आठवण

Submitted by prachee on 30 December, 2007 - 09:58

हल्ली नेहमीच असं होतं. तुझी खुप आठ्वण येते... खास करुन सन्ध्याकाळी. देवापुढे दिवा लावताना, भाजी परतताना,गरम भाताचा वास उरात भरुन घेताना. तुझी आठवण येते आणि सगळं काही विसरायलाच होतं. मग तव्याचा चटका बसतो हाताला ...चर्र....! मगच मी भानावर येते...
का? का होतंय असं???? तु जवळ नाहीस म्हणुन...??? पण मग गेली ८ वर्षं आपण भेटलोही नाही. तेव्हा कधी येवढा आठवला नाहीस तु... मग आताच का?

१० वर्षांपुर्वी भेटलो आपण. चांगले मित्र झालो. पण फक्त मैत्री होती ती? नाही... कदाचित हो.... एका क्षणाला वाटुन गेले हे नाते नक्कि काय???? होय, मैत्रीच आहे आपली.

पण मग युथ फेस्टिवल वरुन परत येताना गाडीतल्या अंधारात तु कानात कुजबुजलास्,"पियु, तु मला खुप आवड्तेस... पण...." 'तो' पण मला तेव्हा कळलाच नाही... तु पुढे काय बोललास्,गाडी कधी थांबली आणि मी कधी घरी पोहचले... काही काही आठ्वत नाही....

आणि एक दिवस तु माझी ओळख नीलाशी करुन दिलीस्...
"पियु, ही नीला. माझी फियांसी.. आणि नीलु..ही पियु, माझी...मैत्रिण"

"हाय नीलु..."
"हाय... आशुकडुन खुप ऐकलेय तुझ्याबद्दल.."
"पण मला आशु काहीच बोलला नाही....."
"ए पियु, तुला मी सांगितले नाही का त्या दिवशी गाडीत....."
"अं... हो..हो.... चल मी निघते...उशीर झालाय आधीच."

खरंच्...खुप उशीर झाला होता.....

हळुहळु मी सावरले.....मग अखिल भेटला.....

मला आठ्वतं आमच्या लग्नाला तु आलाच नाहीस.... मी तुला आमंत्रणच दिले नाही.

अखिलला ते आवडलेच नसते....त्याने तसे स्पष्ट सांगितले होते मला...
मीच सांगितले होते त्याला सारे....सारे काही.....
पण तो एक 'नवरा' होता.... कथाकादंबरीतला 'समजुतदार नवरा ' नाही.... खराखुरा न..व...रा....

पण्...कदाचित म्हणुनच मी तुला विसरु शकले नाही...मला तुझी निखळ मैत्री हवी होती रे.....एका क्षणाने ती मैत्रीही हिरावुन घेतली.....

नंतर अचानक तु भेटलास..नंदुच्या लग्नात.....
कार्यालयात जाताना तु सहजच म्हणालास्,"पियु, मला खुप काही बोलायचे आहे....माझ्या गाडीतुन चल"

मध्येच गाडी थांबवुन म्हणालास," पियु, त्या दिवशी मी जे काही बोललो..ते खरंच होतं.... मला तु खुप आवड्तेस्..पण,तु भेटण्या आधीच मी नीलूला वचन देउन बसलो होतो.... मी तिला काय सांगणार होतो????? मला माहित आहे... तुला खुप त्रास झाला या सगळयाचा....पण तुझ्याबरोबरीने मीही पोळलो आहे यांत... हा कोंडमारा अगदी असह्य झाला तेव्हा नीलुशी बोललो....सगळं सांगुन टाकलं तिला"

"म्हणजे... तिला सगळं माहित आहे..? शी, काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल..?"

"नाही ग. ती खुप चांगली आहे....समजुन घेतलं तिनं सारं...आजही मला तुझ्याशी सगळं बोलता यावं म्हणुन ती आली नाही माझ्याबरोबर.... आजच काय्...जेव्हा जेव्हा तुझ्या आठ्वणीने मी व्याकुळ झालो...तिने समजुन घेतलं मला..."
"पियु, मला माफ करशील ना?"

मी तुला कधीच माफ केलयं आशु....
पण तुला विसरु नाही शकले अजुनही....
कधी कधी माझी मलाच लाज वाटते... भरपुर प्रेम करणारा नवरा, दोन सोन्यासारखी मुलं.....सगळी सुखं जवळ असताना....मला तुझी आठ्वण का येते???? का??

तु कुठे असशील? काय करत असशील???? शोधत राहते तुला...मायबोलीवर्...ओर्कुटवर्.....यारीवर....
कुठेतरी तु दिसशील या आशेने नजर भिरभिरत राहते...........बाजारात्....स्टेशनवर्....सगळीकडे...

हल्ली नेहमीच असं होतं. तुझी खुप आठ्वण येते... खास करुन सन्ध्याकाळी.......

गुलमोहर: 

सही लीहील आहेस..... सगळ कस एकदम.....
एकटा.....

अव्यक्त प्रेम यालाच म्हनत असतिल नाहि का?

फार म्हणजे फारच सुरेख लिहिलंय. भावनांचा सच्चेपणा शब्दाशब्दातून जाणवतो.

खुप खुप आभारी आहे तुम्हां सर्वांची. पहिलाच प्रयत्न आहे.
तुमच्या उत्तेजनाची खुप गरज होती.प्रतिसादाचे पान उलगडेपर्यंत जीवात जीव नव्हता.
पण छान वाटले प्रतिसाद वाचुन.

छान आहे की पहिला प्रयत्न. स्टाईल एकदम छान.
पण शेवट थोडा कन्फ्युजिंग आहे. एक प्रसंग रंगवलाय इतक्या वर्षांनंतर भेटण्याचा पण तो अर्धवट राहिला असे वाटतेय. प. प्र. आहे म्हणून मत मांडले.

हो का ग...? लिहिण्याच्या नादात हे लक्षातच नाही आलं. आता नीट लक्ष देईन. धन्यवाद.

एक 'कथा' म्हणून खूपच शॉर्ट वाटली. अर्थात कथा लांबलचक असली पाहिजे असं काही नाही, पण कथेच्या विषयाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे अगदी 'वरवरची' वाटली. जिथे खुलवता आली असती तिथेच नेमकी खुलली नाही त्यामुळे.

सुरवातीच्या पॅरा वरुन वाटलं की त्या "का?" चं उत्तर असेल किंवा ते शोधायचा प्रयत्न असेल पुढे पण तसं काही नव्हतं. कारण शेवटचं भेटूनही ८ वर्षं झालीत आणि हल्लीच खूप आठवण येते आहे असं लिहिल्यामुळं('गेली ८ वर्षं आपण भेटलोही नाही' असं सुरवातीला आहे, म्हणजे नंदूच्या लग्नात भेटून ८ वर्षं झाली ना?). त्या पियू च्या विचारातही सुसूत्रता नाही वाटली. मैत्रीच आहे अशी खात्री होती, मग बसमधल्या प्रसंगामुळे एकदम वेगळे वळण मिळाले असे समजले तरी, त्याच वेळी आशूने तिला नीलूबद्दल सांगितले असे पुढच्या संवादावरुन वाटते. त्यामुळे "गाडी कधी थांबली आणि मी कधी घरी पोहचले... काही काही आठ्वत नाही" यात तिने ते ऐकले नाही असं जरी सुचवायचं असलं तरी ते पटत नाही. प्रसंगातले संवाद कुठे संपतात आणि पियूचे स्वगत कुठे सुरु होते यात पण वाचताना गोंधळ होतोय.

नाऊमेद करण्याचा हेतू नाही, कृपया गैरसमज नसावा. प्रवासवर्णन, अनुभवकथन, व्यक्तीचित्रण यापासून सुरवात करता येईल. या गोष्टी लिहायला तुलनेने सोप्या असतात. कथाही स्वानुभवावर, सत्यघटनेवर आधारित असतात पण त्याला कथेचा "टच" द्यावा लागतो. जमेल, प्रयत्न चालू ठेवा.

-लालू

नाही हो, अजिबात गैरसमज होणार नाही. तुमचे मुद्दे पटले. पहिलाच प्रयत्न असल्याने त्रुटी होत्या.
सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन. तुमच्या सुचनांचा विचार करेन.

>तु कुठे असशील? काय करत असशील???? शोधत राहते तुला....

खरे आहे! सगळे मिळुनही कधी कधी जुन्या आठवणी अश्याच जाग्या होतात.

सुंदर रेखाटले आहे!

अगदी मनला स्पर्श करुन जाते....खरचं खूपच छान आहे....

हाय किलबिल
वा एका दमात तु सांगितलस (लिहीलस) तसच वाचतांना मी एका दमात वाचल Happy खुप घाईत सांगितलस म्हणजे काय कित्ती कूणाकुणाला सांगु अस होत अगदी तसच Happy
छान .... लिहीत रहा .

खुपच छान जमले आहे. कहि ठिकाणि तुटक वाटले, पण पहिला प्रयत्न म्हनुन योग्य.... विषय सुदंर होता.....