पाककृती विभागात “कोरियन” शब्दखुणेवर मिटलं असतं खरं तर…. एवढा एफर्टच मारायचा तर दोन आर्टिस्टचा रॅप हवा. (मायबोली यूट्यूब पुरता प्रताधिकार मुक्त. है कोई माई का लाल जो इसको म्हण सके…).
“कोणास ठाऊक कशी” रॅप
बिट्स- हवे ते.
कार्टा (इंट्रो):
घुबडाचे घेऊन डोळे, घबाडाचे बांधून इमले,
नातू-पणतू पोरांपायी, आजी तुझे पाय दमले,
कशिदा करशी कशीबशी, रॅपला का पडलीस फशी,
Hustle मध्ये अशी तशी, आजी तू गेलीस कशी?
हूक:
कोणास ठाऊक कशी, Hustle मध्ये गेली आजी
ऐकू आली कानाफुशी, Hustle मध्ये गेली आजी
आजी (व्हर्स):
ह्या कार्ट्याची स्कुटर, स्कुटरवर कार्टा, कार्ट्यामागे कार्टी,
ब्रेकशिवाय खेटते, ही पेठेतली पी.सी.
वाळत टाकले वाटेवरती, पापड आमचे दोनशे थर्टी,
स्कुटर धावे पापडावर्ती, ठोकले ठसक्यात एम * बी *.
मुडदा तुझा, मॉर्ग बिनएसी, … (कोरस) थोबाडं फोडीन तुमची
पापड कच्चे, पक्के क्लासी, … (कोरस) थोबाडं फोडीन तुमची
निकोबा संग जाईल पी सी, … (कोरस) थोबाडं फोडीन तुमची
Scooter तुझी ऐसी तैसी, … (कोरस) थोबाडं फोडीन तुमची
हूक:
कोणास ठाऊक कशी, Hustle मध्ये गेली आजी
ऐकू आली कानाफुशी, Hustle मध्ये गेली आजी
कार्टा (व्हर्स):
अर्रर्र… प्रेमाची झापड, मोडले आजीचे पापड
आईला सांगेल, प्रकरण शेकेल, जिभेचा पट्टा, विसरलो सुट्टा,
जssर्रा होईना स्लो, आजीचा शिव्यांचा फ्लो.
बोललो -
“जिभेला दे जरा गॅप, आपसूक याचा होईल रॅप”
आजी (व्हर्स):
झापते मी, पण रॅप आणि मी? जमेल का नामी?
एवढी धामधुमी, नाय मी कमी, ट्रॉफीची हमी.
होईल थाट, वेण्या सात, कॉर्नरो आठ, माझ्याशी गाठ
घेऊन नाव “ओल्ड टॉट”, आता द्यायचा हसलंला शॉट
हूक:
सर्वाना ठाऊक कशी, Hustle मध्ये गेली आजी
विसरा कानाफुशी, Hustle मध्ये गेली आजी
________________________________________
तळटीप १: #लिज्जत स्पॉन्सर मिळालं तर रामदास पाध्येंच्या “ससा”साठी पण बजेट ठेवा हो, प्लिज! कर्रर्रमकुरर्म..
तळटीप २: लग्ना-मुंजीची मंगलाष्टके लिहीणे प्रकार जुना झाला. आमचे येथे लग्न, बारसं, मुंज, रिटायरमेंट पार्टी, शाळा/कॉलेज रियुनियन, आणि तेराव्याचे रॅप वाजवी दरात आणि वेळेत लिहून मिळतील. (अक्षय कुमार अज्जून वेडींग शोज करतो तिथे नवोदितांना बारशाचा बारावा नि मयतीचा तेरावा गाठवाच लागणार).
तळटीप ३: मॉर्ग = प्रेतागार? प्रेतगृह? शवालय?? मराठीत मॉर्गला काय म्हणतात?
चित्रसौजन्यः financialaccess.org
मॉर्ग म्हणजे शवागार.
मॉर्ग म्हणजे शवागार.
पुढच्या वेळी स्वतः किंवा दुसर्याकडून रॅप चालीत गाऊन घ्यावा आणि इथे अपलोड करावा. उगाच याला चाल लावून इमॅजिन करता करता नाइन कमिंग टू नोज.
बाकी रॅप लिवलाय भारीच.
(No subject)
हाहाहा हसू आले खरच आचरटपणा
हाहाहा हसू आले खरच आचरटपणा जमलाय.
भारीए
भारीए
है शाब्बास
है शाब्बास
म्युजिक टाकून गाऊन घ्या मज्जा
म्युजिक टाकून गाऊन घ्या मज्जा येईल
पुढच्या वेळी स्वतः किंवा
पुढच्या वेळी स्वतः किंवा दुसर्याकडून रॅप चालीत गाऊन घ्यावा आणि इथे अपलोड करावा. उगाच याला चाल लावून इमॅजिन करता करता नाइन कमिंग टू नोज. Proud
बाकी रॅप लिवलाय भारीच. >>>> स ह म त
पाककृती लेखकांना 'तुम्हीच
पाककृती लेखकांना 'तुम्हीच करून वाढा' म्हणालात - नाही!
चित्रपट समीक्षकांना 'तुम्हीच तिकीट काढून द्या' म्हणालात - नाही!
मीमचंदांना 'तुम्हीच फॉर्वड करा' म्हणालात - नाही!
मग आम्हालाच असं तुन्ना तुन्ना तक तुन्ना का??
सर्वांना धन्यवाद.
मग आम्हालाच असं तुन्ना तुन्ना
मग आम्हालाच असं तुन्ना तुन्ना तक तुन्ना का?? Wink >>>> कॉपीराईट स्ट्राईक दिलीत तर ..
मायबोली यूट्यूब पुरते
मायबोली यूट्यूब पुरते प्रताधिकार मुक्त आहेच की. कशाला कॉपीराईट स्ट्राईक होईल... तू गात असशील तर म्हण बिनधास्त! पण तुझा आयडी बघता ही सिच्युएशन म्हणजे अगदीच ... "ए अजनबी तू भी कहीं आवाज दे कहीं से,"