एक वळण अजून...

Submitted by vishnumanik on 25 June, 2009 - 14:27

बोलवणं आलं तेव्हा मी या शहराच्या गर्दीत कुठेतरी हरवून बसलो होतो पण...
ती संवेदनाच होती अंगावर शहारे आणणारी...
देहाचा प्रत्येक कण जणू पेटून उठला!!
स्वतःच्या शरीराची जाणीव प्रचंड प्रखरतेने करून देणारी एक शिरशिरी...
उतरत गेली.. मणक्यांतून...
आणि मी बेफाम निघालो..
वाटा चुकवत, नजरा टाळत...
प्रत्येक क्षणावर लादलेलं युगायुगांच ओझं पेलत
पण हाय रे दैवा....

आज प्रत्येक लाल दिवा माझ्याकडेच वटारून बघतो आहे...
प्रत्येक खळगा आज माझ्याच गाडी खाली येतोय...
प्रत्येक गाडी आज एक रिक्षा बनून चालते आहे...
आज मी वेगात आहे की जग संथ झालंय??

रस्त्याच्या प्रत्येक हिंदोळ्यासोबत शरीराच्या रोमारोमात उठणारी आंदोलनं
निग्रहानं परतवित मी संयमाची पराकाष्ठा करतो आहे...
डोक्यावर तरंगत्या या तलवारीचा हलकासा स्पर्शही आत्मसन्मानाची होळी करणारा...

मन आणि शरीर यांच्या या अविरत द्वंद्वात मी प्राणांतिक धावतो आहे...
माझ्या ध्येयाकडे...
मनाला सतत बजावित...
या निसरड्या वाटेवर फक्त एक... फक्त एक वळण अजून...

**************************************************
(कविता वाचून विचार आला ना मनात - की ही कविता काहीच्या काही कशी? तर मग जरा कल्पना करा की तुम्ही शहराच्या मधे गर्दीत बाइक वर आहात... कालच्या पार्टीत झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून पोटाने अचानक बंड केलंय आणि घरी पोचून सगळ्या "शंकांच" निरसन व्हायला किमान अर्धा तास तरी अजून आहे. Proud
- स्वानुभवावर आधारित....)

माझ्या ध्येयाकडे...
मनाला सतत बजावित...
या निसरड्या वाटेवर फक्त एक... फक्त एक वळण अजून...>>>>

मला इथे धडकन मधल्या देवचा ' बस एक...और एक कदम, देव ! ' डॉयलॉग आठवला ! Happy
कविता छान !

हम्म्म. ताणतणावाचे प्रत्ययकारी चित्रण. Lol

असे कोणत्याही परिस्थितीत होऊ शकते, चांगले चित्रिलेय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

कविता आवडली.
मी बाईक चालवतो तेव्हा हे अनुभव घेतलेत. इतरही आहेत.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे