हटवादी

Submitted by sanika11 on 8 June, 2009 - 05:31

तुझा तो लबाड कुरळा केस
माझ्यासारखाच हटवादी,
अथक प्रयत्नाने तुझ्या नाजुक हाताने
तू कानाआड लपवलेला,
तरी सतत तुझ्या गालावरून येऊन
तुझ्या ओठाला भिडू पाहणारा.

फरक फक्त आमच्या दोघांच्या यशातला
तो तुला स्पर्श करत करत
तुला शहारा आणणारा,
नि मी तुझ्या स्पर्शाविनाच
केवळ तुझा शहारा पहाताच मोहरणारा!!

गुलमोहर: 

Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

अरे वा! सानिका..
एकदम रोमँटीक कविता... Happy

क्या बात है....क्या बात है