Submitted by द्वैत on 5 December, 2025 - 06:23
जळून जाता सचेत हिरवळ
दिसू लागल्या खोल खुणा
ओंजळभर पाण्यात शोधसी
बिंब कुणाचे पुन्हा पुन्हा
दिशा हरवल्या पक्ष्यांच्या
अन झाडामागे ऋतू दडे
काठ सरकता मागे मागे
पात्रामधले मोज तडे
ओढ सावली तुझी तुझ्यावर
चढे उन्हाचा प्रहर जरा
कातळ फुटता लागे कातळ
कुठे हरवला शोध झरा
द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख.
सुरेख.
सुंदर
सुंदर
आहाहा सुंदरच
आहाहा सुंदरच
सुंदर
सुंदर
खूप सुंदर. मी आता
खूप सुंदर. मी आता कवितांच्या बाबतीत ढ झाले आहे पण ही कविता थोडी समजली असं वाटतंय. Over the years, the innocent youth is gone, the reality sinks in.
In such times, give yourself some love, kindness and do find out the source of your once loving soft nature and free it ONCE AGAIN.
असंच म्हणयचं होतं का कविला ?
माझ्या मात्र डोळ्यासमोर एखादे
माझ्या मात्र डोळ्यासमोर एखादे भिकारी मूल आले. ज्याला ना धडधाकट आई-बाप. ज्याच्या मागे वणवण आहे आयुष्याची.
---------
जरी भूतकाळातील हिरवळ हा संदर्भ माझ्या अर्थामध्ये, अनाठायी आहे तरीही.