Submitted by अनन्त्_यात्री on 20 October, 2024 - 08:43
भौतिकशास्त्रातील जटिल भानगडींनी भंजाळून जायचो
तेव्हा आइन्स्टाईन एक अप्राप्य आदर्श
-नव्हे प्रेषितच- वाटायचा
मग एकदा
लोबाचेव्स्किच्या भन्नाट भूमितीने
युक्लीडच्या भारदस्त भूमितीला
जिथे फाट्यावर मारले
तिथे
अगदी तिथेच
पिंजारल्या पिकल्या केसांचा
मिश्किल म्हातारा उपटला.
म्हणाला," न्यूटनीय भौतिकीतील न्यूनत्व सावरणाऱ्या
सापेक्षतावादाची पुरेशी पुंजी
माझ्या गाठीशी असूनही
पुंजवाद पचनी पडलाच नाही माझ्या
अन् शिवाय
UFT(#)च्या गाठोड्याची गहन गाठ सोडवूच शकलो नाही शेवटपर्यंत"
तेव्हा कळलं
प्रेषितांचे पाय मातीचेच असणे
हा नियम असतो
अपवाद नव्हे
~~~~~~~~~~~~
(#): Unified Field Theory
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>तेव्हा कळलं
>>>तेव्हा कळलं
प्रेषितांचे पाय मातीचेच असणे
हा नियम असतो
अपवाद नव्हे>>>> व्वा... सुंदर
धन्यवाद द. सा .
धन्यवाद द. सा .