" कल्पतरु " भाग - १

Submitted by yogitasawant on 7 July, 2009 - 03:18

" स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" अस म्हटलं जात हे अगदी त्रिवार सत्य आहे. " आई" शिवाय जीवन म्हणजे " आत्म्या शिवाय शरीरा" प्रमाणे आहे. जीवनाला महत्त्व प्राप्त होते ते फ़क्त आईमुळेच . कारण तीच मुलाला नऊ महीने आपल्या पोटात वाढवते. त्याच्या जन्म कळा हसत हसत स्वीकारते. त्याला भरवते , संभाळते, शिकवते, मूल लहानच मोठ होई पर्यंत आणि मोठ झाल्यावरही त्याची कळजी घेत असते. किंबहुना अस म्हटलं तरी चालेल की आई आपल्या मुलाला तळ हाताच्या फोड़ा सारख जपते. ती वासल्यरूपी छाया असते. मायेचं छत्र ज्या छत्राखाली आल्यावर कश्याकश्याचीच भीती वाटत नाही. आई म्हणजे सर्वस्व असते.

असा हा आई शब्द सगळयाच्या मुखात असतो पण त्याचवेळी अस सांगावस वाटते की , आई या शब्दा बरोबरच येणारा तेवढाच महत्वाचा शब्द " बाबा" हा कधी कधी विस्मरणात जातो. बाप ही व्यक्तिरेखाच अशी आहे की, त्यात फ़क्त तापटपणाच जाणवतो. प्रेम, माया ही फ़क्त आईच्याच कुशीत मिळते हा सर्वसामान्य दृष्टिकोन. पण कधी पाहिलात का ? जर मूल आजारी आहे किवा त्याला कुठे लागले तर आई इतकचं बाबाचं मनपण कासाविस होत. आई आपली कळजी रडून व्यक्त करते पण वडिल ह्या पद्धतीने कळजी व्यक्त करू शकत नाहीत कारण आपल्या समाजात पुरुषांच्या डोळ्यात अश्रु येण दुबलेपणाचं लक्षण मानलं जात. त्यामुळे वडीलांच दुःख आतल्याआत कोंडून राहत. आपल्यालाही ते जाणवत नाही. कळजीपोटी रडणारी आई पुढ्यात दिसते म्हणुन ती अधिक जवळची वाटते पण संकटाच्या त्या घडिलाही स्थितप्रज्ञ असणारे वडीलांना मात्र दुर्लक्षित केल जात. वडिल घरात असले ना की घराला घरपण असत, शिस्त असते, एक आदरयुक्त भीतीही मनात असते. नि जोडीला आईचे संस्कार असतात त्यामुळे सहजासहजी मुले वाईट प्रवृत्तिकड़े वळत नाहित.

पण कही जणांना त्यांची कीमत नसते. अहो, अस सांगुन कुणाला काही कळायच नाही. ज्यांना वडिलांचा सहवास मिळत नाही ना त्याना विचारा " बाबा" हा शब्द उचारला किवा ऐकला तर त्यांची काय अवस्था होते ती. अर्थात माझ माझ्या वडिलांवर प्रेम आहे पण तरीही ह्या नात्याचा, ह्या शब्दाचा मितार्थ कलला ह्या अवस्थेची जाणीव झाली ती " मिताला " भेटून.

गुलमोहर: 

हाय, हलो, आमच्या एकटे पालक बीबी वर टाका ना हे. मला पण हेच सान्गायचे आहे. गोष्ट कुठे आहे? पोस्टा ती पण.

नमस्कार्. सुप्रभात.....
खरच तुमचे लेखन सुरेख तर आहेच पण विचार करायला लावते.
या लेखनावर आधारीत माझ्याकडे (बाबा महाराज सातारकर )या॑चे प्रवचन आहे
तुम्हाला येकायचे असल्यास मी पाटविन. तुमचा आयडि असल्यास पाटवा.

धन्य वा द........
मी खुप खुप आपला आभारी आहे.