सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतितार्थ लक्षात घ्या आणि त्या वर बोला.
पूर्णतः बंदी तुम्हाला मान्य आहे का?
की फक्त दिवाळी,गणेश उत्सव,दुर्गा उत्सव ह्या मध्येच फक्त बंदी हवी आहे
एकदा काय ती भूमिका स्पष्ट करा

मुळात आधी डीजे आणि लेसर वरच बोलणार आहेत का हेही सांगा

त्यांची गाडी ट्रॅक बदलून मनात येईल त्या रुळांवर धावते

पर्यावरण राहिले मागे आता ते हिंदू मुसलमान ट्रॅक वर आलेत

काही काळाने ब्राह्मण आणि मराठा यावरही नेतील

मुळात आधी डीजे आणि लेसर वरच बोलणार आहेत का हेही सांगा>> बॉम्ब व अणु बाँब वर पण गाडी जाउन आलेली आहे. मस्त धागा.

लक्षात आले का सर्वांच्या .
ह्या लोकांस फक्त आणि फक्त हिंदू सण मध्ये वाजणाऱ्या dj विषयी च आक्षेप आहे.
दिवाळी मध्ये वाजणाऱ्या फटाक्यांना च आक्षेप आहे.
ह्या सर्व गोष्टी न वर पूर्ण बंदी हवी का,,?
असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर ही सर्व टाळत आहेत.
म्हणजे ही सर्व मंडळी ठराविक हेतू नी प्रेरित आहेत.
हिंदू विरोधी आहेत
त्यांना आवाज प्रदूषण शी काही देणेघेणे नाही.
ना लेसर लाईट विषयी ह्यांना आक्षेप आहे

Dj/डॉल्बी. फटाके , लेसर लाईट ह्यांना देशात पूर्णतः बंदी हवी का?.ह्या प्रश्नांवर फक्त हो किंवा नाही इतकेच उत्तर द्यायचे आहे.
पण
Dj/ डॉल्बी, फटाके, लेसर लाईट ह्या वर बोंब मारणारे
एका शब्दात पण उत्तर देत नाहीत.
समजून जा हे सर्व ढोंगी आहेत..
माझा तर पूर्ण बंदी ला पूर्ण पाठिंबा आहे

हुश्श!
तुमचे लाख लाख आभार सर.
तुमच्या या प्रतिसादावर चर्चा संपली असं जाहीर केलं जावं.
( नाहीतर उद्या तुम्ही उलट म्हणाल)

फटाके पूर्ण बंदी हवी असे मागे मी सुद्धा फटाके धाग्यात म्हटलेले.
कारण जर सोसायटी मधील इतर लहान मुले फटाके वाजवत असतील तर आपल्या लहान मुलाला नकार देणे किंवा ते कसे वाईट आहेत हे समजावणे अवघड असते.

ऋनमेष.
तुमचे मत प्रामाणिक आहे पण ह्या ढोंगी लोकांचे मत प्रामाणिक नाही..
संपूर्ण बंदी टाकली तर काय काय घडेल ह्याची ह्यांना जाणीव आहे..त्याचा हेतू एक च आहे..फक्त हिंदू न च्या सणात बंदी हवी.
बाकी रान मोकळे हवं.
धांगड धींगा करायला

आणि प्लिज बी सिरीयस....आता कुणिही हा जावई शोध लावू नका की माझ्या घरात हिटर इनस्टॉल्ड असेल म्हणून मी ब्लॅंकेट बॅन ला समर्थन देतोय....थोडसं अवांतर...या वर्षी थंडीही जोरदार असणार असा अंदाज आहे.. Rofl

पुर्ण ब्लॅंकेट बॅन कायद्याने वैध ठरणार नाही>>
सोलापूर चादर प्रोमोट करण्यासाठी ब्लॅंकेट बॅन असावा.

या वर्षी थंडीही जोरदार असणार असा अंदाज आहे>>>
Screenshot_20231010_160740_Chrome.jpg

पूर्णतः बंदी हवी की नको .
फक्त ह्याचेच उत्तर हवं आहे >>> तुम्ही कोण लागून गेलात ? आधी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी शिताफीने टाळलीत ते बघा. आता बोटं विटाळत बसत नाही. निरूत्तर झाल्यावर ब्लँकेट बॅनची मागणी आहे असं मोघम लिहीलं.

एरव्ही लांबलचक कविता पाडत असता.
झुमरीतल्लैय्याची गाडी उधमपूरला चालली.
कारण दिल्लीची लोकसंख्या शंभरच्या वर आहे.
हे सत्य आहे.
आपण हे स्विकारले पाहीजे.
सोलापूरला चादरी बनतात.
नागपूरला नाग फिरतात.
तिकडे नागांचा सण असतो. त्याला नाग डे म्हणतात.
अहमदाबादला धोतर मिळते.
सुरत ला साड्या मिळतात.
म्हणून मौजे काळीज कुचकुच गावी पोलीस चौकी व्हायला हवी.

या छापाचे तुमचे प्रतिसाद असल्याने ते कसलं ब्लँकेट बॅन,कुणी केली मागणी हे फाट्यावर मारले.
कारण प्रश्न विचारले तर तुमची गाडी पाकिस्तानात जाणार.
निरूत्तर झालाय हे दडवण्यासाठी हा पवित्रा.

आता सांगा कुणी कुणी ब्लँकेट बॅनची मागणी केलीय ?
इथे कुणी त्याला विरोध केला होता ?
आणि ब्लँकेट बॅन झाला तर काय घोडं मारलं जाणार आहे इथल्या लोकांचे ?

मी काय म्हणतो, हिंदु सोडून बाकी सगळ्या धर्मांतल्या लोकावर ब्लँकेट बॅन आणावा. लाऊडस्पीकर नाही, डीजे नाही, लेसर नाही, फटाके नाहीत. एकदम चिडीचूप
हिंदु धर्मात या सगळ्याचा उल्लेख आहे त्यामुळे त्यांनाच फक्त परवानगी देण्यात यावी. असेही वर्षातून असतात तरी कितीसे सण...
गणपती दहा दिवस, नवरात्र ९ दिवस, दिवाळी ४ दिवस
झालंच की मग उरले काय, दहीहंडी, होळी, रंगपंचमी सगळे मिळून २०-२५. तेवढेही लोकांना खुपतात.

हिंदुनी आनंद घ्यायचा नाही कधी आयुष्यात ???
प्रदुषणामुळे माणसे असेही मरतात, निदान कुणाच्या आनंदासाठी मेली तर स्वर्गात अप्सरांचा डान्स तरी बघता येईल

मला काहीतरी रॅंडम प्रश्न विचारायचा होता. कोडेच म्हणा ना!
पण असला असंबद्ध प्रश्न "असंबद्ध गप्पा" या धाग्यावर विचारण्याचीही हिंमत झाली नाही.
मग हा धागा (कितव्यांदातरी) वाचला आणि इथे काहीपण लिहायला/विचारायला हरकत नाही असे वाटले. म्हणुन इथे विचारतो.

"Why he came and how they went back?"
याचे एका अशा (इंग्रजी) शब्दात उत्तर द्या ज्याची तिन (इंग्रजीच) श्ब्दात फोड केली की Why? चे उत्तर मिळते आणि फोड न करता सलग (इंग्रजीच) शब्दाने how? चे उत्तर मिळते.

ही पोस्ट आणि त्याचे उत्तर टाळणार्‍या व्यक्तीच्या घराभोवती सतरा DJ शे लेजर सोबत साठ दिवस वाजतील.
उत्तर चूकीचे का असेना, पण प्रयत्न करणा‍र्‍या व्यक्तीला सगळे देव प्रसन्न होतील.

Pages