प्रिटी वूमन - भाग ८

Submitted by sunilt on 4 July, 2009 - 05:19

मागील भाग -
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
भाग ५
भाग ६
भाग ७

"मी विचार करून एक-दोन दिवसात सांगते", मर्जिना म्हणाली.

"ठीक आहे पण जरा लवकर. फक्त बारा टेबलं आहेत, सांगितलय ना मी तुला? शेठ त्यापेक्षा जास्त मुलींना ठेवणार नाही", मायाने सूचक इशारा दिला.

"बरं. बघते आणि कळवते लवकरच", मर्जिना उत्तरली.

माया हीदेखिल मर्जिनाच्याच हॉटेलातील एक डान्सर. नृत्य काही फार चांगले करीत होती, असे नाही. दिसायलाही अशीतशीच. पण आवाज मात्र चांगला होता. बर्‍याच हॉटेलांनी, डान्स बंद झाल्यावर ऑर्केस्ट्रा बार सुरू केले आणि त्यातल्याच एका बारमध्ये माया लागली, गायिका म्हणून!

त्याच हॉटेलने पुढे पुरुष वेटर कमी करून मुलींना वेटर म्हणून ठेवायचा घाट घातला होता. त्यामुळेच डान्सबार बंद होऊन चार महिने झाले तरी घरीच बसणार्‍या मर्जिनासाठी मायाने हा प्रस्ताव आणला होता.

"लेकिन कोई गलत काम तो नही होता है ना वहां?", मर्जिनाने शंका काढली.

"अग, तसं असतं तर मी तुला सांगितलं असतं का? मला काय माहित नाही तुझ्याबद्दल?"

"बरं मी निघते आता आणि सांगते तुला लवकरच"

"उद्याच सांग. नाहीतर शेठ ठेवेल दुसरीला. एकच तर जागा रिकामी आहे"

"ठीक आहे"

मायाच्या घरून मर्जिना निघाली ती विचार करीतच.

प्रस्तावात काही वाईट दिसत नव्हतं. आणि खरोखरच माया म्हणते तसे गैरप्रकार होत नसतील तर काय हरकत आहे? संध्याकाळी सहाच्या सुमाराला जायचे ते दीड वाजता हॉटेल बंद होई पर्यंत. गिर्‍हाईकांना दारू आणून द्यायची आणि टेबलाजवळच उभे राहायचे. बील भरताना ते जी टीप ठेवतील ती आपली. रोजचे शंभर रुपये शेठला एन्ट्री फी म्हणून दिले की उरलेले आपलेच. डान्सबारमध्ये शेठ चाळीस टक्के कापून घेत असे, इथे तसे नाही.

विचारांच्या तंद्रीत ती जात होती.

"काजल, काजल"

हाक ऐकू आली तशी मर्जिना थांबली. पलिकडून स्वीटी हाक मारीत होती. रस्ता ओलांडून स्वीटी काजलकडे आली.

"कुठे निघालीस एवढ्या तंद्रीत", स्वीटीने विचारले.

"कुठे म्हणजे काय? घरी. आणि काय गं, आहेस कुठे? बरेच दिवसांनी दिसतेयस?"

"बरेच कुठले, परवाच नाही का तुला हात केला होता वर्तक नगरच्या नाक्यावर? हाच तर सूट घातला होतास तू. नाही का?", स्वीटी काहीशा छ्द्मीपणाने हसत म्हणाली.

"हं. बरं मी जरा घाईत आहे. निघते", असे म्हणून तिला टाळून मर्जिना घरी जाऊ लागली.

खरंच, चार महिन्यात एकही नवा कपडा घेतला नव्हता. ईदला घेतला होता तेव्हढाच. शौक करायला पैसे होतेच कुठे? साठवलेले केव्हाच संपले होते. मोठ्या हौसेने केलेले दागिनेही एक-एक करून मोडले जात होते. स्वीटीचं काय जातयं थट्टा करायला?

तिला गेल्या वर्षीची ३१ डिसेंबरची रात्र आठवली. मुलींची आणि पर्यायाने हॉटेलचीही सर्वात जास्त कमाई करून देणारी रात्र. हॉटेलमधे सर्वात जास्त कमाई - जवळजवळ एक लाख रुपये - मर्जिनाने कमवले होते. शेठनेही एक नेकलेस भेट म्हणून दिला होता तिला त्याबद्दल, जेमतेम पंचवीस हजार कलेक्शन केलेली स्वीटी काय जळफळली होती त्यावेळी.

"बरं बाबा, घाईत असशील तर जा. आणि ऐक तो प्रवीणशेठ विचारत असतो तुझ्याबद्दल", पुन्हा एकदा स्वीटी हसत हसत म्हणाली आणि रस्ता ओलांडून पलीकडे जाऊ लागली.

विचारांच्या तंद्रीतच मर्जिनादेखिल झपाझप पावले टाकीत घराकडे निघाली.

***

"मर्जिना, तुमि कामोन आछो?", धापा टाकत घरी आलेल्या मर्जिनाच्या चेहेर्‍याकडे पाहात नजमाने विचारले.

"भालो आछी", मर्जिना म्हणाली खरी, पण नजमा मावशीचा त्यावर विश्वास बसणे शक्यच नव्हते.

काहीतरी घडलं होतं खास. तिने पिच्छाच पुरवला तेव्हा मर्जिनाने तिला मायाने सुचवलेल्या कामाबद्दल सांगितले आणि त्याहूनही अधिक म्हणजे स्वीटीच्या छद्मी हसण्याबद्दलही.

"आमि की कोरबो?", शेवटी मर्जिनाने विचारले.

"काय हरकत आहे गं? हातपाय तर हलवायलाच पाहिजेत ना?"

"ठीक आहे मग. मायाला सांगते तसं".

*******

मोठा धीर एकवटून केलेल्या त्या फोनला आता दोन महिने होऊन गेले. तेव्हा तिने ईदचे कारण देत भेटायचे टाळले. तरी पुन्हा एकदा फोन करावा काय?

तो विचार करीत होता.

काय करीत असेल ती आता? का तेव्हा भेटायचं टाळलं तिने? खरेच टाळले का? कारण ईद तर होतीच. आपण ईदनंतर लगेचच फोन केला असता तर कदाचित भेटलीही असती.

पण भेटून करणार काय? काय बोलणार तिच्याशी? तिलाच काय पण आजवर असे कुठल्याच मुलीला भेटलो नाही आणि हिच्याशी तर आपण हॉटेलातदेखिल कधी बोललो नाही. मग आता काय बोलणार?

पण नाही. तिला बघावेसे वाटतेय. तिच्याशी बोलावेसे वाटतेय. हेही तितकेच खरे.

ठीक आहे तर. करून बघू पुन्हा एकदा फोन, असा विचार करून त्याने नंबर फिरवला.

*******

नव्या हॉटेलात येते असे सांगण्यासाठी तिने मायाला फोन केला. अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत असताना तिला दुसरा एक फोन येत असल्याचा संकेत मिळाला. कुणाचा बरे फोन, असा विचार करीत तिने पाहिले, तर एक लॅन्डलाईन नंबर - अनोळखी.

वाजू दे, असे म्हणून ती पुन्हा मायाशी गप्पा मारू लागली. मधल्या काळात दोन-तीनदा त्या नंबरवरून फोन येऊन गेले.

मायाशी बोलणे झाले. आता परवापासून नवे हॉटेल आणि मुख्य म्हणजे नवे काम, जे पूर्वी कधीच केले नव्हते! कसे जमेल आपल्याला? जमेल ना नक्की? अगदी डान्सबार एवढे नाही तरी तीन-चारशे रुपये तरी मिळतातच रोजचे, असे माया म्हणत होती. तीन-चारशेही तशी काही कमी रक्कम नव्हतीच.

तेवढ्यात पुन्हा फोन वाजला. तोच नंबर.

"हॅलो", मर्जिना फोन घेत म्हणाली.

"हॅलो, काजल?", पलीकडून आवाज आला.

"हां हां काजलही बोल रही हूं? आप कौन?"

"मैं...मैं..वो..तुमको फोन किया था ना ईद के पहिले...तुमने बोला बादमे करो..."

अच्छा! तर तो आहे तर, मर्जिना मनातल्या मनात म्हणाली.

"आप है किधर? कितने दिन के बाद फोन किया?"

"हां थोडं बिझी होतो कामात?"

"अच्छा? मग आता झालास का मोकळा कामातून?"

"हां. थोडं भेटायचं होतं"

"का? काही विशेष?"

"विशेष नाही...सहजच..."

"ठीक आहे", मर्जिना गालातल्या गालात हसत म्हणाली, "कधी भेटायचं मग? आत्ता?"

"आत्ता?" तो गडबडला.

"ठीक आहे, मग उद्या?", मर्जिनाने हसू दाबत विचारले.

"च..चालेल. पण कुठे?"

"मला काय? कुठेही चालेल. तलावपाळीवर?"

"काय? त..तलावपाळी?", तो उडालाच. त्याच्या ओळखीचे किमान पंचवीस लोक तिथे नक्कीच भेटले असते, "नको, तलावपाळी नको".

"ठीक आहे मग आमच्या एरीयात ये", मर्जिनाने सुचवले, "येशील?"

"पण म्हणजे कुठे?", त्याने विचारले.

"लोकमान्य नगर. माहित आहे?"

त्याला लोकमान्य नगर फक्त ऐकून ठाऊक होते!

"मग ठाकुर कॉलेजच्या इथे चालेल?", मर्जिनाने विचारले.

"ठाकुर कॉलेज?", आता हे ठाकुर कॉलेज कुठे आले ह्यच्या विचारात तो पडला.

"मग पासपोर्ट ऑफीस?", तिने सुचवले.

"हां, हां चालेल", त्याला हायसे वाटले. एक तर त्याला पासपोर्ट ऑफीस माहित होते आणि त्यातून रविवारी सुट्टीच्या दिवशी त्याभागात त्याच्या ओळखीचे कोणी फिरकण्याची शक्यतादेखिल नव्हती!

"ठीक आहे मग. उद्या संध्याकाळी सहा वाजता"

"नक्की"

*******

"सगळे मिळून हे सात हजार झाले" लालवाणीने एक पाकिट चांदनीच्या हातात देत म्हटले.

"टॅक्सी येईलच आता तुला न्यायला", लालवाणी सांगत होता, "पुढे कधी प्रोग्राम असला तर कळवीनच"

"शुक्रीया साब", चांदनी म्हणाली.

"साब और एक बात कहनी थी...", बोलता बोलता चांदनी किंचित थांबली.

"बोलो क्या बात है?"

"साब. ते जरा माझ्या नवर्‍याच्या नोकरीचं तुम्ही बघणार होतात ना?"

"अरे हो हो, लक्षात आहे माझ्या. मी फोन करीन तुला बरं का?", तिला जवळ ओढीत लालवाणी म्हणाला.

त्याच्या केसाळ मिशा गालाला टोचल्या तशी ती शहारली. त्याचा तिच्या कमरेकडून नितंबाकडे जाणारा हात ती रोखणार तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला.

"साब टॅक्सी आली, मी जाते", त्याच्यापासून दूर होत ती म्हणाली.

"ठीक है मेरी जान. तुझ्या नवर्‍याचं लक्षात आहे माझ्या. कळवीनच", टॅक्सीचा दरवाजा बंद करीत लालवाणी बोलला.

*******

त्याला पासपोर्ट ऑफिसजवळ येऊन जवळपास पंधरा मिनिटे होऊन गेली होती पण अजून काजलचा पत्ता नव्हता. आपण जे करतोय ते बरोबर की चूक हेही त्याला कळेनासे झाले होते. आजवर कुठल्याही मुलीला तो असा भेटला नव्हताच, त्यातून ही तर बारबाला!

ती आपल्याशी खेळ तर खेळत नाही ना? काय भरवसा असल्या मुलींचा? डान्स बार बंद झाल्यापासून पेपरात काय काय छापून येतय त्यांच्या बद्दल. खरंच असणार ते!

ती कुठेतरी दूर बसून आपली मजा पाहते आहे असे त्याला अनेकदा वाटून गेले! जाणार्‍या-येणार्‍या प्रत्येक बस आणि रिक्षातील प्रवासी आपल्याकडे माना वळवून बघत आहेत, असेही त्याला जाणवू लागले! नाक्यावरचा पाणीपूरीवाला तर केव्हापासून आपल्याकडे पाहात गालातल्या गालात हसत आहे, असा भास त्याला होऊ लागला!

तिला फोन करून पहावे का? पण मोबाईलवरून फोन नको. आपला नंबर तिला कळता कामा नये. एकतर नको त्या वेळी तिने फोन केला तर पंचाईत आणि दुसरे म्हणजे, न जाणो, ती कुठल्या लफड्यात असेल आणि पोलीसांनी तिला पकडले तर त्यांना आपला नंबरही मिळेल! नकोच ती भानगड! नाही नाही मोबाईलवरून फोन नाही पण जवळपास कुठे पब्लिक फोनही दिसत नव्हता.

काय करावे बरे? निघून जावे काय? आता साडेसहा वाजले आहेत. अजून पाच-दहा मिनिटे वाट पाहू आणि नंतर निघून जाऊ असा विचार तो करणार तोच एक रिक्षा त्याच्या जवळ येऊन थांबली.

नेहेमी रंगरंगोटी केलेला चेहरा आणि घागरा चोळीत काजलला पहायची सवय असलेल्या त्याला हलकासा मेकअप आणि पंजाबी सूट मध्ये पाहून तो क्षणभर चक्रावलाच. काजलच आहे ना ती? नक्कीच तिचं हसणं तर तेच आहे की!

"सॉरी लेट झाला, रिक्षाच मिळाली नाही आमच्या इथे. पार इंदिरा नगरपर्यंत चालत यावं लागलं रिक्षासाठी"

"ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही", तो तिच्या चेहर्‍याकडे पाहात म्हणाला.

कोणी काही न ठरवता, दोघेही चेकनाक्याच्या दिशेने चालत जाऊ लागले. नक्की काय बोलायचं हे त्यालाही कळत नव्हत? काय बोलायचं असतं ह्या मुलींशी? बारमध्ये त्यांना जवळ बोलावून पैशाची उधळण करणारे लोक काय बोलत असत त्यांच्याशी? मुली तर खुदूखुदू हसताना दिसत त्यांच्याशी बोलताना! आपण काय बोलणार? खरंतर आजवर एक दहाची नोटही दिली नाही तिला!

"इथेच डावीकडे जाऊ, तलावाकडे", ती म्हणाली.

"तलाव? इथे कुठला तलाव?", त्याला कळेना.

कमानीखालून आत गेल्यावर एक विस्तीर्ण तलाव त्याच्या दृष्टीस पडला. इथेहे एक तलाव आहे हे त्याला ठाऊकच नव्हते!

फारच तुरळक माणसे तिथे उपस्थित होती. एका कठड्यावर ते बसले. तलावात एक बदक तरंगत होते.

त्याच्याकडे बोत दाखवत तो म्हणाला, "वो देखो...ब..ब..", बदकाला हिंदीत काय म्हणतात हे त्याला ठाऊकच नव्हते!

"हमारी बंगालीमें उसको राजहंस बोलते है", ती म्हणाली.

"राजहंस?", त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. नकळत तिचा हात त्याने हातात घेतला!

अगदी हाकेच्या अंतरावर चेकनाक्यावरचा कोलाहल होता पण इथे होती फक्त नि:शब्द, नीरव शांतता!

*******

घरी जाण्यासाठी चांदनीने रिक्षा आपल्या गल्लीत वळवली आणि नाक्यावरच तिला तिचा नवरा दिसला. अशाच दोन-चार उडाणटप्पूंबरोबर चकाट्या पिसताना. तिला प्रचंड संताप आला. ह्याचं माझं पोट भरावं, घरं चालावं म्हणून मी काय काय सहन करते आणि ह्याला साधे हातपाय हलवता येत नाहीत? हॉटेलातील बरेचसे वेटर लगले कुठे कुठे आणि हा मात्र बसलाय रिकामा.

रागाने थरथरच तिने घरचा दरवाजा उघडला.

*******

मर्जिना घरी आली तीच मुळी पिसासारखी हलकी होऊन! असेही कस्टमर असतात? इतके शांत आणि समजूतदार? आपल्या सगळ्या व्यथा, सगळ्या काळज्या, सगळी दु:ख आपल्याला का त्याला सांगाविशी वाटली? तिही अशा पहिल्या भेटीतच?

पण हे सगळं त्याला सांगून मन हलकं झालयं हेही खरंच. त्याच्याकडून पैशाच्या मदतीची अपेक्षा नाहीच पण एक चांगला दोस्त मिळाला, हे काय कमी आहे?

*******

अर्धी रात्र उलटून गेली तरी त्याचा डोळ्याला डोळा लागत नव्हता. काय दु:ख असतात जगात विविध माणसांना? डान्स बार बंद झाले, पैशाची आवक कमी झाली म्हणून काय त्रागा करीत होती काजल!

पण तिला हे कसं समजावं की, तारुण्य, सौंदर्य ह्या उतरत्या घसार्‍याच्या ठेवी आहेत. त्यावर फार काळ अवलंबून कसं राहता येईल? पण हे सगळं तिला समजावून सांगायलाच हवे. चाळीशीला आलेल्या तिच्या मावशीला बारमालकानेच आता येऊ नको म्हणून सांगितले होते, असे तीच सांगत होती ना?

पेपरात बारबालांबद्दल जे जे छापले जाते त्यापेक्षा किती वेगळी होती काजल! कदाचित तो अपवाददेखिल असू शकेल - तळ्यातल्या राजहंसासारखा!

******* ******* *******
(क्रमशः)

गुलमोहर: 

अजुन क्रमशः?????

~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
piapeti@gmail.com

इतके क्रमशः ????

हे वागणं बरं नव्हं Happy

ओहो!! सुखद धक्का... पावसासारखी तुम्हीपण दडी मारून बसलेलात काय? इतक्या दिवसांनी... आता क्रमशः नको...

Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

छान लिहिताय, खूप गॅप पडली, तरी फ्लो सुरेख आहे.. त्यामुळे भराभर लिहून टाका पुढचे भाग.. Happy
जऽऽराशी ताणली जातेय कथा आता..
-------------------------
God knows! (I hope..)

सुनील खुप छान प्रत्येक भाग पुढे काय होनार याची उत्सुकता लागुन राह्ते.
पण खुप वेळाने आला,
पुढचा भाग लवकर लिहा. वाट बघतोय.

जऽऽराशी ताणली जातेय कथा आता...>>>.जराशी?..........मला तर वटते खूपच ताणली जातीये....
ईतक्यी दिवसानी वाचायची... तिही ईतकीशीच्....छ्या हे काय खर न्हाय भाऊ...

मला तर वाटल की तुम्ही विसरलात, कथेचे पुडचे भाग टाकायला. खुप दिवसांपासुन वाट बघत आहे.

पुडच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत. लवकर येउ देत.

हाय सुनिल, मि आजच वाचलि तुझि कथा खुपच छान आहे, लौकर पुर्ण कर ना....

खरच मला तर कधि कधि वटात कि लेखक विसरुन तर नाहि न गेलेत आपण मायबोलिवर कथा लिहीत आहोत ते.
निदान वाचकांचा तरि विचार करवा.

काय हे अजुन क्रमशः .....

बाप रे अजुन किती वेळ वाट बघायची
पुढचा भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत....

plz.....

तुम्ही पण नन्दिनीच्या रेहान स्टोरीज सारख्या अर्धवट टाकणार काय कथा??? मॉडरेटरना विनंती, वाचकांच्या ताणलेल्या उत्सुकतांचा अंत टाळण्यासाठी पूर्ण कथा पोस्टायला सांगा ना... हे काय? कित्ती वाट बघायची... त्या ३-३ रेहानच्या सगळया कथा अर्धवट!!!

----------------------------------------------------------------------------------
Searching for guaranteed search engine optimization services at affordable rates? Your search ends here!!! Find your website on the top of popular search engines with our seo services...

Learn and Earn in USA. www.nicheducation.com, Overseas Study, Jobs, Career Courses Guidance.

आता पुन्हा सुरु होणार आहेत.
पुढिल भागाच्या प्रतिक्शेत. Happy

२००९ ते २०१३
खूप कामात आहत लेखक महाशय.
लवकर पुर्ण करा.