उपक्रम २ - दुर्लक्ष - हरचंद पालव

Submitted by हरचंद पालव on 19 September, 2023 - 22:56

बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले...
तिचे निस्तेज डोळे अजूनही उघडेच होते. आजवर ज्यांच्यासाठी ती राबली, त्यांनी आज टिपं गाळण्यापलिकडे काहीही केलं नव्हतं. पण त्याचं तिला काहीच वाटत नव्हतं. कसली तरी अलौकिक शांतता तिच्या मुखमंडळावर पसरली होती. त्याला हे बघवेना. जाऊ दे, म्हणून त्याने पाठ फिरवली.

बर्‍याच वेळाने गाडी आली. आता सगळेच गाडीत शिरले. तोही शिरला. गाडी सुरू होणार, इतक्यात पुढल्या सिटाच्या दिशेने आरोळ्या आल्या "म्हैस!! म्हैस!! म्हैस!!". आडोशाच्या चारी खाटा उधळल्या गेल्या होत्या आणि ही सगळी मंडळी पंचनाम्यात गुंतलेली पाहून या प्रसंगाची नायिका आपल्या चारही पायांनी तिथून केव्हाच चालती झालेली होती.

Group content visibility: 
Use group defaults

lol मामी

छान कथा...
प्रतिसादातली माहिती ही छान..!

Lol
मामी, शिवाय आधी बहुधा ते 'पुल' असंच होतं. त्यामुळे खरंच पुलंची आठवण होत होती!

पण ह.पा., शेवटी परत ज्या 'म्हैस, म्हैस' आरोळ्या येतात, त्यापण पुढच्या सिटांच्या दिशेने येतात?

मामी Lol

वावे, पुढल्या सिटांच्या दिशेने नसाव्यात. बहुतेक मी चुकलो.

Pages