माझ्या शाळेची बाग

Submitted by शिवम on 29 June, 2009 - 02:44

पावसाच्या दिवसांतही पावसाची वाट पहावी लागत असताना...
माझ्या छोट्याश्या खेडेगावातील शाळकरी मुलांनी मेहनतीने अन जिद्दीने अगदी मे महिन्यातील कडक उन्हाळ्यातही आपल्या शाळेची बाग अशी फुलती ठेवली. (सर्व चित्रे मोबाईलवर टिपलेली.)

Image010.jpgImage011.jpgImage012.jpgImage263.jpgImage191.jpgImage192.jpgImage183.jpgImage184.jpgImage236.jpgImage237.jpgImage264.jpgImage256.jpgImage257.jpgImage258.jpgImage265.jpgImage014.jpgImage015.jpgImage016.jpgImage017.jpgImage018.jpgImage019.jpgImage020.jpgImage013.jpg

गुलमोहर: 

वा! शिवम बाग खुप छान फुलवली आहे. वेगवेगळ्याप्रकारची झाडं शाळाहि मस्तच! Happy

अय्या ! कित्ती सुंदर बाग! मला तर बॉ शाळा जास्त आवडली! मराठी शाळांची एक टिपिकल ठेवण असते नै?

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

शाळकरी मुलांची मेहनत वाटत नाही इतकी सुंदर बाग वसवलेय Happy

खुपच छान बागेतली शाळा Happy
मुल या शाळेत येताना कधीच कंटाळत नसतील.

भावना, नयना, कविता अन शितल धन्यवाद ! Happy
कविता, ही शाळकरी मुलांचीच मेहनत आहे. अहो, गावच्या शाळांमध्ये कुठले आलेत खास बाग्-बगिचे फुलवण्यासाठी कर्मचारी / माळी? शाळेतील मुलांचे गट तयार करून त्यांना जमिनीचे छोटे छोटे तुकडे अन रोपे दिली जातात. त्यानंतर पुढची सर्व जबाबदारी मुलांची.

इतक्या छान शाळेत येण्यास कंटाळा कसा बरं येईल शितल ? Happy

गावाचे अन शाळेचे नाव नाही सांगितलत? कौलारु टुमदार शाळा अन पुढे सरस्वतीचा पुतळा...प्रसन्न वातावरण! शाळेतील मुलेही तेवढेच निरागस असतील नाही?

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...

http://www.maayboli.com/node/7762#comment-249911

वा, सुंदर! कुठची शाळा आहे ही? Happy

-----
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!

नयना, ही शाळा आहे 'कोल्हापुर' जिल्ह्यातील 'आजरा' तालुक्यामध्ये असलेल्या "हात्तिवडे" या माझ्या लहानश्या गावातील.
सरस्वती हायस्कूल हात्तिवडे.
माझं शिक्षणही याच शाळेत झालं. पण त्यावेळी शाळेची जागा दुसरीकडे होती.
शाळेच्या मुख्य द्वारातून मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा सुरुवातीलाच मन इतकं प्रसन्न झालं की काही विचारू नका.
गुलाबाची तर इतकी फुलं फुलली होती की बस्स्स... इतक्या वेग-वेगळ्या प्रकारचे गुलाब अन इतक्या असंख्य संख्येने मी प्रथमच पाहीले. पण या गुलिस्थानापर्यंत पोहोचेपर्यंत थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती. अंधुक प्रकाशामुळे मी गुलाबांचे फोटो घेऊ शकलो नाही. Sad

साजिरा, धन्यवाद. Happy

छान आहे शाळा. आवडली ! Happy

सुंदर! मुलांचं कौतुक करावं तितकं थोडं!

मस्त! Happy
मुलांचं खूप कौतुक!

सुंदर!!
आयटी ला अनुमोदन.. मुलांच कौतुक कराव तेवढं कमी आहे.

शिवम, तुझी शाळा आणि आजुबाजुचा वातावरण खराच प्रसन्न करणारा आसा.

शिवमा, मस्तच फुलवत ठेवली आहे मुलांनी ही शाळ.. नाही म्हणटलं तरी त्या शिक्षकांचे पण थोडे आभार मानायला पाहिजेत ज्यांनी मुलांमधे एवढा आत्मविश्वास दिला की ते हे काम करु शकतील आणि त्यांना तेवढेच प्रोत्साहन दिले असणार... नाहि का???
********************
येरे येरे पावसा...
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा..
पाउस आला मोठा.....

फारच सुरेख शिवम.. बाकी हे हात्तिवडे कुठेशी आहे नेमके? चंदगड रस्त्याला काय?

खुपच छान बागेतली शाळा
मुल या शाळेत येताना कधीच कंटाळत नसतील....>>> खरचं
खुप आवड्ली शाळा Happy

शाळा, बाग आणि सभोवतालचा शाळेचा परीसर फारच छान आहे. सुंदर उपक्रम आहे शाळेचा.

फार देखणी बाग! मुलांच्या मेहेनतीचं खूप कौतुक वाटलं!

काय सुंदर बाग आहे. त्याहून ती शाळा. कारण आजूबाजूला इतके रम्य वातावरण एकदम मस्त. सरस्वतीदेवीचा पुतळा एकदम मस्त.
नाहीतर शहरातील शाळांना पटांगणाचीच कमी असते बहुधा.. एवढी मोठी बाग तर दूर.

फारच सुंदर. मुलांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे.

अगदी अगदी. मुलांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अश्या योजना यशस्वी राबवल्याबद्दल ते पण अगदी कमी फंडींग, साधनसामुग्री असतांना.
आम्हाला कार्यानुभवच्या तासाला लायब्ररीत जावुन पुस्तक वाचा नाहीतर वर्गात बसुन अभ्यास करा अस सांगायचे, :(.

शाळा जबरी आहे. एकदम बेष्ट.

कार्यानुभवला अनुभव न घेता मार्क मात्र मिळायचे. Happy

सुरेख. अगदी प्रसन्न वाटलं हे फोटो बघून.

शिवमा, आज पाहीले फोटो, शाळा, सरस्वतीची मुर्ती, बाग सगळंच खूप आवडलं.
नोकरी सोडून परत एकदा शाळेत जायला आवडेल. Happy पण तुझ्या याच शाळेत बाकी कुठल्या नाही. Happy

कौतुकास्पद आहे... खुप छान स्तुत्य उपक्रम... अशा शाळेत जायला कोण कंटाळा करेल ?

सर्वांचे अगदी मनापासुन आभार ! Happy

रुनी, केदार... कार्यानुभव वरून आठवलं....
मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा गावाला जोडणार्‍या मुख्य रस्त्याच्या बाजुने आम्ही बर्‍याच झाडांच्या रोपांची लागवड केली होती. आता जेव्हा मी गावी जातो तेव्हा त्या वेळी लावलेल्या रोपांचे आता झालेले मोठे वृक्ष पाहुन मनाला काय समाधान होतं म्हणुन सांगु? Happy
एवढंच काय... त्या वेळी एस.टी. ची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उन्हामध्ये ताटकळत उभं रहावं लागायचं. पण आता आम्ही जेव्हा गावी जातो तेव्हा त्याच ठीकाणी भल्या मोठ्या झाडाच्या पारावर बसुन आरामात एस्.टी. ची वाट पाहतो. त्या वेळी - 'आम्ही शाळा शिकत असताना लावलेलं हे झाड' - हे जेव्हा आठवतं; तेव्हा मनाला मिळणारा आनंद हा काही औरच. Happy

Pages