! फोटो पाहुन nostalgic झालो Happy पाचूबंदर, कळंब, रानगाव, राजोडी, अर्नाळ्याच्या समुद्रकिनार्‍यांनी एकेकाळी आमचे weekends फुलवले Happy

हा अख्खा परिसरच सुंदर आहे. वसई , केळवे आणि बोर्डि नावापुरते पर्यटनाच्या नकाशावर आहे पण मुंबई जवळ असुनही बाकिचा भाग तसा दुर्लक्षीत.

आमच्या लहानपणापासुन शासनाने केलेली एकमेव सुधारणा म्हणजे सुरुच्या झाडांची लागवड, ती पण किती शिल्लक आहेत देवजाणे Happy तुझ्याकडे चिंचोटीच्या धबधब्याचे फोटो असतील तर जरुर टाक. आणि तिथे कधी गेला नसशील तर श्रावणात जरुर जा. तुझी फेरी वाया जाणार नाही ह्याची पुरेपूर हमी Happy