Submitted by Sharmila Ranade on 11 August, 2026 - 06:08
पक्षी येतो, काचेवर बसतो
बहुदा स्थलांतरीत असतो.
आत येता येत नाही
उडून मात्र जात नाही ..
काचेवरच नक्षी काढतो ..
काचेलाच चोच मारतो ..
चोचीमधला अर्धा दाणा
काचेमधून कसला देतो?
काच काही फुटत नाही..
पक्षाशी गाठ सुटत नाही ..
काचेमधून दिसतो नुसता
पक्षी काही भेटत नाही..
आभाळ भरून येत असता
दुःखाची तो गाणी गातो ..
काचेवरच्या थेंबांना मग
माणूस, पावसाचं पाणी म्हणतो....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान.
छान.
सुंदर. अर्थपूर्ण.
सुंदर. अर्थपूर्ण.
सुंदर !!!
सुंदर !!!