कला - दैवी साक्षात्काराचा एक सोपा मार्ग

Submitted by abhijeet51 on 9 June, 2009 - 23:21

कला. खूप शक्ति आहे या शब्दात.
सामान्य माणसाला देवत्व प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे या शब्दात.

जेंव्हा एखादा कलाकार आपली कला तीन फूट उंचीच्या रंगमंचावर सादर करतो त्या वेळिच तो ईश्वराच्या जवळ गेलेला असतो. ते तीन फुटाचे अंतर तुमच्या आमच्या सर्व सामन्याच्या आवाक्यातले नसते.
ते तीन फुटाचे अंतर पार करण्यासाठि सात जन्म ही अपुरे पडतात तर कधी हे अंतर एका क्षणात गवसल्याचा आनंद आपल्या आत्म्यास होतो. अंग शहारा ने भरून जाते. संपूर्ण शरीरावर मोरपिस फिरवाल्याचा भास होतो.

अहो, तुम्ही मला सांगा दैवी साक्षात्कार म्हणजे काय?

जर देवाच्या जवळ जाण्याचा कुठला मार्ग असेल तर तो आहे कलासाधना.

प्रत्येकामधे कुठली ना कुठली कला दडून असते. कोणाला ती एका आयुष्यात गवसते आणि त्याला या साक्षात्काराचा अनुभव येतो. बाकी सर्व पूर्ण आयुष्य चाचपादत बसतात.
तर काही हे चाचपडनेहि सोडून देतात.

कला म्हणजे काय? कुठलीही गोष्ट आत्मीयतेने ,झोकून देऊन करणे म्हणजे कला. सतत आत्मीयेतएने केलेले कुठलेही काम म्हणजे कलासाधना आणि मग हे काम आपल्याला त्या कलेच्या सर्वोच्च शिखरावर पोहचवते जिथे पोहचल्यावर आपल्याला जीवनाचे सार कळन्यस सुरूवात होते. नवरस आपल्याला क्षुल्लक वाटू लागतात. कुठलाही एक रस आपल्याला लक्ष वेधु शकत नाही आणि मग मानसिक समाधानाची सर्वोच्च अवस्था प्राप्त होते. आणि मग तुम्हाला या अवस्थेतील समाधान कळल्यावर तुमच्या साधनेचा एकमेव हेतू राहतो, हे सर्वोच्च मानसिक समाधान मिळवणे.

माझ्या मते जीवनाचे हेच ध्येय असले पाहिजे की अशी कला शोधून तिचे संवर्धन करणे.

गुलमोहर: