सुर्यास्त

Submitted by विकास on 25 December, 2007 - 18:15

कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा

sunset.jpg

गुलमोहर: 

विकास फोटो चांगले आहेत. काही गोष्टि करुन बघ.अर्थात खुप बेसिक आहेत.
१. बहुतेक फोटोत चंद्र आणि सुर्य अगदी मध्यभागी आहेत(आणि काही फोटोत अगदीच कोपर्‍यात) ते टाळ. मध्यभागी मुख्य ऑब्जे़क्ट पक्त तेव्हाच चांगला वाटतो जेव्हा चित्रात सिमीट्री असते. उदा. जर रेफ्लेक्शन जर सिमिट्रिकल असेल तर सुर्यास्तात सुर्य मध्य भागाच्या आसपास ठेवला तरी चालतो.
२. पोर्णिमे चा चंद्र जवळ जवळ सुर्या येव्हढाच प्रकाश परावर्तीत करतो. त्यामुळे सनी १६ रुल प्रमाणे १६ अपर्चर ला १०० चे एक्स्पोजर मिळते. आकाश थोड निळसर हवे असेल तर थोड ओव्हर एक्स्पोज कर (film speed setting 100, F 16/60 sec). अर्थात वातावरण प्र्यत्येक वेळि नक्कि कसे असेल ते सांगता येत नाही म्हणुन ब्रॅकेटिंग कर. जर चंद्र चत्कोर्बरच असेल तर एक्स्पोजर बाध्वुन बघ. शक्यतो ३०० फोचुल लेन्ग्थ ची लेन्स वापर (which I believe you have).
३.सुर्यास्त टिपताना सुर्य बिंबाच्या साधारण फुट भर वर किंवा खाली स्पॉट मिटर कर. त्यामुळे सुर्यास्ताचे रंग व्यवस्थीत मीळतील. जर silhouette हवे असेल तर अंडर एक्स्पोज कर. जर ऑटो एक्स्पोजर वापरत असशील तर १ ते २ स्टॉप निगेटिव्ह कॉम्पेन्सेशन करुन बघ. तुझ्या मी कमेंट लिहलेला फोटो सोडला तर बाकिच्या फोटोत सूर्य जास्त एक्स्पोज झालाय

४.वाईड ओपेन अपर्चर टाळ कारण त्यामुळे सूर्य blob न दिसता व्यवथीत डिफाईन होइल

तुज्या फोटो ची EXIF info बघ.त्यावरुन अंदाज येईल.

विशेषतः चंद्राचे
सुर्याचे जरा जास्त एक्सपोज झाल्यासारखे वाटतात.
शेवटचा बिल्डीग्जचा जो फोटो आहे त्यात रंग जरा गडद वाटतात. थोडे हलके हवे होते - मग ते अजून छान दिसले असते असे मला वाटते.
[हे बहुतेक व्हाईट बॅलंसिंगने करता येते].

अजय - सनी १६ रूल काय असतो ? [जरा गूगल करून बघतो मी]
तुझ्या प्रतिसादातूनही काही नविन गोष्टी शिकायला मिळाल्या. धन्यवाद!!

गुगल करुन सापडेलच पण थोडक्यात on bright sunny day if you keep apperture on 16 your exposure should be close to film speed or ISO senistivity you have configured .म्हणजे जर फिल्म स्पीड/ISO 100 असेल तर एक्स्पोजर १२५ ठेवायचे जर ISO 200 असेल तर तेच एक्स्पोजर २०० ठेवायचे

अजय,

tips बद्दल खुप आभारी आहे. पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. मला साधारण वाटलच होतं की सुर्य wide aperture मुळे बेढब झाला असावा. पण ह्या point & shoot cameryala फक्त F8 पर्यंत मर्यादा आहे. Sad Thanks again!

नकुल, धन्यवाद. इमारतींचा रंग सुर्याच्या उन्हामुळे गडद झाला होता आणि मला तसाच टिपायचा होता. म्हणुनच मुळ फोटोमध्ये cropping aani resizing व्यतिरिक्त काहिहि बदल केला नाही. Happy

चांगली माहिती मिळाली. (किती कळाली हा भाग वेगळा :))

हा फोटोही आवडला.

-परागकण