आर्थिक साक्षरता : गेमिफिकेशन

Submitted by चंपक on 20 December, 2023 - 00:56

नमस्कार,

आर्थिक साक्षरता हा विषय शालेय अभ्यासक्रमात दुर्लक्षित विषय आहे. नविन शैक्षणिक धोरणात तो आता अभ्यासक्रमात घेण्यास सुरुवात होत आहे. मी आमच्या स्टार्ट अप च्या माध्यमातुन या विषयावर काम सुरु केले आहे. त्यासाठी गेमिफिकेशन या पद्धतीने मुलांना आवडेल असे खेळ आपण देउ शकतो का यावर शोध सुरु आहे.

आर्थिक साक्षरता या विषयावरील रॉबर्ट कियोसाकी यांचेसारख्या लेखकांची पुस्तके भारतात उपलब्ध आहेत. परंतु त्यांचे गेमिफिकेशन केलेले खेळ भारतात उपलब्ध नाहीत. ते अमेरिका अन युरोप मध्ये उपलब्ध आहेत. तेथुन ते भारतात आणता येतील का?

इतरही अनेक देशांत या विषयावर जी माहिति / उपकरणे उपलब्ध आहेत, त्याबद्दल इथे लिहावे, म्हणुन हा धागा !

आर्थिक साक्षरता, उद्योजकीय मानसिकता, व्यावसायिक शिक्षण, मुल्य शिक्षण या वर मनुष्यबळ अन संसाधणे उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यासंबंधी कुणी मदत/ मार्गदर्शन/ व्यवसाय करत असल्यास कृपया लिहावे / संपर्क करावा.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users