एक अनुभव - ग्राहक म्हणुन ...

Submitted by chaandanee on 3 July, 2009 - 05:59

आम्ही मागच्या August महिन्यात प्रभादेवी येथील Sixth Sense दुकानामधून एक Black & Decker इस्त्री ( model no. F 150 ) विकत घेतली.त्यासोबत इस्त्रीचे दोन वर्षाचे warranty card हि मिळाले होते.काही महिन्यानी वापरामुळॆ इस्त्रीच्या wire वरील कापडी आवरण सैल होऊ लागले आणि मग काही दिवसानी ते हळुहळु निघुन आतील wire उघडी पडु लागली.अशा वेळी shock लागण्याचा धोका असल्यामुळे आम्ही ती इस्त्री वापरणे बन्द केले आणि मे महिन्याच्या २५ तारखेला दुरुस्तीसाठी दुकानामध्ये दिली.तिथे company चा माणुस येऊन दुरुस्त करेल पण त्यासाठी जवळजवळ १५०/- रू. दुरुस्ती-खर्च द्यावा लागेल असे दुकानाकडुन सांगण्यात आले. सोबतचे warranty card दाखवुनही "wire खराब झाली तर दुरुस्ती-खर्च द्यावाच लागतो नवीन wire घालण्यासाठी" असे उत्तर देण्यात आले.शेवटी तो दुरुस्ती करणारा कारागिर आला की मला कळवा मी बोलिन त्याच्याशी असे सांगुन मी परत आले.
२-३ दिवसानी दुकानातून फोन आला परंतु कारागिराशी बोलणे न झाल्यामुळे मी जिथुन तो कारागिर आला होता त्या service center ला फोन केला (जे नेरूळ येथे आहे असे कळले). तेथे पुन्हा warranty card आणि दुरुस्ती-खर्चाबद्दल विचारले असता "आम्ही मोफ़त सेवा देऊ शकत नाही.का ते company ला विचारा" असे उत्तर मिळाले.मग पुन्हा त्यांच्याकडून फोन नंबर घेऊन company office जे चेंबुरला आहे असे कळले ,तिथे फोन करणे आले.तिथे फोन केला असता तिथे असलेल्या व्यक्तीने service center शी बोलुन परत माझी सगळी कर्म-कहाणी जाणून घेतली आणि दुरुस्ती-खर्च द्यावा लागेल हेच सांगितले.वर "तुम्ही इतर कुठल्याहि company कडे चौकशी केली तरी wire साठी दुरुस्ती-खर्च द्यावाच लागतो" असे सांगितले.शेवटी warranty card असुन काही उपयोग नाही हे मनाशी ठरवुन मी फोन ठेवला.घरी जाऊन warranty card परत एकदा नीट वाचुन काढले पण त्यात wire साठी पैसे द्यावे लागतील असे कुठेहि म्हटले नव्हते.तरीहि ,दुसऱ्या दिवशी दुकानात फोन करुन दुरुस्ती-खर्च द्यायला तयार आहोत असे सांगायचे ठरवले होते.
पण अचानक लोकसत्ता मध्ये वाचलेली एक बातमी आठवली.ती बातमी होती mineral water bottle वर छापलेल्या किमतीपेक्षा अधिक पैसे देण्याविरुद्ध ग्राहक मंचाकडे केलेल्या तक्रारीसंबधी आणि त्यात त्या तक्रारकर्त्याचा झालेला विजय.हे आठवल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मी परत company प्रतिनिधीला फोन करुन warranty card ची आठवण करुन दिली.माझ्या अपेक्षेप्रमाणॆ त्याने परत नकारघंटा वाजवल्याबरोबर मी ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडुन त्याच्या चेंबुर कार्यालयाचा पत्ता लिहुन घेतला (जो देण्यासाठी त्याने खुप टाळाटाळ केली).शेवटी फोन ठेवुन दिला आणि Internet वरुन ग्राहक मंचाकडे कसा संपर्क साधायचा याची माहिती काढायला सुरुवात केली.एक अर्धा तास झाला आणि थोड्याच वेळात त्या company प्रतिनिधीचा मला फोन आला -
"मी माझ्या वरिष्टांशी बोललो असुन तुमचे म्हणने मी त्यांना सांगितले आहे.तुम्हांला ग्राहक मंचाकडे जाण्याची गरज नसुन आम्ही ती wire बदलण्यासाठी कुठलाही दुरुस्ती-खर्च घेणार नाही.मला फ़क्त २ दिवस द्या.नविन wire दुकानात पाठवतो आणि मग इस्त्री घेउन जा".हे ऐकले मात्र आणि एवढे दिवस फोनाफोनी करण्यात घालविलेले श्रम सार्थकी लागल्याचे समाधान वाटले ! पण २ दिवसांनी दुकानात गेले असता परत तोच अनुभव ! दुरुस्त केलेली इस्त्री तर हातात दिली पण पैसे द्यावे लागतिल असे दुकानदाराने सांगितले.मी निक्षुन नाही सांगितल्यावरच ते वरमुन गप्प बसले. आणि मग मनातल्या मनात ग्राहक शक्तीचा विजय असो ही घोषणा देतच तेथुन बाहेर पडले !!!

ता.क. - अशाच आशयाचे एक पत्र लोकसत्ताला लिहायचे मी ठरवत आहे.जेणेकरुन कदाचित माझ्यासारखे जे इतरही ग्राहक असतील त्यांना हा अनुभव उपयोगी ठरेल.

--- चांदणी *

गुलमोहर: 

अभिनंदन चांदणी.. फक्त लोकसत्ताच नाही तर सगळ्याच वर्तमानपत्रात द्या ते पत्र.

वा वा.. तेच तर आहे, आपण थोडा पाठपुरावा केला पाहिजे. आम्हालापण अनुभव आलाय विडिओकॉनच्या डिलरचा. कंपनीला कळवल्यावर डिलरनी स्वतः फोन करुन जास्त घेतलेले पैशे परत केले!

माझा पण एक अनुभवः

फेब्रुवारी २००९ मधे मी भारतात १००० डॉलर्सचा चेक पाठवला होता. ज्यांना भारतात चेक दिला त्यांनी लगेच बँकेत (बँक ऑफ महाराष्ट्र) जमा केला. माझ्या अमेरीकेतल्या बँकेतुन मार्च १७ रोजी रक्कम काढली गेली. पंण मे महिना उजाडला तरी बँकेने पैसे अजुन आलेच नाहीत असे सांगितले. बँकेच्या जिल्हा अधिकार्‍याकडे लेखी तक्रार करुन पण काही उत्तर आले नाही. ईटरनेटवरुन तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला पण वेबसाईट् नीट चालत नाही. सारखी एरर येते. ईमेल ने पण कोणी दखल घेतली नाही. शेवटी इंटरनेट वरुन वरीष्ठांचा नंबर काढुन त्यांना कैफियत ऐकवली. त्यांनी लगेच बॅकेला तपास करायचे आदेश दिले. तरी फार फरक पडला नाही. जवळपास १५ दिवस त्या वरीष्ठांचे रोज डोके खाल्यानंतर एकदाचे पैसे जमा झाले पण दुसरा धका दिला.
१८ मार्च प्रमाणे आम्हाला १ युस डॉलर करिता ५१ रुपये ह्या प्रमाणे पैसे मिळायला हवे होते. पण बेंकेने ४६ रुपये प्रमाणेच दिले आणि वर सांगितले कि आमच्या शाखेला वरुन इतकेच आले. परत लेकी तक्रार करणे वगैरे आले. मागचा एक महिना लेखी तक्रार करुन पण काही उपयोग झाला नाही. परत जिल्हा बँकेला धमकी दिली की आम्ही आर.बी. आय. कडे तक्रार करु तसेच आम्ही ग्राहक मंचाकडे जात आहेत. आर.बी. आय. च्या साईट्वरुन तशी तक्रार के़लीपण. लगेच २ दिवसात चाव्या फिरल्या आणि ३ दिवसापुर्वीच बँकेत पैसे जमा झाले . पण बॅकेने ४ महिन्याचे व्याज नाही. बेंकेच्या अधिकार्‍यांना फोन करुन व्याजाबद्दल विचारले आणि सांगितले की आम्ही ग्राहक मंचात जात आहेत. थोड्याच वेळात दुसर्‍या अधिकार्‍याचा फोन आला की आम्ही तपास करत आहेत तो पर्यंत कोर्टकचेर्‍या न करता धीर धरा.
त्याव्याजाचे इतके काही नाही पण हे लोक ग्राहकांना गृहित धरतात आणि त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात याचेच वाईट वाटते, बोलताना मग्रुरी इतकी की आम्ही तुमच्यावर उपकार करतोय. सुदैवाने वरिष्ठ अधिकारी तत्पर निघाले आणि स्वत:हुन लक्ष घातले. पण बँक ऑफ महाराष्ट्र सारख्या राष्ट्रीयकृत बॅकेकडुन ही अपेक्षा कधीच केली नव्हती.

माझा पण भारता बाहेरील अनुभवः आम्ही ईथे परदेशात येऊन पहीली खरेदी केली ती फुड्प्रोसेसरची.ते जास्त वेळ वापरले तर थोडा जळन्यासारखा वास येत असे. तरी मी ते ३-४ महीने तसेच वापरले.मग एकदा त्या दुकानात गेले होते म्हणुन त्यांना सांगितले ,त्यांनी लगेच सर्वीस सेंटर ला जायला सांगीतले ,आम्ही गेलो,तर नेहमी प्रमाणे आम्ही चेक करु दोन दिवसानी या सांगितले.दोन दिवसानी आम्ही अगदि खर्च जास्त अस्ल्यास आपाण नविन च घेऊ वगेरे ठरवुन गेलो ,तर तीथे सांगितले आमच्या प्रोड्क्ट मधे फाल्ट आहे ,तुम्हाला आम्ही नवीन फुड्प्रोसेसर देतो,मी आपली आधीच्या अनुभवांनवरुन म्ह्टले पण की नको नको हाच रीपेर करुन दिला तरी चालेल्.तर तो ठाम पणे म्हणाला "नाही आम्ही तुम्हाला हा देऊ शकात नाही,तुम्हाला नवीन च घ्यायला लागेल," आणी आम्ही नवीन फुड्प्रोसेसर घेऊन एकही पईसा न खर्च करता बाहेर पडलो.:)