लाल साडी, निळी साडी… श्रीधरची लव्ह स्टोरी भाग ३

Submitted by amol_koli on 14 October, 2026 - 08:01

स्वप्नातली अप्सरा आणि वास्तवातला आरोपी

भाग ३ — प्रेमात हरवलेला श्रीधर आणि प्रत्येक गुन्ह्याचा एकच संशयित!

चिंचवड बसस्टॉपवर उतरल्यावर मी गर्दीत प्रियांकाला शोधायला सुरुवात केली.

इकडे पाहिलं.

तिकडे पाहिलं.

बसस्टॉपवर लोकांची ये-जा सुरू होती.

पण प्रियांका दिसत नव्हती.

आणि तिला शोधता शोधता माझं मन पुन्हा एकदा भूतकाळात गेलं...

त्या लग्नात.

त्या निळ्या साडीकडे.

आणि तिला पहिल्यांदा पाहिलेल्या त्या क्षणाकडे.

---

सुनीता आत्याने म्हटलं होतं—

“श्रीधर, भेट... ही माझी मुलगी प्रियांका.”

मी वळलो...

आणि पाहतच राहिलो.

माझ्या कल्पनेतली प्रियांका लाल साडीत होती.

पण समोरची प्रियांका निळ्या साडीत होती.

आणि खरं सांगायचं तर—

त्या क्षणापासून लाल रंगाबद्दलचं माझं सगळं fashion knowledge निरुपयोगी ठरलं होतं.

ती निळी साडी तिला इतकी खुलून दिसत होती की क्षणभर वाटलं—

आपण इतका वेळ चुकीच्या रंगामागे का फिरत होतो?

लांब केस, मोठे काळेभोर डोळे आणि चेहऱ्यावरचं प्रसन्न हसू...

ती मला पाहून हसली.

आणि त्या एका हसण्यात माझ्या डोक्यात चालणारे सगळे विचार थांबले.

हीच प्रियांका?

आपण WhatsApp वर हिलाच red saree घालायला सांगितलं होतं?

माझ्या मनातलं पुढचं वाक्य मात्र आणखी धोकादायक होतं—

श्रीधर... तू गेलास!

तिने पुन्हा माझ्याकडे पाहिलं.

मला त्या क्षणी अगदी फिल्मी वाटत होतं.

आजूबाजूचा लग्नाचा गोंधळ जणू mute झाला.

लोक चालत होते...

पण मला ते slow motion मध्ये चालल्यासारखे वाटत होते.

प्रियांका माझ्यापासून दूर चालू लागली.

आणि माझी नजर नकळत तिच्या दिशेनेच गेली.

आता माझ्यासमोर एक नवीन problem होता.

तिचा नंबर माझ्याकडे आधीपासून होता.

Family WhatsApp group मध्ये असल्यामुळे नंबर मिळवण्याचा प्रश्नच नव्हता.

पण मला तिला थेट personal message करायचा नव्हता.

पहिल्यांदा तिच्याशी बोलून विचारावं असं वाटत होतं—

“मी तुला कधीतरी message केला तर चालेल ना?”

एवढंच.

साधं वाक्य.

पण ते बोलण्यासाठीही माझ्या मनाने वेगळीच romantic movie सुरू केली होती.

---

इकडे प्रत्यक्ष लग्नात मात्र वेगळीच परिस्थिती होती.

काका तणावात इकडून तिकडे फिरत होते.

काकूंची धावपळ सुरू होती.

कुणाला जेवणाची चिंता.

कुणाला पाहुण्यांची.

कुणाला व्यवस्था कमी पडतेय असं वाटत होतं.

आणि जीजाजी?

जीजाजींचा चेहरा पाहून असं वाटत होतं की लग्नातील संपूर्ण व्यवस्थेचं independent audit त्यांनी स्वतःकडे घेतलं होतं.

त्यांना कुठेतरी काहीतरी कमीच वाटत होतं.

पण मला?

मला आता काहीच फरक पडत नव्हता.

माझ्या जगात त्या क्षणी एकच department सुरू होतं—

Priyanka Tracking Department.

ती जिथे जाईल तिकडे माझी नजर.

ती कोणाशी बोलतेय?

कुठे बसतेय?

कुठे जातेय?

मला फक्त एक योग्य क्षण हवा होता—

तिच्याशी दोन मिनिटं बोलण्यासाठी.

मी तिच्या दिशेने चालत होतो.

आणि माझ्या डोक्यात तर पूर्ण cinema सुरू झाला होता.

मी slow motion मध्ये तिच्यामागे चालतोय...

ती पुढे चालली आहे...

आजूबाजूला सगळं धूसर...

आणि background मध्ये माझ्या मनाने स्वतःच एका जुन्या romantic गाण्याची धून सुरू केली होती.

वा श्रीधर...

काय scene आहे!

Hero तू...

Heroine प्रियांका...

आणि आज proposal नाही झाला तरी किमान personal chatting ची permission तरी मिळणार!

मी त्या कल्पनेत इतका हरवलो की समोर कोण येतंय, कोण जातंय, मला काहीच भान उरलं नाही.

अचानक—

“श्रीधर!”

मी थांबलो.

माझा cinema एका सेकंदात बंद.

समोर काका.

चेहरा तणावाने भरलेला.

मला मनातून प्रचंड वाईट वाटलं.

काका! Timing नावाची गोष्ट असते की नाही?

पण अर्थातच हे त्यांना बोलण्याची माझी हिंमत नव्हती.

मी चेहऱ्यावर जबाबदारपणा आणला.

“काय झालं काका? काही मदत हवी आहे का?”

काका जवळ आले.

“अरे, मोठा problem झालाय.”

“काय?”

“कुणीतरी जीजाजींना धक्का दिला. ते मागच्या रिकाम्या खुर्च्यांवर जाऊन पडले. दुखापत झालीय.”

“काय?”

माझ्या चेहऱ्यावर genuine shock होता.

काका पुढे म्हणाले—

“मी कोण होतं ते शोधतोय. तोपर्यंत तू जीजाजींना hospital मध्ये घेऊन जा. आधीच नाराज आहेत. आता हे प्रकरण वाढलं तर माझ्या मुलीला divorce देण्यापर्यंत बोलतील!”

मी खोल श्वास घेतला.

परिस्थिती गंभीर होती.

आता romance बाजूला ठेवणं गरजेचं होतं.

मी काकांच्या खांद्यावर हात ठेवला.

“काका, तुम्ही tension घेऊ नका. मी आहे. मी जीजाजींना घेऊन जातो. तुम्ही बाकीचं बघा.”

हे बोलताना माझी नजर सहज प्रियांकाकडे गेली.

आणि...

ती माझ्याकडे पाहत होती.

मला क्षणभर वाटलं तिच्या नजरेत माझ्याबद्दल कौतुक आहे.

बघ प्रियांका...

गरज पडली की श्रीधर जबाबदारीसुद्धा घेतो!

मी थोडा अधिक confident झालो.

छाती आपोआप दोन सेंटीमीटर पुढे आली.

पण त्याच क्षणी...

माझ्या डोक्यात काही सेकंदांपूर्वीचा एक scene rewind झाला.

मी प्रियांकाच्या मागे चालत होतो...

slow motion...

मनात romantic background music...

समोरून कोणीतरी माझ्या रस्त्यात आलं होतं.

मी त्याच्याकडे नीट पाहिलंसुद्धा नव्हतं.

फक्त—

अरे बाजूला ना...

अशा भावनेने मी त्याला बाजूला सारलं होतं.

तो माणूस मागे गेला होता...

मी मात्र प्रियांकाकडे बघत पुढे निघून गेलो.

माझा मेंदू अचानक थांबला.

एक मिनिट...

मी हळूच मान वळवली.

दूर जीजाजी बसले होते.

मी पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला.

तो चेहरा...

ते कपडे...

तो माणूस...

माझे डोळे मोठे झाले.

अरे देवा!

ज्याला मी माझ्या romantic slow-motion sequence मध्ये “बाजूला व्हा” म्हणून ढकलून पुढे गेलो होतो...

ते जीजाजीच होते!

माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी झाली.

म्हणजे काका ज्या अज्ञात आरोपीला शोधतायत...

तो आरोपी...

मी आहे?

मी प्रियांकाकडे पाहिलं.

मग काकांकडे.

मग जीजाजींकडे.

आणि पुन्हा काकांकडे.

मनात एकच विचार—

श्रीधर, प्रेम करायला आलास...

आणि स्वतःच्या cousin चा संसार मोडून जाणार आहेस!

आता काय करायचं?

काकांना सांगायचं?

“काका, आरोपी सापडला. मीच आहे.”

की आधी जीजाजींना hospital मध्ये नेऊन memory loss झालाय का ते तपासायचं?

माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला.

आणि अचानक—

“श्रीधर...”

कुणीतरी आवाज देत होतं.

“श्रीधर!”

आवाज जवळ येत होता.

“श्रीधर! अरे...!”

मी दचकून डोळे उघडले.

समोर—

प्रियांका!

---

मी अजूनही चिंचवड बसस्टॉपवरच होतो.

आणि प्रियांका माझ्यासमोर उभी होती.

“कुठे हरवलास?” तिने विचारलं.

मी काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिलो.

लग्न.

निळी साडी.

जीजाजी.

धक्का.

काका.

सगळं पुन्हा memory मध्ये गेलं.

आणि माझ्या मेंदूने वर्तमानातला सर्वात महत्त्वाचा विषय पकडला—

मी तीस मिनिटं उशिरा आलो होतो!

मला माफी मागायची होती.

सरळ.

साधी.

मनापासून.

पण त्या दिवशी माझ्या तोंडाने मेंदूचा सल्ला न घेण्याचा निर्णय घेतला असावा.

मी सुरुवात केली—

“ऐक प्रियांका... खरं तर यात माझी चूक नाही.”

तिच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला.

मी पुढे म्हणालो—

“हे सगळं विजयमुळे झालं.”

“विजयमुळे?”

“हो!”

आता एक खोटं वाचवण्यासाठी माझ्या मेंदूने पूर्ण पटकथा लिहायला सुरुवात केली.

“त्याने घड्याळाची battery बदलली नाही. त्यामुळे घड्याळ बंद होतं. मला चुकीची वेळ दिसली. म्हणून उशीर झाला.”

ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती.

हा silence मला encouragement वाटला.

ती प्रत्यक्षात मला स्वतःसाठी खड्डा किती खोल खणतोय ते पाहत होती, हे मला तेव्हा समजलं नाही.

मी पुढे बोलत राहिलो—

“मी विजयला खूप ओरडलो.”

प्रियांका काही बोलली नाही.

“त्याला त्याची चूक समजावून सांगितली.”

अजूनही शांतता.

“त्याने मला दहा वेळा sorry म्हटलं.”

तिच्या भुवया किंचित वर गेल्या.

पण आता माझी कथा full speed मध्ये होती.

“तो खूप regret करत होता. म्हणाला पुन्हा अशी चूक होणार नाही.”

मी थोडा mature चेहरा केला.

“मी म्हटलं, ठीक आहे विजय. माणसाकडून एक चूक होऊ शकते. मी तुला एक chance देतो.”

प्रियांकाने माझ्याकडे पाहिलं.

मी अजून थांबलो नाही.

“पण मी त्याला clear warning दिलीय.”

“कसली?” तिने पहिल्यांदा विचारलं.

मला वाटलं—

झालं! पटली story.

मी confidence ने म्हणालो—

“मी त्याला सांगितलं, पुन्हा असं केलंस तर तुला room मधून बाहेर काढेन! कारण मी रागावलो ना, तर खूप रागावतो.”

शांतता.

एक सेकंद.

दोन सेकंद.

तीन सेकंद.

प्रियांकाने दीर्घ श्वास घेतला.

मग अगदी शांतपणे विचारलं—

“म्हणजे... हे सगळं विजयमुळे झालं?”

“हो!”

मी लगेच उत्तर दिलं.

“पूर्णपणे?”

“Absolutely.”

ती पुन्हा शांत.

आणि मग म्हणाली—

“Go to hell, Shridhar.”

माझ्या चेहऱ्यावरचं confidence गायब.

“काय?”

“मी विजयशी आधीच बोललेय.”

माझ्या पोटात गोळा आला.

“का... काय म्हणाला तो?”

“तो म्हणाला, घड्याळाची battery आणायची जबाबदारी तुझी होती.”

माझा चेहरा उतरला.

“पण... म्हणजे... technically—”

“आणि तू इथे येऊन पूर्ण blame विजयवर टाकतोयस?”

“नाही, तसं नाही. मी फक्त परिस्थितीचं—”

“बस!”

ती माझ्याकडे रागाने पाहत म्हणाली—

“तू उशिरा आलास, तेही चाललं असतं. Sorry म्हटलं असतंस तर विषय संपला असता.”

माझ्याकडे त्यावर काहीच उत्तर नव्हतं.

“पण स्वतःची चूक विजयवर टाकलीस?”

ती वळली.

“मी घरी जातेय.”

“प्रियांका, ऐक ना—”

ती मागे न पाहताच म्हणाली—

“माझ्यामागे येऊ नकोस!”

आणि चालू लागली.

मी जागच्या जागी उभा.

प्रशांतचा shirt अंगावर.

प्रशांतचं jacket अंगावर.

मनात proposal.

हातात movieचा plan.

आणि समोरून निघून जाणारी प्रियांका.

काही क्षण मला एकच प्रश्न पडला—

हिला खरं कसं कळलं?

माझ्या आयुष्यात एक विचित्र pattern होता.

घटना घडताना मला काहीच माहिती नसायचं.

पण investigation पूर्ण झाल्यावर...

कुठूनतरी माझंच नाव बाहेर यायचं!

लग्नात जीजाजींना कोणी ढकललं?

श्रीधर.

घड्याळाची battery कोणी आणली नाही?

श्रीधर.

प्रियांकाला तीस मिनिटं कोणी वाट पाहायला लावली?

श्रीधर.

आणि स्वतःची चूक विजयवर कोणी ढकलली?

दुर्दैवाने...

तोही श्रीधरच.

मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो.

मनात फक्त एकच विचार आला—

मला अजूनही समजत नाही...

माझ्या आयुष्यात problem आधी येतो आणि मी नंतर त्यात अडकतो...

की problemच माझ्याकडे बघून म्हणतो—
“चला, आज श्रीधरला शोधूया!”

आणि सर्वात मोठी अडचण अजून बाकीच होती.

आज मी तिला—

प्रपोज करणार होतो.

आता “I love you” तर खूप दूरची गोष्ट होती...

सध्या तर मला तिच्याकडून पुन्हा एकदा—

“तोंड दाखवायला हरकत नाही”

एवढी permission मिळवायची होती!

— भाग ३ समाप्त —

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users