Submitted by अर्जुन ..✍️ on 2 October, 2026 - 05:41

ना लाभले भाग्य कधी देव्हाऱ्यात सजण्याचे,
ना नशिबी आले फूल म्हणून देवाचरणी पूजण्याचे!
प्रेमाचे प्रतीक असे बिरुदही ना मिळाले,
कधी कुणाच्या गजऱ्याची शोभा होता ना आले!
लोकांच्या उपेक्षेला धुडकावून हे रानफूल,
निसर्गाच्या कुशीत स्वच्छंद उमलले!
या फुलासम आपणही बहरत जावे,
आपल्याच अटींवर फक्त जगात राहावे!
चैतन्याच्या रंगांची उधळण करावी,
आनंदाच्या सुगंधाची लयलूट करावी!
समाजाच्या या चौकटींना झुगारून द्यावे,
स्वतःचे आयुष्य फक्त आपल्याच धुंदीत जगावे!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा छान छान.
वा वा छान छान.
कविता लिहिता आली असती तर राजफुले किंवा अज्ञानीफुले नावाची कविता तुमच्यापासून प्रेरणा घेऊन लिहिली असती.
धन्यवाद! जमेल तशा काही ओळी
धन्यवाद! जमेल तशा काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कविता आवडली हे वाचून खूप आनंद झाला. भविष्यात एक दिवस तुमची 'राजफुले' ही कविता वाचायला नक्कीच आवडेल.
कव्हर पेजवरील सुंदर फोटो
कव्हर पेजवरील सुंदर फोटो आमच्या कॉलेजची मैत्रीण कल्याणीने टिपला आहे. या फुलाविषयी इंटरनेटवर वाचत असताना, याचे नाव "चवर" असल्याचे समजले. दरवर्षी रायरेश्वरच्या पठारावर अशी असंख्य रानफुले उमलतात
ऑगस्ट महिन्यात कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींसोबत रायरेश्वरला केलेल्या ट्रेक आणि सहलीदरम्यान ही सुंदर रानफुले पहिल्यांदाच जवळून पाहायला मिळाली आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. या मनमोहक रानफुलांना पाहून मला हि कविता सुचली.
फोटो क्रेडिट: कल्याणी (इंस्टाग्राम पेज - "Ti phulraani")