शिव सेना नाव गेले ,बाण पण

Submitted by हस्तर on 17 February, 2023 - 09:39

एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना यावर निवडणूक आयोगाचा शिक्कामोर्तब..

शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदेंना मिळणार.
निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

टी न शेषन हे एकमेव निवडणूक आयुक्त भारतात होवून गेले ते फक्त स्वाभिमानी होते आणि त्यांच्या काळात निवडणूक आयोग ही खऱ्या अर्थाने स्वायत्त संस्था होती.
आता आणि शेषन साहेबांच्या अगोदर निवडणूक आयुक्त हा फक्त सरकार चा हमाल होता आणि आज पण आहे

सेना नाही संपली धनुष्य बाण हे चिन्ह संपले.
शिंदे काही वलय असलेले नेतृत्व नाही.
येणाऱ्या निवडणुकीत शिंदे गट नष्ट होईल.
त्या बरोबर चिन्ह पण.

भाजप ने सूडबुद्धीने एका विरोधी स्थानिक पक्षाची वाट लावायला बघत आहे
शिंदे ची उपयुक्तता संपली की त्यानाही बाजूला सारले जाईल

घराणेशाही अस्तित्वात असलेल्या पक्षांच्या नशिबी फाटाफूट नित्याचीच ठरलेली असते .
जे काँग्रेसचे झाले ते इतर पक्षात ही होणार !
सामान्य लोकांना घराणेशाही शी काहीही घेणेदेणे नसते , आज सेना संपली , उद्या राष्ट्रवादी संपेल .
जो पर्यंत काका ॲक्टिव्ह आहे तो पर्यंतच राष्ट्रवादी पक्ष एकजूट राहिलं ,काका डीॲक्टिव्ह झाले की दादा आणि ताई मध्ये कलगी तुरा राहणार यात शंका नाही .

घराणेशाही पक्ष मुळ संस्थापक गेला की असेच फुटले आहेत. कोणे एके काळी बाळासाहेबांच्या जमान्यात सेनेबद्दल थोडा आदर व दुरुन का होइना, प्रेम होते. त्यांनी उद्धवला आणले तेव्हा पासुन दुरुनच रामराम केला होता. पुढे उद्धवची प्रगती बघुन सेना टिकणार नाही असेच वाटले होते.

शिन्देना संधी आहे, त्यांनी त्याचा लाभ उठवावा. त्यांच्या ग्रुपवर त्यांची कमांड असेल तर त्यांन्ची गरज समोरच्याला पडेलच.

ती विषय नाही.
आताच्या काळात सर्व च स्वयत सरकारी यंत्रणा सरकार च्या बटिक असल्या सारख्या वागत आहेत..
सरकारी पक्षाला लाभ पोचवणे हा एकमेव उद्योग हे करत आहेत .त्याच्या बदल्या त सेवा निवृत्ती नंतर त्यांस लाभाचे पद दिले जात आहे.
हे धोकादायक आहे.
बाकी सेना,शिंदे आज आहेत तर उद्या जातील.
पण सरकारी यंत्रणा अशा भ्रष्ट मार्गाने जावू लागली तर देश संकटात येईल.

उद्धवने तरी काय दिवे लावले असते ते बघितलेच आहे आपण. त्यामुळे त्याला चिन्ह मिळाले नाही तर वाईट काही झाले नाही. आणी चिन्ह नसताना चांगली कामे करून दाखवावीत की. लोक आपोआप नवीन चिन्हाला मतं देतील. पूर्वजांच्या पुण्याईवर कशाला जगायचे आहे यांना.

चांगली काम करून सत्ता मिळत नाही.
नाही तर उद्धव सरकार पडलेच नसते.
सत्ता मिळते ती धार्मिक ,जातीय द्वेष पसरवून,लबाडी करून, दहशत माजवून.
सरकारी यंत्रणा ना हाताशी धरून.
चांगले काम केले की सत्ता मिळते हे कोणी सांगितले

मिंधेला हाताशी धरून सेना संपवायची हे कुटील कारस्थान शेटजींनी फ20 ला हाताशी धरून केले आहे. सेना जोवर आहे तोवर भाजपला सत्ता मिळणे सहज शक्य नव्हते. म्हणून सरकारी बटीक संस्था वापरून सेनेला संपवायला निघाले आहेत. पण सेना संपणार नाही.

सरकार म्हणून कोरोनाकाळात चांगली कामगिरी बजावून देखील उठानी काम केले नाही ही खोटी हाकाटी मारणारे इथले सभासद, हे झालेल्या ताटात xxणारे आहेत

चार बिस्कुट कुत्रकारांच्या चॅनल्स वर वर्षभर सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून जयघोष केला म्हणजे कोणी कुशल राजकारणी होऊ शकत नाही !
उठाची लोकप्रियता कृत्रिमच होती . करोणा काळात बंगल्यातून बाहेर न पडणारा मुख्यमंत्री फक्त महाराष्ट्रानेच पाहिला असावा . धन्यवाद द्यावे लागतील फक्त विविध पदावरील अधिकाऱ्यांना आणि त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ना ! यांनीच खरी लढाई लढली होती , साहेब वर्षभर बंगल्यातून बाहेर पडले नव्हते हे अख्या महाराष्ट्राने पाहिले होते.
राजकारण जमणार नाही म्हणून बाळासाहेब स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहिले नव्हते . पण उठा ला मुख्यमंत्री पदाचा मोह टाळता आला नाही , आणि पायावर दगड पाडून घेतला .
गेल्या दोन वर्षात सर्वात जास्त चातुरपणा दाखवला तो राष्ट्रवादीच्या काकाने .
ज्यांचा गोंधळ त्यांच्या नावाने भंडारा उधळून मोकळे !
एकाच वेळी ४५ आमदार बंद करून पक्षातून बाहेर पडतात म्हणजे पक्षात आलबेल नसल्याची लक्षणे आहेत .
जी आत्ता तिकडे शिल्लक आहेत , त्यांच्यात बंड करण्याची धमक नसेल म्हणून कोपऱ्यात पडून असतील .

भाजप विरोधकांची निष्ठा कोणत्याही एका पक्षाशी नसते हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे .
इतक्या दिवस काँग्रेसची तळी उचलत होते , हळूहळू युवराज मधील अपरिपक्वता समजायला लागल्यावर ममता , नितीश , केजरी ची देखील भाटगीरी करायला लागले .
ते त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करत आहेत .
आणि कहर म्हणजे एकाच वेळी सेना आणि भाजप बरोबर नेत्रपल्लवी करणारी राष्ट्रवादी यांच्या दृष्टीने आदर्श असते Happy

Lol
काल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, बलात्काराचे आरोप केले आज त्यांनाच मा़ंडीवर घेऊन बसणाऱ्या भाजपचं आणि त्यांच्या समर्थकांचं कौतुक कराव़ं तेवढं थोडंच.

भाजपच्या लोकप्रतिनिधींपैकी किती टक्के आयात केले आहेत? त किती जण घराणेशाहीतून आले आहेत?

"आम्हांला घराणेशाहीचा वावगं आहे."*

**अटी लागू.

ज्या राज्यांचा साक्षरता दर चांगला आहे.
ज्या राज्यात शिक्षणाची व्यवस्था उत्तम आहे.
जी राज्य आर्थिक बाबतीत प्रगत आहेत .
तिथे bjp ल निवडून येणे मुश्किल होते..जी राज्य मागास आहेत,शिक्षण व्यवस्था खस्ता आहे,साक्षरता दर कमी आहे तिथेच bjp जिंकत आहे.
त्या वरून bjp कोणाचे प्रतिनिधित्व करते ते कळते.
अडाणी ,आणि अडाणी लोकांचा पक्ष म्हणजे bjp
काही झाले तरी bjp महाराष्ट्रात निवडून येवू शकत नाही.
फक्त evm आणि निवडणूक आयोग ह्यांनी कायद्याने काम केले तर.लबाडी केली तर मात्र bjp च येणार.
सर्व काँग्रेस,राष्ट्रवादी चे नेते bjp नी पैसे देवून स्वतःच्या पक्षात घेतले आहेत.
त्यांच्या कडे योग्य नेते पण नाहीत.
राम मंदिर ची कृपा म्हणून देशात सत्ता मिळाली.
हे विसरू नका.

भ्रमरजी, जी मते तुमची आहेत ती सर्वांचीच असली पाहिजेत असे काही नाही. पण त्यामुळे इतर सभासदांना अपशब्द बोलून आपण आपलीच पातळी दाखवून देत असतो. हेमंत33 यांनी तर मतभेद चांगल्या शब्दात दाखवले आहेत. अशा लोकांच्या मतभेदाचा आदरच आहे. यापुढे हा विषय संपला.

Ssj , +११११११
त्याच्या बद्दल काय बोलणार ?
पक्षांच्या नेत्यांना काय बोलायचे ते बोलाना .
इथे पर्सनल अटॅक कशाला करायचा नसतो हे त्यांच्या ग्रुप मधील लोकांना जरा कमीच कळते !

पक्षाचे नाव किंवा चिन्ह महत्वाचे नसते. लोक नेत्याच्या मागे जातात.
जनसंघाची खूण दिवा होती. पक्ष संपल्यावर भारतीय जनता पक्ष हा नवीन पक्ष निर्माण झाला. खूण कमळ. हे बोलके उदाहरण आहे.

दुसरे उदाहरण काँग्रेस पक्षाचे.
काँग्रेस पक्षातल्या सिंडीकेट ने इंदिरा गांधींना पक्षातून काढून टाकले.
इंदिरा गांधी यांना इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष या ब्रॅण्डला आणि गायवासरू या खुणेला मुकावे लागले.
मात्र त्यांनी काँग्रेस (इं) हा नवीन पक्ष स्थापन केला. खूण हाताचा पंजा. पुढचे सांगायला नकोच.

शरद पवार काँग्रेसमधून फुटून गेले तेव्हां समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. खूण चरखा.
नंतर पुन्हा काँग्रेसमधे आले. पुन्हा बाहेर पडले. राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला. खूण घड्याळ.
त्यांच्यामागे जे लोक होते ते आलेच. यश पाहून अन्य नवीन मतदारही येत गेले.

त्यामुळे नेत्यामधे दम असेल तर तोच मोठा ब्रॅण्ड असतो. इतकंच की नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह् लोकांना सवयीचं व्हावं म्हणून मेहनत घ्यावी लागते. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी नेत्याचे छायाचित्र तर नसते.

आयोगाने (कुणी एक अधिकारी नव्हे) मतमोजणी केली आणि त्यावर निर्णय दिला. कोणत्या गटाकडे आता अधिक बळ आहे. याविरुद्ध वरच्या कोर्टात जायचं तर हे मोजमाप कसं किती चुकलं हे मांडावं लागेल.
सिब्बल यांचा युक्तिवाद का बाद झाला?
२०१८ मधील निर्णय नियुक्त्या इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरच नसल्याने पक्षाध्यक्षांनी बडतर्फ केलेले आमदार वगैरे निर्णय बाद झाले बहुतेक.

बरोबर सहमत.
चिन्ह आणि नाव गेल्या मुळे काही विशेष फरक पडणार नाही.

शरद पवार नी जशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली तशी उद्धव ठाकरे नी पण एका वाक्यात प्रतिक्रिया देवून हा विषय बंद करावा.
उगाच ह्या विषयाला जास्त किंमत देवू नये.
निवडणूक आयोग असाच निर्णय घेणार होते हे अपेक्षित होते.
गोयल म्हणून निवडणूक आयुक्त जसा सरकार नी नियुक्त केला होता सरकार चे खेळणे म्हणून हे लोक विसरली नाहीत.
मशाल चिन्ह सह सेने नी नवीन सुरुवात करावी.
लोक त्यांच्या सोबत आहेत

<जी आत्ता तिकडे शिल्लक आहेत , त्यांच्यात बंड करण्याची धमक नसेल म्हणून कोपऱ्यात पडून असतील > इथे थोडं नव्हे बरंच करेक्शन हवंय. ज्यां च्यात ईडी , सीबीआय अशा तपास यंत्रणांचा सामना करायची धमक नाही ते बाहेर पडले. बाहेर प डण्याचं आणखीही कारण असेल ते पुढच्या निवडणुकीच्या वेळच्या प्रतिज्ञापत्रात कळेल. ज्यांच्यात धमक आहे, तेच थांबलेत. हवं तर प्रताप सरनाईकांना विचारा.

कोर्टात जी आमदार अपात्र ते ची केस चालू आहे.
तिचा निकाल ठाकरे च्या बाजू नी लागला तरी सरकार पडणार नाही.
पण bjp च्या निती मत्तेवर कायदेशीर ठपका बसेल.
पुढल्या वर्षी तर निवडणुका आहेत हे सरकार टिकेल हेच फायद्याचे आहे.

Shivsena ह्या पक्षाची स्थावर मालमत्ता,बँक बॅलन्स.
हे आता कोणाच्या मालकीचे असेल.
सेना भवन ही पण पक्षाची मालमत्ता असेल ना.
त्या वर शिंदे दावा करतील का?

खरं तर पक्ष हा कुणाची मक्तेदारी असुही नये, पक्ष स्थापनेचा उद्देश जर समाजसेवा असेल तर तिला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवण्यात काय अर्थ आहे?

पक्ष आणि चिन्ह गेल्याचा त्रास पक्ष प्रमुखा पेक्षा संपादकांना जास्त झालेला दिसतोय !
जरा जास्तच फाटक्या भाषेत बडबड चालू आहे , कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली वैगरे !
पात्राचाळ प्रकरण मध्ये संपादक साहेबना क्लीन चिट मिळाली का ? Happy

कोर्टात जी आमदार अपात्रतेची केस चालू आहे तिचा निकाल श्री ठाकरेंच्या बाजूने लागला तरी सरकार पडणार नाही.
आता यावर आपण वक्तव्य करू शकत नसलो तरी कालच्या निर्णयातील शेवटचे वाक्य '२०१८' च्या पदाधिकारी, निवड याबद्दल इसी कडे रेकॉर्ड नाही हे फार सूचक आहे.

२०१८' च्या पदाधिकारी, निवड याबद्दल इसी कडे रेकॉर्ड नाही हे फार सूचक आहे.

ह्या सर्व गुप्त माहितीचा अभ्यास करूनच शिंदे नी बंड केले असणार जेणे करून कायद्याच्या कचाट्यात सापडू नये.
भिभिषण नी रावणाचा मृत्यू कसा होईल हे सांगितले नसते तर युद्ध जिंकणे अवघड होते.
तसेच आहे हे.

पत्रा चाळ?
आज संजय राउत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी मुंबई उच्च न्यायालयात गेली होती.
न्यायालयाने त्यांना विचारलंय, तुम्ही मुख्य आरोपीला अटक करत नाही. पण ( संजय राउत ) यांना तुरुंगात डांबू इच्छिता?

Pages