तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 January, 2024 - 07:26

तुमचा कधी वर्तमानपत्रात फोटो आला आहे का? असा एक धागा मायबोलीवर यापुर्वीच आला आहे.
तर आता त्याच धाग्याला अपग्रेड करून तुम्ही कधी टीव्हीवर झळकला आहात का हा धागा काढत आहे.

धागा काढायचे तात्कालिक कारण म्हणजे नुकतेच माझी मुलगी टीव्हीवर झळकली. पराक्रम म्हणाल तर एक स्त्री दुसर्‍या स्त्रियांच्या सुखदुखात सामील होताना कॅमेर्‍यात कैद झाली Happy

त्याचा विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=uQkWOlM2qrI

मी स्वत: क्रिकेटचा प्रचंड मोठा चाहता आणि (feminism) स्त्रीवादाचा पुरस्कर्ता असल्याने जितक्या आवडीने पुरुष संघाच्या क्रिकेट मॅचेस पाहतो तितक्याच आवडीने महिला संघाच्या देखील बघतो. यातूनच लेकीला सुद्धा क्रिकेटची गोडी लागली. ती क्रिकेट बघण्यापेक्षा क्रिकेट खेळणे जास्त पसंद करते. पण अध्येमध्ये स्कोअर काय झाला, कोण जिंकतेय, कोहलीने किती मारले वगैरे चौकशी करत असते. काही दिवसांपुर्वी माझ्याकडे आली आणि म्हणाली की भारत-ऑस्ट्रेलिया महिलांचे क्रिकेट सामने होणार आहेत. ते मला बघायला जायचे आहे...

ठिक आहे जाऊ म्हटले. तसे तिने अजून दोनतीन मैत्रीणी जमवल्या. पण अचानक उद्भवलेल्या परीस्थितीमुळे मला जाता आले नाही. अजून एक-दोन मैत्रीणींचे वडील सोबत असल्याने तशी चिंता नव्हती. तरी आपल्याला जाता आले नाही याची चुटपुट लागली होतीच. पण ती परत आल्यावर मला समजले की मी काय गमावले होते. वरच्या व्हिडिओत बघून ते समजेलच...

पण मी सुद्धा जर तिच्यासोबत टीव्हीवर झळकलो असतो तर ती माझ्या आयुष्यातली पहिली नाही तर दुसरी वेळ असती.

विजेटीआय कॉलेजला डिप्लोमा करत असतानाची गोष्ट. तेव्हा जितेंद्र जोशीचा कॅम्पस म्हणून एक कार्यक्रम गाजत होता. कार्यक्रमाची रुपरेषा अशी की दर एपिसोडला एखाद्या कॉलेज कॅम्पसमध्ये जाऊन तिथल्या पोरांबतबत धमाल करायची. आमच्या कॉलेजला ईतकी धमाल केली की त्याचे दोन एपिसोड बनले. कालपासून युट्यूबवर शोधत आहे. ईतर बरेच सापडले, पण आमचा नेमका सापडत नाहीयेत.

असो, तर आम्हीही गाणी म्हटली, नाच केला, दंगा घातला. आमच्या ग्रूपचे जय जय महाराष्टृ माझा गाणे कार्यक्रमात पुर्ण दाखवले गेले. आमच्या मुलींनी एका हिंदी गाण्याला मराठीत गायले, ते सुद्धा बहुधा दाखवले गेले. एक वाक्य दिले होते आम्हाला. आई एक नाव असतं.. याची पुढची ओरिजिनल ओळ घरातल्या घरात गजबजलेले गाव असते अशी आहे. आम्हाला आमच्या मनाने बनवायला सांगितली होती. मी म्हटलेले की पुढे बाबांचेच आडनाव असते, पण ते बहुधा सेन्सॉर कट झाले.

काही हरकत नाही. पण पुरेसा वेळ मी टीव्हीवर झळकलो होतो. माझ्या आईने कार्यक्रमाची वेळ सर्व नातेवाईक मित्रमैत्रीणींना सांगितली होती. सोबत हे सुद्धा सांगितले होते की आधी कल्पना असती तर गधड्याला चांगले कपडे घालून पाठवले असते. त्यांच्यामते मी तेव्हा फार गबाळा राहायचो. आता बायकोच्या मते मी आणि माझी मुले फार गबाळे राहतो. तरी मुलीला मॅच बघायला पाठवताना नीटनेटके कपडे आणि मुद्दाम खास केशरचना करून पाठवले होते. कारण झळकलीच टीव्हीवर तर असे एक्स्क्यूज आम्हाला देता येणार नव्हते Happy

यावेळी माझा चान्स हुकला, पण पुढच्या वेळी मी नक्की जाणार, आणि त्या अनुभवासह याच धाग्यावर पुन्हा येणार.

आणि हो, ते जितेंद्र जोशी कॅम्पस विजेटीय एपिसोड कोणाला युट्यूबर सापडला तर मला लिंक विपु करा नक्की...

बाकी माबोवर तर कैक मोठ्या हस्ती आहेत. काहीजण असेही असतील ज्यांच्यासाठी टीव्हीवर झळकणे ही नित्याची बाब असेल. पण त्यातही पहिल्या वेळेची आठवण स्पेशल असेल. माबोकरांचे अनुभव वाचायला सर्वांनाच आवडतील. तर लाजू नका. संकोच करू नका Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@केदार जाधव:
खरोखरच प्रेरणादायी प्रवास Happy तब्बल अर्ध्या तासाची मुलाखत सह्याद्रीवर येणे हेच खूप काही सांगून जाते. पूर्ण मुलाखत बघितली. जर्मन शिकवण्याची तुमची आंतरिक तळमळ खूपच भावली. इतके प्रचंड फॉलोअर्स असूनही चानेलवर जाहिरात नाही लावली, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे इत्यादी मुद्दे, तसेच ज्या पद्धतीने तुम्ही ते शिकवता आणि सोबत जर्मन-मराठी साधर्म्य दाखवून ती सोपी करता, जर्मन संस्कृतीची सुद्धा ओळख करून देता हे सारे फारच वाखाणण्याजोगे आहे. तुमचे जर्मन शिकण्याचे चानेल मी अनेकांना सुचवणार आता.

>> मनापासून धन्यवाद अतुल.

या मुलाखतीमुळे मला शेकडो नव्या शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता आलं. म्हणून माझ्यासाठी ती खूप स्पेशल (विशेष) आहे.

केदार, खरंच.तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रचंड चिकाटी आणि श्रम लागणारा आहे.
> धन्यवाद अनु

व्हिडिओत एकाच फ्रेम मधे कलर व्हील आणि कलर टेंपरेचर मधे जाणवणारा फरक आहे..........
व्हिडिओ खराखुरा असेल तर ..........
Submitted by फिल्मसुख बांगडू on 18 January, 2024 - 16:55
>>>>>

हे घ्या आचार्य, इथे चेक करा
त्या सामन्याचा फुल रिप्ले सापडला...

Replay - 2nd T20I - India Women vs Australia Women

तीन वेळा मुलगी दिसली स्क्रीनवर त्या तिन्ही वेळा इथे सापडतील, पडताळून बघा. तुमच्या शंका मिटतील अशी आता आशा करतो Happy

मीरा रोड येथील स्टुडीओमध्ये " महाराष्ट्र हास्य जत्रेचे " शूटिंग होते. तेथे सपत्नीक,मुलाबरोबर आम्ही गेलो होतो. मला दर्शक व परीक्षक अशा दोन्ही भूमिका करण्यास सांगण्यात आले होते. त्या दिवशी झालेल्या चित्रणांपैकी क्रमांक पहिला कोणास द्यावयाचा याचा निर्णय मी सुद्धा घ्यावयाचा होता. मी मूळचा धुळे येथील, आणि शामराव राजपूत हे धुळ्याच्या जवळच्या जळगाव जिल्ह्यातील !! शूटिंग सुरु होण्याच्या अगोदर , ते स्टेजवर आलेले होते. त्यांच्याशी थोडे बोलणे केले.. आणि शूटिंग संपल्यानंतर माझा निर्णय सांगण्यासाठी स्टेजवर गेलो होतो. दोन तीन मिनिटात माझे मनोगत,स्टेजवरून सांगितले.अनेक मित्रांनी, फोनवर या बाबतीत विचारणा केली होती. त्यांना कसे सांगणार " तो मी नव्हेच,( लखोबा लोखंडे) सांगितले " होय, तो मीच "
जयंत बा शिम्पी , बोरिवली(पू)

मला दर्शक व परीक्षक अशा दोन्ही भूमिका करण्यास सांगण्यात आले होते...
>>>>
वाह.. हास्यजत्रा परीक्षक.. भारी !

डॉ. रोहिणी जी, कसले भारी, खूप खूप अभिनंदन.
बालचित्रवाणीचा विषय काढून बालपणीच्या आठवणी जाग्या केला. किती छान प्रोग्राम असायचे त्यांचे. मजा यायची बघायला. आणि तुम्ही तर साक्षात लिजेंड प्रोग्राम मध्ये झळकल्या, क्या बात Happy

जयंत जी, हे पण कसले भारी, कोविड काळात आणि आता इथे कॅनडात आवडीने बघितल्या जाणारा शो म्हणजे MHJ आणि त्यात तुम्ही परीक्षक होतात, जे बात

अभिनंदन

वर्तमानपत्रात दोन तिनदा फोटो आले आहे. पण कधी टीव्हीवर झळकलो नाही बा. पण एक दिवस नक्की झळकणार ....म्हणजे झळकणार. तेव्हा नक्की तुम्हाला सांगणार

वर्तमानपत्रात दोन तिनदा फोटो आले आहे.
>>>>>
मग तो अनुभव त्या वर्तमानपत्राच्या धाग्यावर लिहा.
लेखाच्या सुरुवातीला लिंक आहे बघा Happy

..

पण कधी टीव्हीवर झळकलो नाही बा. पण एक दिवस नक्की झळकणार ....म्हणजे झळकणार. तेव्हा नक्की तुम्हाला सांगणार
>>>>>>>>>

हो सारिका. नक्की सांगा. तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला होईल.
आणि तेवढाच धागा वर येईल Happy

धागा आणि प्रतिसाद दोन्ही मनोरंजक!
मी एकूण तीन वेळा टीव्हीवर झळकलो आहे, अर्थात तिन्हीवेळी प्रेक्षकांत बसलेलो असताना Happy
झी टीव्हीवरच्या जुन्या हिंदी सारेगमचे सोनू निगम सूत्रसंचालन करत असे तेव्हा पहिल्यांदा आणि अन्नू कपूर अंताक्षरीचे सूत्रसंचालन करत असत तेव्हा दुसऱ्यांदा तर नवी मुंबईत डीवाय पाटील स्टेडियमवर झालेली आयपीएल मॅच बघताना तिसऱ्यांदा!
सारेगम आणि अंताक्षरीचे एपिसोड नंतर प्रक्षेपित झाल्याने स्वतःला टीव्हीवर बघता आले होते पण आयपीएल मॅच लाईव्ह दाखवली जात असल्याने त्यावेळी बघता नव्हती आली पण ज्या परिचित, मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी ती मॅच टीव्हीवर बघितली होती त्यांनी नंतर फोन करून त्याबद्दल कळवले तेव्हा आनंद झाला होता.

संजय भावे,
सोनू निगम जुने सारेगामा आणि अनू मलिक अंताक्षरी म्हणजे तेव्हाचे मानाचे प्रोग्राम होते. त्यात तुम्ही झळकलात हे भारीच..

आणि आयपीएल सामन्याची फुल रेकॉर्डींग नाही मिळवली का नंतर?
आमच्यावेळी मुलीसोबत तिच्या मैत्रीणी सुद्धा असल्याने त्यांच्या आयांनीच पोरी कुठे कुठे दिसल्यात हे शोधून दिलेले..

अरे हो. यावरून आठवले,
@ आचार्य / बांगडू,
मी वर दिलेली पूर्ण सामन्याची लिंक चेक केली का?
आपल्या शंका मिटल्या असतील तर प्लीज तसे कन्फर्म करा Happy

Pages