आपण अजुन कशाची वाट पहात आहोत ?

Submitted by arjun1988 on 5 July, 2009 - 12:08

कदाचित ह्या सदरामधे हा लेख चुकीचा वाटेल. पण मला राहवत नाही कि, लोक शायनीचा मोलकर्णीबद्दल इतके अनास्था का दाखवत आहेत? रोज काहीनाकाही कारणामुळे मराठयी माणसाची अस्मीता दुखावली म्हणुन सर्वसामान्य माणसास वेठीस धरणारे प़क्ष, आचरटासारखी गुलाबी चड्डा भेट पाठ्वणारया महिला संघटना, ह्यानां तीला जाहीर पाठिंबा द्यावा असे का वाटत नाही ?
आज जर शायनी कोर्टात केस हरला तर तो उद्या उच्च न्यायलयात जाईल , तिथे हरला तर सर्वोच्च न्यायलयात जाईल . एक सर्व सामान्य घरातील मुलगी कुठपर्यत लद्या देईल . तीला मानसिक आणि गरज पडेल तर आर्थिक बल देणे आपले सामजिक कर्तव्य आहे.

निदान शायनीचा चित्रपट, मालीकांवर बहिष्कार टाकुन आपण आपला निषेध नोदंऊ शकतो.

जर मुंबईत ए़खाद्या पिडीत मुलिची ही अवस्था असेल तर इतर भागात काय स्थीती होत असेल आणि ह्यात काय फक्त कायद्याचाच दोष आहे? आपली काहिच जबाबदारी नाही?
जेव्हा सलमान खानने गाडीखाली लोकांना चिरडले, तेव्हा आपण शांत राहिलो ,उलट त्याला पहाण्यासाठी लोकांनी न्यायलयात गर्दी केली.देशद्रोहाचा आरोपामुळे अटक झालेल्या संजय दत्तची दैनंदिनी वर्तमान पत्रानी छापली.
ह्या असल्या लाडांमुळे ही बाळे अजुनच माजत आहेत. त्याना ठिकाणावर आणण्यासाठी , आपल्या मुलीबाळींचा भवितव्यासाठी ,त्या मुलीला न्याय मिळणे आवश्यक आहे.

गुलमोहर: 

त्या मुलीला न्याय मिळणे आवश्यक आहे
>>> बरोबर आहे. पण त्याचबरोबर न्यायालयाने अजून निकाल न दिल्यमुळे कुणावर न्याय झाला आणि कुणावर अन्याय हे आपण बोलू शकत नाही. तसेच इथे चर्चा करूनही फारसे काही निष्पन्न होईल असे वाट्त नाही.

तुम्हाला जर त्या मुलीला मदत करायची खरोखर इच्छा असेल तर कळवा. मुलीचे काँटॅक्ट डिटेल्स मी तुम्हला देऊ शकेन. तुम्ही वाटल्यास त्या मुलीला कायदेशीर अथवा आर्थिक मदत करू शकाल.
--------------
नंदिनी
--------------

मी मायबोलीबरोबरच म. टा. , लोकसत्ता, सकाळलासुद्द्दा मेल केले आहे. मला तरी हाच मार्ग योग्य वाट्तोय ,तुम्हाला दुसरा ह्यापेक्षा चांगला मार्ग सुचत असेल तर प्लीज सांगा. शेवटी तिला आताच लोकांनी पाठिंबा दयावा असे मला वाटते. कदाचित न्यायलयाचा निर्णय लागेल तेव्हा वेळ निघुन गेली असेल.........
प्लीज,मला माझ्या आय्.डिवर त्या मुलीचे डितेल्स मेल करा

जोवर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोवर पिडीत मुलीचे तपशील असे उघड करणं, उघडपणे मागणं हे कायद्याला धरून नाही. पिडीत मुलीची प्रायव्हसी महत्वाची असे आपला कायदा मानतो आणि तो आपण सगळ्यांनी मानूया.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

शायनीला जामीन मिळाला...आता कितीही दिवस केस चालली तरी त्याला फरक पडणार नाही. प्रकरण आता लोक विसरुनही जातील.कदाचित वैतागुन ती मुलगीच केस मागे घेईल. थोड्या दीवसांनी लोक परत शायनीचा अभिनयाविषयी चर्चा करु लागतील्.आपल्या न्यायव्यवस्तेत जामीन हि खुप मोठी पळवाट आहे. अगदी हत्येसारख्या आरोपामधेही जामीन मिळु शकतो.आणि आरोपी सहज कैदैबाहेर फीरु शकतो.देशद्रोहाचा आरोप असुन संजय दत्त जेलबाहेर आहे, आणि सलमान खानने गाडीखाली लोकांना चिरडले आणि आता त्या केसचा काही मागमुसही नाही.आपल्याकडे न्याय यंत्रणेला पीडित व्यक्तिपेक्शा आरोपीची जास्त काऴजी वाटते.आरोपीना खाजगी उपचार घेण्यावरही नियंत्रण हवे. कारण अटक झाल्याझाल्या आरोपींचा छातीत दुखु लागते........