लाल साडी, निळी साडी… श्रीधरची लव्ह स्टोरी भाग ९

Submitted by amol_koli on 14 October, 2026 - 11:46

एक न वाचलेला मेसेज आणि अनेक वर्षं न समजलेलं प्रेम

भाग ९ — "gnsdtcmulu"

सोमवारची सकाळ होती.

पुण्यात नेहमीप्रमाणे दिवस सुरू झाला होता.

विजय ऑफिसला गेला होता.

प्रशांतही त्याच्या तथाकथित “महत्त्वाच्या कामासाठी” निघून गेला होता.

बाकीचे roommatesसुद्धा आपापल्या jobवर गेले होते.

आणि मी?

मी अजूनही बेडवर होतो.

कारण माझ्याकडे उठून जाण्यासाठी office नव्हतं.

गेल्या जवळपास वर्षभरापासून मी job शोधत होतो.

Interview द्यायचे.

“आम्ही तुम्हाला कळवतो” ऐकायचं.

आणि मग...

कुणीच काही कळवायचं नाही.

त्यामुळे सकाळी phone वाजला की अजूनही एक छोटीशी आशा निर्माण व्हायची—

कदाचित interview call असेल.

त्या सकाळीही phone वाजला.

Unknown number.

मी झोपेतच screenकडे पाहिलं.

मनात म्हटलं—

चला श्रीधर...

आज कोणत्या companyला तुला reject करण्याची इच्छा झाली आहे ते बघूया.

मी call उचलला.

“Hello?”

तिकडून मुलीचा आवाज आला.

“श्रीधर?”

मी थोडा सावध झालो.

“हो... कोण?”

“मी शीतल.”

मी लगेच उठून बसलो.

“शीतल?”

विजयची शीतल?

तिने मला याआधी कधीही अशा प्रकारे फोन केला नव्हता.

तिचा आवाजही नेहमीसारखा नव्हता.

ती गंभीर वाटत होती.

“श्रीधर, तू दगडूशेठ गणपतीजवळच्या gardenमध्ये येऊ शकशील का?”

“आत्ता?”

“हो. मी तुझी वाट पाहतेय.”

मी काही क्षण शांत राहिलो.

“सगळं ठीक आहे ना?”

ती थोडी थांबली.

“तू ये. बोलायचं आहे.”

Call कट झाला.

आणि माझ्या डोक्यात लगेच प्रश्न सुरू झाले.

विजय आणि शीतलमध्ये काही झालं का?

विजयने कालच्या messageचा विषय पुन्हा काढला का?

आता या दोघांच्या relationshipमध्येही मी आरोपी झालो का?

माझ्या आयुष्यात कुणी “थोडं बोलायचं आहे” म्हटलं की मला भीती वाटायला लागली होती.

कारण पुढचं वाक्य बहुतेक वेळा—

“आणि याला कारण तू आहेस.”

असंच निघायचं!

पण तिचा आवाज serious होता.

मी पटकन तयार झालो आणि बस पकडली.

---

Gardenकडे जाताना माझ्या डोक्यात विजय, शीतल, प्रियांका, मयुरी...

सगळे एकाच वेळी फिरत होते.

कालपर्यंत मला वाटत होतं—

कदाचित आता आयुष्य थोडं शांत होईल.

पण माझ्या आयुष्यात “शांतता” हा शब्द बहुधा trial versionमध्येच मिळाला होता.

Gardenमध्ये पोहोचलो.

शीतलने सांगितलेल्या जागेकडे गेलो.

ती एका बाकावर बसली होती.

मी जवळ गेलो...

आणि तिचा चेहरा पाहताच माझी गंमत करण्याची इच्छा थांबली.

ती upset दिसत होती.

डोळ्यांवरून जाणवत होतं की काही वेळापूर्वी ती भावूक झाली असावी.

मी तिच्यासमोर बसलो.

“काय झालं?”

तिने माझ्याकडे पाहिलं.

काही क्षण काही बोलली नाही.

मग म्हणाली—

“श्रीधर... मी आत्ता प्रियांकाला भेटून आले.”

माझ्या शरीरातून जणू अचानक वीज गेली.

“काय?”

“प्रियांका.”

तीन आठवडे.

जवळजवळ तीन आठवडे तिचा call नाही.

भेट नाही.

काहीच नाही.

आणि आज अचानक—

शीतल तिच्याबद्दल बोलत होती.

मी पुढे झुकलो.

“ती... कशी आहे?”

शीतलने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

उलट मला विचारलं—

“तुला माहिती आहे प्रियांकाच्या मनात तुझ्याबद्दल काहीतरी खास कधीपासून होतं?”

मी गोंधळलो.

“म्हणजे?”

“तुम्ही cousinच्या लग्नात भेटलात त्याच्या खूप आधीपासून.”

मी तिच्याकडे पाहत राहिलो.

“कसं शक्य आहे? मी तिला नीट पाहिलंच त्या लग्नात.”

शीतल म्हणाली—

“तुला आठवत नाही. पण तिला आठवतं.”

मी शांत झालो.

“तू लहान असताना सुनीता आत्याकडे गेला होतास. तुम्ही दोघं तेव्हा खूप लहान होतात. एकत्र खेळलात, वेळ घालवला होता. तुला ती आठवण राहिली नाही... पण तिला राहिली.”

मी काही बोललो नाही.

शीतल पुढे म्हणाली—

“त्या वयात त्याला प्रेम म्हणणं योग्य होणार नाही. पण तिच्या मनात तुझ्याबद्दल एक खास जिव्हाळा राहिला. वर्षं गेली... तुम्ही मोठे झालात... आणि त्या जिव्हाळ्याचं पुढे प्रेमात रूपांतर झालं.”

मी बाकावर मागे टेकलो.

माझ्या डोक्यात cousinचं लग्न पुन्हा सुरू झालं.

Blue saree.

तिचं हसणं.

माझ्याकडे पाहणारे तिचे डोळे.

मी तिला पहिल्यांदा पाहतोय असं मला वाटत होतं.

पण...

कदाचित तिच्यासाठी ती पहिली भेट नव्हतीच.

शीतल पुढे म्हणाली—

“आणि ती red sareeची गोष्ट?”

मी तिच्याकडे पाहिलं.

“काय?”

“तिने मुद्दाम red saree घातली नाही.”

“का?”

“कारण तिला तू WhatsAppवर सुचवलेला रंग घालून तुझ्यासमोर यायचं नव्हतं. तिला बघायचं होतं—तू तिला तिच्या साडीच्या रंगामुळे notice करतोस की तिच्यामुळे.”

मी काही क्षण स्तब्ध बसलो.

इतके दिवस मला वाटत होतं—

तिने माझा advice ignore केला.

पण तिच्या बाजूने त्या निळ्या साडीमागेही एक छोटीशी भावना होती.

मी हलक्या आवाजात म्हणालो—

“म्हणजे मी लग्नभर पंचवीस लाल साड्यांमागे फिरत होतो... आणि ती मला निळ्या साडीतून test करत होती?”

शीतलच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा हलकंसं हसू आलं.

“तुझी problem तीच आहे श्रीधर. तू नेहमी चुकीच्या गोष्टीचा investigation करतोस.”

मी मान खाली घातली.

“हे मला प्रशांतसुद्धा वेगळ्या शब्दांत सांगतो.”

काही क्षण शांतता झाली.

मग शीतलने विचारलं—

“"gnsdtcmulu" म्हणजे काय हे कळलं का तुला?”

मी तिच्याकडे पाहिलं.

तो message.

Movieच्या दोन दिवस आधी.

मी कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहिलं होतं.

काही अर्थ लागला नव्हता.

शेवटी typing mistake समजून ignore केला होता.

“नाही.”

शीतलने हळूहळू शब्द सांगायला सुरुवात केली—

“Good Night...”

ती माझ्याकडे पाहत होती.

“Sweet Dreams...”

माझ्या डोक्यात अक्षरं जोडली जाऊ लागली.

“Take Care...”

मी सरळ बसलो.

“Miss You...”

माझा श्वास जरा जड झाला.

आणि मग ती म्हणाली—

“Love You.”

मी काही बोललो नाही.

शीतलने पुन्हा म्हटलं—

“Good Night. Sweet Dreams. Take Care. Miss You. Love You.”

G.

N.

S.

D.

T.

C.

M.

U.

L.

U.

"gnsdtcmulu"

मी screenवर पाहिलेला तो विचित्र message अचानक माझ्यासमोर पूर्ण वाक्य बनून उभा राहिला.

माझ्या तोंडातून फक्त एवढंच निघालं—

“अरे देवा...”

शीतल म्हणाली—

“हो. तिने तुला सांगितलं होतं.”

मी तिच्याकडे पाहतच राहिलो.

“आणि मी त्याला typing mistake समजलो?”

“हो.”

“मी... ignore केलं?”

“हो.”

मी कपाळावर हात ठेवला.

“माझ्यापेक्षा प्रेमात कमी बुद्धिमान माणूस शोधायला स्वतंत्र survey करावा लागेल.”

पण यावेळी मला स्वतःवर हसू आलं नाही.

कारण त्या messageचा अर्थ समजल्यावर मागच्या तीन आठवड्यांकडे पाहण्याची माझी नजरच बदलली होती.

मी तिला propose करण्यासाठी words शोधत होतो.

आणि...

कदाचित ती आधीच तिच्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचली होती.

शीतलचा आवाज पुन्हा गंभीर झाला.

“त्या movieच्या दिवशी ती तुला भेटायला फक्त movieसाठी आली नव्हती.”

मी तिच्याकडे पाहिलं.

“तिलाही तुझ्याशी बोलायचं होतं.”

माझं हृदय जोरात धडधडू लागलं.

“कशाबद्दल?”

शीतलने उत्तर देण्याआधी काही क्षण माझ्याकडे पाहिलं.

“तुला काय वाटतं?”

मी नजर खाली केली.

आता उत्तर समजत होतं.

ती पुढे म्हणाली—

“पण तू तीस मिनिटं उशिरा आलास.”

मी शांत.

“उशीर झाला असता तरी चाललं असतं.”

हे वाक्य ऐकून मला Priyankaने bus stopवर सांगितलेलं आठवलं.

Sorry म्हटलं असतंस तर विषय संपला असता.

शीतल म्हणाली—

“पण तू sorry म्हणण्याऐवजी Vijayला दोष दिलास.”

मी डोळे बंद केले.

तो पूर्ण scene पुन्हा दिसला.

Battery.

Clock.

Vijayने दहा वेळा sorry म्हटलं...

मी त्याला warning दिली...

Roomमधून बाहेर काढेन...

आज त्या सगळ्या खोट्या sentencesचा भार वेगळाच वाटत होता.

मी हळूच म्हणालो—

“मी मूर्खासारखा वागलो.”

शीतल म्हणाली—

“हो.”

मी तिच्याकडे पाहिलं.

“थोडं तरी sympathy दाखव.”

“तीन आठवडे झालेत. आता sympathyचा quota संपला.”

क्षणभर आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं.

पण ते लगेच विरलं.

मी विचारलं—

“मग तिने मला call का नाही केला?”

शीतल शांत झाली.

“तिने प्रयत्न केला आहे.”

“काय?”

“Messages केलेत.”

मी तिच्याकडे पाहिलं.

आणि पुढच्या क्षणी मला स्वतःच उत्तर मिळालं.

WhatsApp—

Delete.

Instagram—

Delete.

Facebook—

Delete.

Love Guru प्रशांतची strategy!

मी आकाशाकडे पाहिलं.

“प्रशांत...”

शीतलने विचारलं—

“काय?”

“काही नाही. एका महान relationship consultantची आठवण आली.”

पण आता मला त्याच्यावरही blame करायचा नव्हता.

कारण delete button प्रशांतने दाबलं नव्हतं.

मी दाबलं होतं.

आणि मला किमान एवढं तरी समजायला लागलं होतं—

आपल्या निर्णयाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून काही बदलत नाही.

मी शीतलला विचारलं—

“ती माझी वाट पाहतेय?”

शीतलने लगेच उत्तर दिलं नाही.

मग म्हणाली—

“श्रीधर, मी तुला एक गोष्ट सांगू शकते. ती दुखावली आहे. आणि तिला असं वाटायला लागलंय की कदाचित तिने तुझ्याबद्दल जे वाटलं, त्याला तुझ्यासाठी तितकी किंमत नाही.”

माझ्या छातीत काहीतरी दाटून आलं.

“पण मला ती आवडते.”

“मग तिला सांग.”

“मी सांगणार होतो.”

“‘होतो’ याचा काही उपयोग नाही.”

मी गप्प.

ती पुढे म्हणाली—

“आणि यावेळी कोणतीही story नको.”

मी तिच्याकडे पाहिलं.

“Vijay नाही.”

मी मान हलवली.

“Clock नाही.”

“हो.”

“Battery नाही.”

“समजलं.”

“Prashantची train नाही.”

मी तिच्याकडे पाहिलं.

“तो विषय sensitive आहे.”

शीतल हलकंसं हसली.

मग तिचा चेहरा पुन्हा गंभीर झाला.

“फक्त तू आणि Priyanka.”

काही क्षण आम्ही शांत बसलो.

मग मी तिला विचारलं—

“पण तू मला हे सगळं का सांगतेयस?”

तिने नजर थोडी दूर केली.

“कारण मला Vijay खूप महत्त्वाचा आहे.”

ती थोडी थांबली.

“आमच्यातही सगळं perfect नाही. कधी आम्ही एकमेकांना समजतो. कधी अजिबात समजत नाही. कधी त्याच्या काही गोष्टी मला दुखावतात; कधी माझ्या reactionsमुळे त्याला त्रास होतो.”

मी शांतपणे ऐकत होतो.

“पण मला एक गोष्ट कळायला लागली आहे—प्रेम फक्त समोरच्याने आपल्याला सतत समजून घ्यावं, आपल्याला हवं तसंच वागावं, एवढंच नसतं.”

ती माझ्याकडे पाहत म्हणाली—

“कधी बोलावं लागतं. कधी ऐकावं लागतं. कधी स्वतःची चूक मान्य करावी लागते. आणि कधी समोरच्या व्यक्तीला थोडी जागाही द्यावी लागते.”

मला कालचा Vijay आठवला.

Jijaji आठवले.

Prashant आठवला.

Mayuri आठवली.

आणि शेवटी—

Priyanka.

शीतल म्हणाली—

“मी तुला Priyanka काय उत्तर देईल हे सांगू शकत नाही.”

मी तिच्याकडे पाहिलं.

“पण तू अजूनही तिच्यावर प्रेम करत असशील, तर तिचं उत्तर काय असेल याचा अंदाज बांधत इथे बसू नकोस.”

ती थोडी पुढे झुकली.

“जा. तिच्याशी बोल.”

मी काही क्षण तसाच बसलो.

ती पुढे म्हणाली—

“आणि यावेळी तिला मिळवण्यासाठी जाऊ नकोस.”

हे वाक्य ऐकून मी थांबलो.

“मग?”

“तिला सत्य सांगण्यासाठी जा.”

माझ्या मनात काहीतरी बदललं.

आत्तापर्यंत माझा प्रश्न होता—

Priyanka मला मिळेल का?

पण आता पहिल्यांदा मला वाटलं—

तिने मला स्वीकारलं किंवा नाही...

किमान तिला माझ्या मनातलं खरं कळायला हवं.

कोणताही बहाणा नाही.

कोणताही blame नाही.

कोणतीही strategy नाही.

मी उठलो.

दोन पावलं चाललो.

मग थांबलो.

मागे वळून शीतलकडे पाहिलं.

“Thank you.”

ती फक्त हसली.

मी पुन्हा चालायला सुरुवात केली.

मग चालणं धावण्यात बदललं.

रस्त्यावर गर्दी होती.

बस येत होत्या.

Horn वाजत होते.

लोक आपापल्या कामासाठी धावत होते.

आणि मी?

मी त्या मुलीकडे निघालो होतो जिला मी इतके दिवस माझ्या प्रेमकथेची heroine समजत होतो...

पण आज पहिल्यांदा—

तिच्या बाजूची प्रेमकथा समजायला लागली होती.

माझ्या डोक्यात एकच message पुन्हा पुन्हा फिरत होता—

Good Night.
Sweet Dreams.
Take Care.
Miss You.
Love You.

"gnsdtcmulu"

ज्या messageला मी typing mistake समजलो होतो...

तो कदाचित माझ्या आयुष्यात मला मिळालेला सर्वात महत्त्वाचा message होता.

आणि मी तो तीन आठवडे उशिरा वाचत होतो.

मी बसस्टॉपच्या दिशेने धावत होतो.

यावेळी कोणत्याही trainची वाट पाहण्यासाठी नाही.

कोणत्याही Love Guruची theory सिद्ध करण्यासाठी नाही.

फक्त एकदा प्रियांकासमोर उभं राहून सांगण्यासाठी—

माझ्याकडून चुका झाल्या.

पण माझ्या भावना खोट्या नव्हत्या.

आता फक्त एकच भीती होती—

हे सांगायला...

मी पुन्हा उशीर तर केला नव्हता ना?

— भाग ९ समाप्त —

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users