Submitted by Aniket57 on 8 April, 2023 - 14:16
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
मैत्रीच्या धुंदीमधे वेगळीच आमची दुनियादारी
खिशातली दमडी आहे बापाची कष्टाची कमाई
या दुनियादारीमधे आम्ही विसरून जाई
वेळेचे महत्व ते कळत होते आम्हाला
पण भांडण तंटा अन् मौज मजा यात वळत नव्हते अंगाला
पण चूक काय आमची ह्यात
मैत्रीच्या प्रवाहात नव्हते आम्हाला राहवत
वाळूच्या रेती प्रमाणे मैत्रीच्या प्रवाहात गेलो आम्ही वाहत
अखेर संपले आमचे दुनियादारीचे दिवस
अन् मिळालो आम्ही जीवनाच्या विशाल महासागरास
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा