द केरला स्टोरी विवाद

Submitted by ढंपस टंपू on 9 May, 2023 - 10:47

केरला स्टोरी या चित्रपटावरून वाद इतका वाढतोय कि शमता शमत नाही. काय आहे एव्हढं त्यात ?
काश्मीर फाईल्सच्या वेळी जे वातावरण होतं तेच आत्ता पण आहे. पश्चिम बंगाल या राज्याने त्याच्यावर बंदी घातली. याविरोधात निर्माते कोर्टात गेले.
कोर्ट सेन्सरसंमत चित्रपटावर बंदीला समर्थन देऊ शकतं का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

कुठल्या तरी हिंदू मुलीने धर्मांतर करून आइसिस मधे काम केले होते तिच्या ट्रू ष्टोरीवर पिक्चर आहे. तिच्या आईचा इंटरव्ह्यू पण आहे असे कळाले.
या पिक्चरवर चर्चेसाठी धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोर्टात केरला फाईल्स विरोधात मुस्लिम समाजाने याचिका टाकली तेंव्हा कोर्टात खालील प्रकारचे संवाद झाल्याचे समजले !
याचिका कर्ता -
फिल्म मुस्लिम विरोधात असल्याचा उल्लेख आहे
कोर्ट - फिल्म मध्ये उल्लेख आहे का ?
याचिका कर्ता - नाही
कोर्ट -मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ?
फिल्म मध्ये इसीस चा उल्लेख आहे तर इसीस ऑब्जेक्शन घेईल , तुम्ही का घेताय ?

काश्मीर मध्ये हिंदू ना तेथील मुस्लिम अतिरेक्यांनी विस्थापित केले त्यांच्या हत्या केल्या ह्या विषयी जिव्हाळा आहेच.
काही मुस्लिम लोक पण ह्या बाबत हिंदू सारख्याच भावना ठेवून आहेत.
लव जिहाद हा प्रकार संघटित पने चालत असेल तर ते साफ चुकीचे आहे ते थांबवणे गरजेचे आहे अगदी सक्ती नी.
ह्या विषयी कोणतेच मतभेद असण्याचा प्रश्न नाही.
आणि हे सर्व काँग्रेस काळात च घडतं होते ,त्यांच्या मुळेच घडले असे आरोप सत्ताधारी bjp Sarkar करत आहे.
आणि ते लोकांना पटले म्हणून पूर्ण बहुमत भारतीय जनतेने bjp ला दिले आहे.
त्यांच्या सत्ता काळाला ,9 वर्ष होवून गेली.
The Kashmir file cinema आला त्याचे समर्थन bjp नी केले .
पण सत्ता असून पण ती पण पूर्ण बहुमतात .
किती काश्मिरी पंडितांना ह्या सरकार नी करत काश्मीर मध्ये वसवले.
त्यांची जमीन,संपत्ती मिळवून दिली.
त्यांना तिथे पूर्ण संरक्षण दिले.
9 वर्ष सत्ता मिळून झाली.
संघटित पने चालणाऱ्या लव जिहाद प्रकरणात काय कारवाई केली.
किती लव जिहाद थांबवले.
किती हिंदू स्त्रिया न वर होणारे अत्याचार थांबले .
तर ह्या दोन्ही प्रश्नांचे एक च उत्तर आहे
प्रत्यक्ष कोणतीच कारवाई केली नाही..त्या प्रश्नांचा राजकीय फायदा करून घेण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न केला.
त्या साठी सिनेमे पण काढले.
लोकांचा विरोध ह्या राजकीय स्वार्थी हेतू ल आहे.
पुलगमा सारख्या घटनेचा पण राजकीय फायदा च घेण्याचे काम ह्यांनी केले
ह्यांच्या हेतू वर च लोकांना विश्वास वाटतं नाही
म्हणून the Kashmir file आणि केरला स्टोरी ह्या सिनेमांना लोक विरोध करत आहेत..ते संघटित लव जिहाद चे समर्थन करत नाहीत.

त्यांनी लव जिहाद चे समर्थन केले तरी काय फरक पडणार आहे ?
ऑलरेडी दोन्ही धर्मात अविश्वासाचे वातावरण मेन्टेन केले जात आहे . फरक इतकाच मुस्लिम धर्मात देखील भरपूर जाती असून देखील ते फक्त इस्लाम साठी आपसातील हेवेदावे विसरून एक होतात तर शेजारील घराला आग लागली तरी हिंदू लोकं त्याची जात प्रथम बघत असतात .

उलटा लव जिहाद च्या गेल्या आठवड्याभरात चार पाच घटना घडल्या , मुस्लिम मुलगी हिंदू तरुण बरोबर फिरत असताना मुस्लिम समाजाने पकडुन दोघानाही मारहाण करून व्हायरल केले होते .
अच्छा , मुस्लिम मुलगी आहे ? मग या घटनाकडे भारतातील तमाम बौद्धिक दलालांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले .
पण हेच प्रकरण मुस्लिम मुलगा आणि हिंदू तरुणी बाबत घडले असते तर सर्व धर्म समभाव , हिंदूंनी सहिष्णुता दाखवली पाहिजे , ते मुस्लिम म्हणजे पूर्वीचे हिंदूच आहेत वैगेरे वैगेरे दळण दळत बसले असते . .

हिंदू पुरूषांनी स्वतःवर काम करायला हवे आहे.
त्यांनी नीट वागवले तर मुली का मुस्लिम मुले बघतील.
स्वतः धड वागायचे नाही
बिल फाडत राहायचे
कधी मुलींवर, कधी पक्षांवर, कधी धर्मांवर.

पण सिनेमा म्हणून त्यावर बंदी घालण्याची मागणी चूक आहे आणि अजिबात त्यावर बंदी येता कामा नये

जर बाकी सिनेमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ची जपणूक होत असेल तर या सिनेमाला वेगळा न्याय का?

तो चांगला वाईट काय आहे तो प्रेक्षक ठरवतील
हा काय पहिलाच प्रोपौगंडा सिनेमा नव्हे

हे पण योग्य आहे .सिनेमा वर बंदी नको..
सिनेमाचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्यावर लोकांचा आक्षेप आहे..
सिनेमावर नाही.
आपले पंतप्रधान कधीच देशाच्या कोणत्याच समस्येवर बोलत नाहीत.
पण ह्या सिनेमावर मात्र बोलले आहेत.

आशुचॅम्प ह्यांच्याशी सहमत. चित्रपट खोटा प्रोपोगंडा करणारा आहे असे वाटते पण बंदी घालावी हे काय बरोबर नाही.

Watched the movie before it gets banned. It is against ISIS, not against muslims. It is better to watch and brainstorm, rather than doing guesswork just on the based of half cooked news and social media.

बंदी घालणे आजच्या जमान्यात खरेच ineffective आहे.
> चित्रपट खोटा प्रोपोगंडा करणारा आहे असे वाटते
वाटते ? फार पूर्वी दोन लेखकांमधला वाद गाजला होता तेव्हा 'अ' लेखक आपल्या कादंबर्‍यात बलात्काराची वर्णने घालतात असा आरोप झाला. त्यावर त्यांनी 'ब' या लेखकाच्या एका कादंबरीतही असे वर्णन आहे असे सांगितले. त्यावर एकाचे भाष्य मार्मिक होते. तो म्हणाला , 'ब चे वर्णन वाचून भयंकर राग येतो व असे वाटते की आत्ता जाऊन त्या नराधमाला ठार करावे, अ चे वर्णन वाचून आपणही बलात्कार करावा असे वाटू लागते'.

शिंडलर्स लिस्ट सारखे अंतर्मुख व सुन्न करू पहाणारे सिनेमे व 'काश्मीर फाईल्स', 'केरला स्टोरी' सारखे सिनेमे यात हा मूलभूत फरक आहे. शिंडलर्स लिस्त पाहून जर्मन लोकांबद्द्दल द्वेष उत्पन्न होत नाही.

आणखी विस्ताराने लिहू शकेन पण 'केरला स्टोरी' , ' लव्ह जिहाद' असल्या कॉन्स्पिरेसी थिअरीज उच्चवर्णीय हिंदुंमध्ये का लोकप्रिय झाल्या आहेत याचे समाजशास्त्रीय व मनोवैज्ञानिक विश्लेशण लिहिले तर उगीच इथे रडारड होईल. व ट्रोल्स गोंधळ घालतील.

<< 'केरला स्टोरी' , ' लव्ह जिहाद' असल्या कॉन्स्पिरेसी थिअरीज >>
कॉन्स्पिरेसी थियरी? बरं.

<< अ चे वर्णन वाचून आपणही बलात्कार करावा असे वाटू लागते' >>
मी पण एखाद्या मुसलमान मुलीला जाळ्यात पकडून तिला हिंदू करावे आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्यावर बलात्कार करावा आणि मग तिला दहशतवादी बनवावे, असे वाटले नाही. तुमचे माहीत नाही, पण मी सिनेमा बघितला आहे.

तीनचे तेहतीस हजार करण्याचा हेतू काय आहे ?

हनीट्रॅप मधे पकडलेल्या एकजातीय लोकांवर असा कुणी सिनेमा बनवला आणि पन्नास चे दहा कोटी दाखवले तर ?
तुमच्याच प्रमाणे मी सिनेमा पाहिलेला आणि मला गद्दारी कराविशी वाटलेली नाही हे ऑर्ग्युमेण्ट केलेले चालेल का ?

पूर्वग्रह न ठेवता सिनेमा बघा आणि मत बनवा, इतपत सुचवेन. तसेही सिनेमा काही इतका भारी वाटला नाही मला, की वारंवार बघावासा वाटेल.

>>पूर्वग्रह न ठेवता सिनेमा बघा आणि मत बनवा, इतपत सुचवेन. << +१
संख्येबाबत एक्झॅजरेशन झालंय असं मान्य करुन चित्रपट निर्मात्याला कोठडित उभं केलं तरी मूळ समस्येवर पांघरुण टाकता येणार नाहि. प्रश्न चित्रपट शिंडलर्स लिस्ट सारखा उच्च प्रतिचा आहे कि नाहि हा मुद्दा आहे का?

हा चित्रपट बघितलेला नाही. नक्की काय आहे हे कोणी लिहील का?

आयसिस समर्थनार्थ सिरियात गेलेल्या पुरुषांच्या बरोबरीने गेलेल्या बायका या आयसिस समर्थक मानून त्यांना पुरुषांना जो न्याय लावू तोच लावावा का? या मुस्लिम बायकाच आहेत. काही धर्मांतर वगैरे पैलू नाही. पाश्चिमात्य देशांच्या नागरिक आहेत. त्यांना देशांत बोलावून खटले भरावे का आहेत तिकडेच सोडून द्यावं? त्यांच्या लहान मुलांचं काय? ते ही पाश्चात्य देशांचे नागरिक आहेत. इ. अनेक द्विधा मनस्थितीत टाकणारे प्रश्न अधुन मधुन बातम्यांत येत असतात.
तत्कालिन परिस्थितीत त्या बायकांना वेगळा न्याय न लावता आयसिस समर्थक समजून वाईटात वाईट शिक्षा द्यावी असंच वाटतं. आई-बाप कसेही असतील तरी मुलांना मात्र तोडू नये असंही वाटतं.
वरचं वाचुन अशाच विषयावर असेल असं वाटलं म्हणून लिहिलं. नसेल तर उडवतो पोस्ट.

अजेण्डा मूव्हीज बघायलाच हवेत ही अट काही पटण्यासारखी नाही. गुजरात दंगलीवरचा नासीरचा एक मूव्ही किंवा वॉटर सारखे मूव्हीज ज्यांनी बॅन केले आहेत त्यांचाच या सिनेमाला पाठिंबा आहे. ते सिनेमे पाहून मगच जाळपोळ केली असेल का ? फना गुजरातेत बॅन होता. दीपिका पदुकोणचे शीर कापून आणणार्‍यासाठी इनाम ठेवले गेले होते. हे सर्व पूर्वग्रह न ठेवता सिनेमा पाहून केले होते का ?

जर आकडे काहीच्या काही ( न्यायालयात ३ सांगितले, चित्रपट चालावा म्हणून ३२००० चा आकडा घेतल्याचे कबूल केले आहे) वाढवून सांगितले असतील तर हेतूबद्दलच शंका उत्पन्न होते. तीनच्या ठिकाणी फारतर दहा बारा सांगितले असते तर प्रश्न वेगळा होता. एखाद्या गोष्टीची तीव्रता वाढवत नेल्याने भारतासारख्या देशात काय परिणाम होतील याची जाणिव असलेल्यांना हे सांगायला नको.

अजेण्डा मूव्हीज बघायलाच हवेत ही अट काही पटण्यासारखी नाही. +१

रस्त्यावर शेणाचा पो पडला असेल तर पूर्वग्रह न ठेवता आधी थोडासा प्लेट मध्ये घेऊन चमच्याने चाखून मगच शेण म्हणावे का ?

त्या सिनेमातील एक क्लिप ट्विटर वर पाहिली. लेखक हिंदु, दिग्दर्शक, संवादलेखक, निर्माते सारे हिंदु, पण मुस्लिम मुलीचे पात्र हिंदू देव देवतांवर घाणेरडी टीका करते. आणी त्या टीकेवर प्रेक्षकातील लोक तिला घाण शिव्या देतात. सिनेमा संपल्यावर जय श्रीराम घोषणा देतात.

>>रस्त्यावर शेणाचा पो पडला असेल...<<
अच्छा, तुमच्या रंगीत चष्म्यातुन एखादं वास्तव रक्तरंजीत दिसत असेल तर वाळूत तोंड खुपसण्याची सूट तुम्हाला आहे. परंतु आकडे वाढवुन सांगितले या फुसक्या कारणावरुन मूळ प्रश्नाची तीव्रता कमी करण्याचा उद्देश असेल तर तो दुर्दैवी आहे...

आकडे वाढवुन सांगितले या फुसक्या कारणावरुन >> ??
एखाद्या प्रश्नाची तीव्रता कशावरून ठरवतात तुमच्या मते ?
आकडे देताना प्रामाणिकपणा नसेल तर चित्रपटातली भडक दृश्ये किती प्रामाणिक असतील ? हे जर नॉर्मल झाले तर उद्या त्याचे बुमरँग पण होऊ शकते.

आकडे सांगितले ह्याने सगळेच चित्र बदलते. जर त्यांनी आकडे न सांगता ही ह्या मुलींची गोष्ट आहे असे सांगितले असते तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी ३२००० मुलींची गोष्ट, पुढच्या २० वर्षात केरळ इस्लामिक राज्य होईल वैगरे अकड्याशी संबंधित गोष्टी ठेवल्या तिथेच अजेंडा समजला.

आता, इथेच लोचा असेल तर.. चालुद्या... >> बरं Happy

अ विरूद्ध ब असे वळण द्यायचे नाही. पण नाईलाज होतोय.
उद्या सेनगरने केलेल्या दुष्कृत्यावर किवा हाथरस घटनेवर एखाद्याने चित्रपट बनवला आणि त्यात विशिष्ट पक्षाचे/ समुदायाचे असे ३ कोटी लोक अशा प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी आहेत असे क्लेम केले तर ?
हाथरस ची घटना ही एक आणि स्वतंत्र घटना म्हणून दाखवणे आणि असे दावे करणे यात फरक नाही असे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. या धाग्यावर इतके पुरे.

आकडे ३ चे १३ केले असते तर ठी़क पण जेव्हा ते ३२००० केले जातात तेव्हा आकडे हा मोठा प्रॉब्लेम होतो ना!!
rather than doing guesswork just on the base of half cooked news and social media. >>> हे वाक्य इतिहास वाचा, वृत्तपत्रे वाचा आणि सत्य जाणून घ्या असे म्हटले असते तर ठीक होते. पण सोशल मिडिया वाचण्याऐवजी सिनेमा पहा हे काय लॉजिक आहे ? Uhoh
उ. बो. पूर्वग्रह न ठेवता सिनेमा बघा वगैरे म्हणत आहेत.
सिनेमा काही भारी नाही वाटला असे वर उ. बो आणि इतरही लोक म्हणत आहेत. बर म्हणजे बेसिकली सिनेमा काही भारी नाही, बरं यात फार मोठे सत्य बाहेर आणले आहे, फॅक्ट्स दाखवलेल्या आहेत ज्या जाणून घेणे आवश्यक आहे असेही नाही ( ३२००० ते ३ ची कोलांटी उडी ), मग या सिनेमाला उगीच मोठे का बनवले जाते आहे? इतरांना बघाच असा आग्रह करणे ,फुकटात तिकिटे वाटणे, फुकट रिक्षा ने नेणे असे सगळे का केले जात आहे याचे सोपे उत्तर सांगा कुणी तरी.

सेन्सॉरने पास केलेल्या किंवा एकंदर कोणत्याच चित्रपटावर / कलाकृतीवर बंदी घालू नये.

आता द केरला स्टोरी. ही निव्वळ कलाकृती आहे का? की सत्य घटनेवर आधारित असे सांगणारा प्रचारपट आहे?
चित्रपट रिलीज व्हायच्या काही दिवस आधीपर्यंत केर ळम धल्या ३२००० स्त्रियांची कथा असा प्रचार केला जात होता. ट्रेलरमध्ये तसं म्हटलं होतं. त्यावर वाद झाल्यावर ३२००० च्या ३ झाल्या. पण अन्यत्र ३२००० ,३०००० हा आकडा कायम आहे. चित्रपट निर्माता , दिग्दर्शक विचारताहेत की आकडा महत्त्वाचा आहे का? ३२००० च्या ऐवजी फक्त १०० असल्या तर गांभीर्य कमी होतं का ? पण मग बाबांनो , तुम्ही ३२००० आकडा का हॅमर करत होता आणि अजूनही केला जातोय?

या चित्रपटाचं प्रमोशन एक राजकीय पक्ष करतोय. त्याचे नेते थेटर्स बुक करून, लोकांना फुकटात चित्रपट दाखवताहेत. संघ सरकारमधील मंत्री मी आता हा चित्र पट पाहायला जाते आहे, असं ट्वीत करतात. त्या पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांत चित्रपटाला करमाफी दिली जाते. फेसबुकवर गेले काही दिवस ज्यांच्याशी काही संबंध आलेला नाही अशा लोकांच्या द केरला स्टोरी प्रमोट करणार्‍या पोस्ट्स मोठ्या प्रमाणावर दिसताहेत. ( फ्रेंड्स किंवा लाइक, फॉलो केलेल्या पेजेसच्या दर तीनचार पोस्ट्स नंतर द केरला स्टोरी संबंधित पोस्ट. मजकूर साधारण तसाच. हे पैशा शिवाय होत असेल? थोडक्यात कालचाच खेळ पुन्हा .

इफ्फिच्या मुख्य जुरी Nadav Lapid ने द काश्मिर फाइल्सला व्हल्गर प्रपोगंडा म्हटले. पाच पैकी अन्य तीन ज्युरी मेंबर्स परदेशी होते व त्याच्याशी सहमत होते . एकच भारतीय होता. त्याने या मतप्रदर्शनाशी असहमती दर्शवली. तो होता सुदिप्तो सेन. द केरला स्टोरीचा दिग्दर्शक.

Pages