भेट पहिलीच

Submitted by मी कल्याणी on 17 June, 2009 - 05:21

जरासा गोंधळ.. किंचित हुरहुर..
मनात दाटलेली, एक भावना आतुर...

बोलायचय खुप काही.. पण शब्द मिळत नाही..
शब्द मिळाले तरी .. नेमकं.. बोलणं जमत नाही...

'ओके' 'आय सी' च्या पुढे गाडी सरकत नसते..
ह्रदयात अनामिक धडधड वाढत असते..

'आणि काय.. बाकी काय..' प्रश्न पडत रहातात..
'सिंगल आहेस का?' विचारण्याचं धैर्य गमावत जातात..

फ्रेंडस बुकस.. सारे सारे विषय संपून जातात..
ह्रदयातली स्पंदनं तिथंच अड्कून पडतात..

'खूपच बिझी असशील ना..' ओठातून उमटत..
'परत कधी भेटशील..' नजरेतून उमगत..

घड्याळ सरकत असत.. तगमग वाढत रहाते..
वेळ मिश्कील हसून आपल्याकडे पहाते...

'ड्रॉप करू का..' त्याचा प्रश्न उमटतो...
मनातलं 'होssss..' मनातच राहून ,
'नको रे' आपण उगाच बडबडतो...

तरी 'मनकवडा' तो.. सोडायला येतोच..
आता तरी बोल.. आपण स्वतःला बजवतो...

आपला 'मनस्वी' फोन नेमका आत्ताच किणकिणतो..
'इथही पोपट.." आपण वैतागतो..

घर येतं.. बाय, टेक केअर संपतं...

त्याच्याही नकळत तो हात पुढे करतो...
थरथरत्या हातांसवे..कधी भेट्शील.. विचरतो..

finally... जीव भांड्यात पड्तो..
'लवकरच..' म्हणून तोही cute हसतो..

हुरहुरत्या आठवणींची ही डेट संपते..
'बेटर लक नेक्स्ट टाईम..' माझ्यातली मी म्हणते..

'आता नक्कीच पुढचं पाऊल..' मनाला समजावते...
मग.. शेवट् नाही...
....................... ही तर पहिलीच भेट असते.........

--कल्याणी गौरव

गुलमोहर: 

सुंदर...

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

म्हण्जे तो नशिबवानच म्हणायला हवा, कारण अशा प्रकारचे मनोगत मुलांचे असतात....
बाकी कविता छान ....

वा .... जुन्या आठवणी जाग्या केल्यास Happy

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)
आमचे नवीन पाडकाम : http://www.maayboli.com/node/8637

व्वा!!! खरंच मस्त!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

काय सुरेख कविता आहे...
................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?

'खूपच बिझी असशील ना..' ओठातून उमटत..
'परत कधी भेटशील..' नजरेतून उमगत..

अप्रतिम काव्य, कल्याणी.. मला "हसरे दु:ख" पुस्तकातला चार्ली चॅप्लिनचा एक प्रसंग आठवला. अगदी हुबेहुब असाच आहे Happy

कल्याणी खुपच मस्त...

चार पावल चालायची म्हणताना
तुझा सोबत चालत राहिलो....
आता मागे परतायच तर
स्वताचीच वाट हरऊन बसलो....

चारोळी माझी नाहीये पण छान आहे म्हणुन टाकली.....

मस्त.. !