बळीराजा

Submitted by Vithuraya on 21 June, 2009 - 12:26

भरलेल्या डोळियांनि धनी पाहि आभाळात
आसुसलि हि धरणि धान्य लपुन पोटात

आल्या पावसान बाई नाहि भागलि ताहान
डोळे थकले पाहुन सुखि जिन्याचं सपान

हिरवा तो शालु आता धरति पांघरल कधि?
तरारल पिक कधी तिच्या रोमा रोमा मधि ?

गाई-वासरं फिरती वन-वन रानोमाळ
नाहि चारा नाहि पाणि कसा ईपरित काळ

येवो दया लेकरांचि दयाघना मेघराजा
सुखि सारेच होतिल सुखावेल बळीराजा

(उपरोक्त ओळि 'आरे संसार संसार....' गाण्याच्या चालिला धरुन आहेत)

गुलमोहर: 

आवडली कविता.

छान

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

छान. दयाघना मेघराजा..
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

कविता आवडली