सींगल ममा

Submitted by sas on 26 June, 2009 - 07:19

"अग अनु अजुन किती वेळ बोलशील फोन वर बास आता, ४५ मीं झालेत ठेव बघु तो सेल बाजुला, दोन दिवसांनी निघणार आहेस, ४-६ महिने ईतक्या दुर रहाणार आहेस जरा दोन दिवस तर ममाला दे सारख काय ते सेल वर बोलण"

"अग हो ममा झाल शालु, विशाल, स्वाती सगळ्यांना फोन झलेत; सगळे येणार होते मला बाय करायला पण मीच नको म्हटल. मला जातांना फक्त माझ्या ममा ची सोबत हवी आहे ना!... आता पुढचे दोन दिवस फक्त आपल्या माय-लेकीचे... अग ममा दोन दिवसच काय माझ पुर्ण लाईफ तुझ आणी फक्त तुझ्या साठीच"

(ममा चिडवत )! म्हणे पुर्ण लाईफ तुझ... मग त्या तुझ्या आदि बेबिच काय होणार!!!

ममा....! काय ग!!! मी तु आजु बाजुला असतांना त्याला फोन करणच सोडलय बघ... तु आपली येतेस धडकन माझ्या रुम मध्ये आणी माझ फोन वरच बोलण एकुन नंतर चिडवतेस वरुन असच गोडी ने रहात जा म्हणते तुझ ना काही कळत नाही बघ... ए ममा मी आदि साठी घेतलेल गीफ्ट खरच आवडल ना तुला आज जमल तर आपण दोघी जाऊन त्याच्या साठी आणखी काही आणु या ना!

ममा: हो! जाऊ यात मॉल मध्ये जमल तर आणी हो तुझ्या मोनु साठी काय पाठवायचय विचारलना त्याला

हो ग ते कस विसरेन आमच बोलण झालय आणी आमचा एक प्लॅन हि ठरलाय जो आम्ही काही झाल तरी पुर्ण करणारच आहोत... ह्या वेळी तुझ आणी डॅडाच काहीही चालणार नाही, मी लंडन ला जरा सेटल झालेना की तुम्ही सगळे येणार आहात तीथे २ महिन्यांन करता... मोन्या च्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतील तेव्हा आपण मस्त फॅमीली व्हेकेशन करणार आहोत... डॅडाला आत्ता पासुनच सांगुन ठेव... त्याच जमणार नाही वै. काही चालायच नाही... मला 'बाय' करायला ही तो इथे नाही... एवढी काय महत्वाची सेमीनार आहे त्याची सींगापुरला

अग आजवर तुझ्या प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमा साठी, कारणा साठी धावुन आलाय ना तो त्याची महत्वाची काम सोडुन मग आता एकदा नाही आला तर काय बिघडल आणी आता लहान का आहेस तु
चायना, जर्मनी आता लंडनला जाऊन काम करणारी करीयर गर्ल ना तु, मग हा काय पोरकट पणा

ममा डॅडा साठी लहानच आहे हो मी अजुन!!!!

पॅकींग, शॉपींग, माय लेकीच्या गप्पां मध्ये २ दिवस कसे उडुन गेले समजल ही नाही

जपुन जा , काळजी घे!!!! ममा चे पाणावलेले डोळे बघुन अनन्या ला ही रडु सावरेना, कसबस स्वःताला सावरत तीने चेक-ईन केल.... विमानात बसल्यावर मात्र रडु आवरेना मन शांत व्हाव म्हणुन ती डोळे मीटुन बसली ... तस तीच मन ममा च्या आठवणींत रमल

ममा ला बाय करतांना नेहमीच जड जात शाळेचा पहिला दिवस आणी मग रोजच जेव्हा ममा शाळेत सोडुन बाय करायची तेव्हा ही किती रडायला यायच. आधी शाळेत जातांना, मग समर कँम्प ला जातांना, नाटका च्या प्रयोगां साठी जातांना, आणी आता नोकरी साठी ममा पासुन दुर जातांना नेहमीच नकोस होत... माय ममा.... माय डियर ममा... वल्डस बेस्ट ममा

मी ९ वर्षांची असतांना ममा च लग्न झाल, आणी माझी 'सींगल ममा' मॅरीड झाली. मला डॅडा तर ममाला लाईफ पार्टनर मीळाला... ८ वर्षे ममा ने एकटिने स्र्टगल केला... ममा 2nd year ला तर होती म्हणजे 'शी वॉज जस्ट १९' जेव्हा मी झाले...

ममा आणी अभीलाष अंकल एकाच शहरातले, एकाच शाळेतले. अंकल ममा पेक्षा ४ वर्षांनी सीनीयर... त्यांची शाळेतली ओळख मैत्रीत आणी मग प्रेमात फुलली... ममा पुण्यात शीकायला आली तेव्हा अंकल आधी पासुनच पुण्यात होते... ममा नोकरी करुन शीकात होती....ममा ईंजीनियरींच्या दुसर्‍या वर्षाला असतांना अंकल ME च्या दुसर्‍या वर्षाला होते... शीकत असतांनाच त्यांनी त्यांचा बीजनेस ही सुरु केला होता... नावा प्रमाणेच अभीलाष अंकल अभीलाषी , त्यांची स्वप्न, महत्वकांक्षा हेच त्यांना सगळ्यांपेक्षा महत्वाच... त्यांच्या बीजनेस चा जम बसु लागला तसे ते त्यातच गुरफटत होते... यात एका धुंद क्षणात ममा आणी त्यांनी प्रेमात एक पाऊल पुढे टाकल आणी ममा ला माझ्या येण्याची चाहुल लागली... अश्या वेळी ममा ला सोबत असावी म्हणुन ममा आणी अंकल सोबत राहु लागले ... गरोदर असुनही अभ्यास नोकरी आणी घर ममा ने यशस्वी पणे संभाळल, अभ्यासात तीचा A garade कायम ठेवला...

... ममा खुप शांत स्वभावाची, ईतरांना समजुन त्यांच्या कलेने घेणारी.... अभीलाष अंकल कडुन तीला लग्नाची कमीटमेंन्ट मीळावी, त्यांच्या सोबत लग्न व्हाव, सौभाग्याचा संसार थाटावा तीची ही स्वप्न कधी पुर्ण झाली नाही... मी झाल्यावर अंकलचा बीजनेस आणखी जम पकडु लागला तसे ते ममा पासुन दुरावत गेले ...

....सोबत रहाण्यास त्यांची ना नव्हती पण त्यांची आर्थीक स्वप्न पुर्ण झाल्या शीवाय त्यांना लग्नाच्या बंधनात अडकायच नव्हत हे ममा ला आधी पासुन ठाऊक होत.... ममा ला माझी चाहुल लागली तेव्हा ममा ने काय तो निर्णय घ्यावा ते ममाची साथ देतील अस ते म्हणालेले आणी त्यांनी ममा ची साथ दिली हि पण लग्न हा विचार त्यांना नकोसा वाटायचा... लग्ना शीवाय ममा ने तिचा संसार थाटला... लग्न ह्या औपचारीकते पेक्षा तीने प्रेमाला महत्व दिल... पण जस जस अंकलचा बीजनेस वाढु लागला ते आम्हाला कमी वेळ देवु लागले... मला माझ्या बाबा चा वेळ मीळावा त्याने माझे लाड कौतुक करावेत या साठी ममा चा जीव तुटायचा... तीला तिच्यासाठी अभीलाष अंकलचा वेळ नको होता पण त्यांनी मला वेळ द्यावा म्हणुन ती त्यांना सारख सांगायची समजवायची यात त्यांचे वाद होऊ लागले, भांडण सुरु झाली...

"मला वाद, भांडण किंवा संसारासाठी वेळ देण शक्य नाही तेव्हा उगाच आपण आपला वेळ एकमेकांना समजाविण्यात, भांडणात घालविण्या पेक्षा वेगळ झालेल बर" असा निर्णय घेवुन अंकल आम्हाला सोडुन गेले... त्या वेळी मी १ वर्षांची होते...

... आपल माहेर कधीच दुरावलय तीथे आपण कुणाला सहन होणार नाही हे ममा ला माहित होत...ममा ने कुणाची मदत नसतांना स्वःताच्या हिंमतीवर शीक्षण पुर्ण केल, नोकरीत तीला तिच्या कर्तुत्वावर प्रमोशन मीळाल. ममा ने माझे सारे लाड केले, हट्ट पुरवले, मला कसली कमी भासु दिली नाही

मी पप्पा बद्द्ल विचारायचे तर ममा म्हणायची "तुझी ममा सींगल ममा आहे, तुझा पप्पा कामा साठी दुर गेला आहे"... तिने कधी काही लपवल नाही... शाळेत मला कुणी माझा बाबा बद्द्ल विचारल तर मी सांगायचे 'माय ममा ईज सींगल ममा , माय डॅड ईज नॉट विथ अस'

ममा जणु स्वःताला विसरुन गेली होती, तीच्या ईच्छा, स्वप्न सार काही माझ्या साठीच होत .... ५ वर्षे फक्त माझी मुलगी इतक्याच विश्वात गुंतलेल्या ममाच्या जीवनात डॅडा आला आणी आमच्या जीवनाचे रंग अधीकच खुलले....

आकाश अंकल आमचे नवे शेजारी हसरे, मन-मीळाऊ, मुलात मुल होऊन रहाणारे.... मी तुमचा नवा शेजारी म्हनुन तेच स्वःता आमच्या शी ओळख करायला आलेले... त्यांच्याशी खरी ओळख झाली ती ते आजारी असतांना... त्यांना आमच्या शेजारी येवुन २-३ महिने झाले असावेत एकदा रात्री त्यांना खुप ताप आला... ते मदती साठी आमच्या कडे आले.... ममा ने त्यांना डॉ. कडे नेल त्यांच्या घरी फोन करुन त्यांच्या घरच्यांना बोलावुन घेतल... त्यांची आई आल्या नंतर आमच त्यांच्या कडे येण जाण वाढल...

....माझी आणी आकाश अंकल ची चांगली मैत्री झाली... आम्ही सोबत लुडो, मोनोपॉली, व्हिडीयो गेम..... खेळायचो , ते माझ्या खुप लाड करायचे, मला त्यांचा खुप लळा लागला... माझ्या मुळे ममा आणी आकाश अंकल ची ओळख वाढली.... आकाश अंकल ने ममा ला लग्नाच विचारल पण ममा ने माझ्या साठी नकार दिला... ममा ला हो म्हणायला ३ वर्षे लागली...

... माझ्या ९ व्या बर्थ डे नंतर दोन महिन्यांनी ममा च लग्न झाल .... माझी सींगल ममा मॅरीड झाली... आकाश अंकल चा डॅडा झाला... मग मोन्या ....माझा लहान भाऊ मोहित झाला... जीवन आनंदाने फुलत होत...

... मध्ये अभीलाष अंकल शी भेट झाली.... १७ वर्षांनी ज्याला माझी आठवण झाली अश्या माणसाला भेटण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती आणी ममा ने ही त्याला भेटायला जाऊ नये असच मला वाटत होत... पण ममा आणी डॅडा च्या समजावण्या वरुन त्यांच्या खातर मी ममा सोबत त्यांना भेटायला गेले...

....आजही ममा किती शांत किती खंबीर होती... तीने अभीलाष ला त्याच्या वागणुकीचा जाब विचारावा अस मला वाटत होत पण तक्रार करण हा तीचा स्वभावच नाही.... आजही ममा केवळ मला माझा जन्मदाता कोण ते कळाव, त्याच्याशी माझी ओळख व्हावी केवळ ह्याच साठी अभीलाष ला भेटायला आली होती.... तीला कैक वर्षां पुर्वी भेटलेल्या अभीलाष ला तीने कधीच भुलावल होत, माफ केल होत.... आता तीला त्याचा मोह नव्हता

अभीलाष ला खरतर त्याच्या नावानेच बोलावायच अस मी ठरवलेल पण त्यांना मी अंकल म्हणाले... ममा ची शीकवण, तीचे संस्कार.... मी ममा ची मुलगी आहे हे मी कस विसरले असते.... त्यांना बाबा, डॅडा , पप्पा म्हणण्याचा प्रश्नच नव्हता ह्या वर हक्क होता तो केवळ माझ्या आकाश डॅडाचा...ज्याच्या प्रेमात, मायेत अभीलाष अंकल माझ्या जीवनात आल्याने थोडाही फरक पडलेला नव्हता.... त्या नंतर १-२ दा अभीलाष अंकल चा फोन आला... ते यु. एस. मध्ये सेटल झाले होते... यु. एस ला परतल्या वर २-४ महिन्यांनी त्यांच्या लग्नाच आमंत्रण आम्हाला आल... ममा ने मेल वरुन आमच्या शुभेच्छा त्यांना दिल्या बस ईतकच.... त्या नंतर आभीलाष अंकल परत आमच्या जीवनात परतले नाहीत आणी आम्हाला ही त्यांची ऊणीव जाणवली नाही.... ममा ने ह्या वेळी हि किती शांत पणे, खंबीर पणे सारे निभावुन नेल....

विमान लँड झाल तो अनन्या आठवणी तुन बाहेर आली.... ममा ने हॉटेल बुक केल होत त्यामुळे कुठे जायच हा प्रश्न नव्हता... हॉटेल रुम वर पोहचताच फोन वाजला... "अनु ममा बोलतेय कशी आहेस, पोहचलीस ना"....... माय ममा.....!!!

गुलमोहर: 

छान .आवडली. आताशी सर्व ममांनी असेच खंबीर राहण्याची गरज आहे. सिंगल ऑर मॅरिड

कथेतली मंमा आवडली .

वर्षा, छाया, गौरी खुप खुप आभार Happy

आताशी सर्व ममांनी असेच खंबीर राहण्याची गरज आहे. सिंगल ऑर मॅरिड>>>>>>>>>>>पण सर्व डॅडानी अभीलाष होऊ नये हिच प्रार्थना.

कथा ठिक आहे. मुख्यत्वे करून ममाचं कॅरेक्टर छान आहे. अर्थात आई आहे म्हटल्यावर ती ग्रेटच असणार. Happy
पण अनन्या निदान २० वर्षांची आहे असं धरून चाललं तरीही तिच्या जन्माच्या अगोदरच्या काळात लग्न न करता एकत्र राहणं, अनौरस बाळाला जन्म देणं नाही पटलं. आज स्त्री कितीही पुढारली असली तरिही आत्ताच्या काळातही खचितच ती असं पाऊल उचलेल.

पण खंबिरपणा दृढ करण्यासाठी कथेच्या दुसर्‍या गाभ्याला अनुमोदन. Happy

शॉर्ट आणि स्विट, आवडली कथा. पण खंबिरपणा दृढ करण्यासाठी कथेच्या दुसर्‍या गाभ्याला अनुमोदन. ह्या दक्षिणाच्या वाक्याला अनुमोदन

-------------------------------------------------------------------------
गजरे वालीची परडी संपली. घागर रिकामी जाहली रे .....

गौरी देशपांडेची उत्खनन आठवली. बह्य्तेक कथाभाग तसाच आहे.
--------------
नंदिनी
--------------

वैभव, प्रिया, भानसा, दक्षीणा, कवीता, piapeti, नंदिनी खुप खुप आभार Happy

नंदिनी आभार Happy

मला गौरी देशपांडे यांच्या बद्द्ल माहिती नाही... तस मला ईतर बरेच मराठी लेखक/लेखीका हि माहित नाहीत (पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, शांता शेळाके, बहिणाबाई, ई. शाळेत ज्यांचे धडे कविता होत्या ते मोजके लेखक्/लेखीका माहित आहेत) .... मराठी अवांतर वाचन स्वामी आणी मॄत्युंजय तेही १२ वी च्या सुट्टित त्या आधी मराठीच पुस्तक आणी नंतर मा. बो. हे मराठी वाचन ... कथेत साम्य हा योगायोग च आहे... गौरी देशपांडेचा शाळेत धडा वै. असल्याच आठवत नाही आणी मी त्यांच लेखन कधीच वाचलेल नाही Happy

मराठी शाळा, मराठी सीरीयल्स, मराठी मैत्रीणी आणी महाराष्ट्रात वाढल्याने मराठी येत :)... पुस्तक, कादंबर्‍या ई. वाचनातुन मराठी च्या जास्त जवळ जाण्याची संधी नाही मीळाली Sad