‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संबोधनाची ही पद्धत ज्या समाजात साटे-लोटे लग्न वा एकाच घरात दोन बहिणींना देण्याची प्रथा प्रचलित होती त्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे. >>

छे, उलट आत्याच्या नवर्‍याला काका म्हणणे म्हणजे बहिण भावाचे लग्न लावल्या सरखे वाटते!

काका हे संबोधन पित्याच्या मोठ्या आणि लहान भावाला सर्व मराठीजन वापरतात. तेच आत्याच्या/
मावशीच्या पतीसाठी कुणी वापरले तर ‘युनीक’ नाही हे म्हणायचे आहे.

तसे तर मंग इंग्रजीत काका, मामा सर्वच अंकल आणि चुलत, आते, मामे भावंडं कझिन:-)

(जरा अवांतर - आतेभावाशी लग्न ही पध्दत समजल्यावर माझ्या काही अमराठी मैत्रिणींना (यात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय दोन्ही आल्या) कल्चरल धक्का बसला होता)

Ditto Happy
बहीण भावाचे लग्न ही कल्पनाच पचनी नाही पडत त्यांच्या.

छे, उलट आत्याच्या नवर्‍याला काका म्हणणे म्हणजे...>>
आत्याचा नवरा मामा आणि मावशीचा काका..
दोघी बहिणी जावा जावा झाल्यात की त्यांचे नवरे मुलांचे नात्याने काका असतात. (संदर्भ; हम आपके है कौन..? Wink )

साटे लोटे लग्न म्हणजे समजा कमल आणि कमलाकर ही एक बहिण भावाची जोडी आहे आणि विमल आणि विमलाकर ही दुसरी बहिण भावाची जोडी आहे. तर कमल चे लग्न विमलाकर सोबत आणि विमल चे लग्न कमलाकर सोबत लावले की ते झाले साटे लोटे लग्न..
यावेळी आत्याचा नवरा खराखरा मामा च असतो
(हुssssश्यशश...! )

नव्या प्रतिसादांतून पुढे आलेले काही मराठीपणाचे मुद्दे :-

- आपल्याकडे असलेले ज्ञान मुक्तपणे वाटणे

- इतर भाषा आणि समाजाबद्दल भरपूर माहिती असणे, ती चर्चेत वापरण्याचे कसब

- स्वल्पसंतुष्ट असणे (?)

- मराठीजन, विशेषत: पुरुष पुरेसे रोमांटिक नसणे Happy

- नात्यांना विशिष्ट नाव असणे / नसणे

- अनुकूल परिस्थिती असूनही व्यावसायिक जगात तुलनेने कमी वावर

- विषयांतर / अवांतर Happy

ज्याचा प्रत्यक्षात काही उपयोग नाही किंवा करायचा नाही अशा तात्त्विक चर्चा करणे.
उदा : (आपल्या मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळांत झाल्यावर ) मराठी शाळा बंद पडू नयेत . मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण. वाचनसंस्कृती लोप पावत आहे. अमक्या गोष्टीतून मराठीपण लोप पावत आहे Wink
हे स्वतःला संस्कृतिरक्षक जतन करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे असं समजणार्‍या सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. मायबोलीकर म्हणून माझा हात वर.

पुरुष रोमँटिक नसणे.

हे मत सिनेमे बघून तयार झालेले असावे.
सर्वांचे बेडरूम secret जग जाहीर असण्याचे काहीच कारण नाही.
त्या मुळे हे मत नाकारले जात आहे

माझे सासू-सासरे मला पाहुणे नावानेच संबोधन करते.
पाहुण्यांना सांग, पाहुण्यांना पाणी दे वगैरे वगैरे..

आम्ही पुणे जिल्ह्यातले... सासुरवाडी सातारा.

मावशीचा नवरा- काका
आत्याचा- मामा

मामाच्या मुलांना दाजी म्हणतात

बहिणीच्या नवऱ्याला दाजी च.

तत्विक चर्चे नी समाजात विचार पसरला जातो.
त्या मुळे तशा चर्चा कामाच्या नसतात असे काही नाही.
समाजमान्य विचार झाला की सरकारी पातळीवर निर्णय घेतले जातात.
1), महाराष्ट्र मधील सर्व मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज,अभियांत्रिकी कॉलेज ह्यांच्या प्रवेश परीक्षा फक्त आणि फक्त मराठी भाषेत च होतील.
२) सर्व स्तरावरील सरकारी नोकऱ्या साठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा फक्त मराठी मधूनच होतील.
अगदी आयएएस , आयपीएस साठी पण तोच नियम
अशा प्रकारचे सरकारी पातळीवर निर्णय झाले की लोक झक मारत मराठी शिकतील.
जातात कुठे

हिंदी भाषिक लोकात तर भाव की मध्ये लग्न होते.
यादव यादव लग्न करतात.
पांडे ,पांडे लग्न करतात .
शुक्ला शुक्ला लग्न करतात.
थोडे फार मुस्लिम loka sarkhi ची त्यांची प्रथा आहे.
मुस्लिम लोक चुलत बहिणी शी लग्न करतात
महाराष्ट्र मध्ये भाव की मध्ये लग्न होत नाही.
नवरा आणि नवरी एकच आडनाव असणारी महाराष्ट्रात सापडणार नाही.

जैस्वाल, पांडे, शुक्ला, इ भावकी नाहीत. समाजाची नावे आहेत. जशा आपल्या कडे पोटजाती असतात तसे.

नवरा आणि नवरी एकच आडनाव असणारी महाराष्ट्रात सापडणार नाही.>>>
देशमुख-देशमुख
पाटील - पाटील

मी नाही कुठे च बघितले.

पाटील ही पदवी आहे त्यांची आडनाव वेगळी असतात.
तेच देशमुख बाबत पण आहे

आमच्या ऑफिस मध्ये एक चहा वाला भट होता.
त्यांच्या जातीत तर खूप भयंकर स्थिती आहे
बहीण असेल तर च मुलाचे लग्न होईल अन्यथा खूप कठीण.
मुलगी ध्या आणि मुलगी घ्या.
साठे लोटे.
बहीण नसेल तर लग्न च होणार नाही.
अशी बिकट स्थिती आहे.
असे त्यांच्या शी चर्चा करताना माहीत पडले

पाटील ही पदवी आहे त्यांची आडनाव वेगळी असतात.
तेच देशमुख बाबत पण आहे>>>
तसेच असते. जैस्वाल किंवा अन्य आडनावात. सोम-जैस्वाल, कल्वर जैस्वाल इत्यादी.
तात्पर्य काय प्रत्येक समाजाचे/ भाषिकांचे काही वैशिष्ट्य असते. काही त्रुटी तर काही बलस्थाने असतात. त्यामुळे असो!. इथे चर्चेचे स्वरूप 'कोण लहान कोण महान ' असे होऊ नये.

वर च कोणी तरी पोस्ट केली आहे.
मामे बहीण, आते बहीण शी मराठी लोक लग्न करतात हे बघून उत्तर भारतीय लोकांस धक्का बसला होता.
मग भाव की मध्ये लग्न त्यांची होतात ते वाचून आम्हाला पण धक्का बसतो.

Ok

महाराष्ट्र ची खाद्य संस्कृती पण खूप उच्च आहे.
आणि आरोग्य दायक आहे.

भात खाणारा अर्ध्या पेक्षा जास्त भारत आहे.
पण ज्वारी ,बाजरी,नाचणी ची भाकर.
मेथी, mat, शेवगा, चवळी ह्याची पाले भाजी.
घेवडा,,चवळी, मूग, उडीद, वाटाणा, पावटा .
ही कड धान्य.
आणि मासे आणि maton, अंडी.
असा पारंपरिक आहार .
भात कमी .
इतके योग्य पोष्टीक आहार असणाऱ्या मोजक्याच राज्य पैकी महाराष्ट्र एक आहे.
पंजाब, हिमाचल,उत्तराखंड, गुजरात .कर्नाटक राजस्थान अशा मोजक्याच राज्यांचा आहार शास्त्रीय दृष्ट्या अतिशय उच्च प्रति चा आहे.

टिपटॉप रहात नाहीत, तेच पंजाबी बघा...

हे मिसले वरील यादीत. विशेष लक्षण म्हणून मान्य व्हावे. 'साधी राहणी' फारच मनावर घेतो आपण. poor / अंडरड्रेसिंग बाबतीत तमिळ आणि मराठी जनतेत चुरस आहे असे वाटते.

आताच्या जगात टिपटॉप नसणे हा सदगुण आहे का याबद्दल मात्र मतांतरे असू शकतात Happy

काही अ-मराठी परिचितांसोबत मराठी साखरपुडा-विवाह समारंभात एकत्रितपणे जाण्याचा योग आला. हिन्दी पट्टयातील तसेच तेलुगु परिचित.

मराठीपणाच्या लक्षणात त्यांचे मुद्दे :-

- मराठी स्त्रियांचे कुटुंबातील महत्व आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान. हे त्यांना फार उजवे वाटले.

- समारोहातील साधेपणा. मितव्ययता. दोन्ही पक्षांनी समसमान वाटून घेतलेल्या जबाबदाऱ्या आणि खर्च. याची खूप तारीफ केलीन.

- बहुतेक समारंभ ठरलेल्या वेळेत सुरु झाले आणि संपले. मराठीजनांचा आटोपशीरपणा नावाजला गेला. हमारे यहाँ सुबह की शादी शाम तक हो जाए तो बहुत है, आप के यहाँ लोग समय की कद्र करते हैं असे कॉप्लीमेंट !

- मराठी पुरुष = सभ्य पुरुष. बहुतांश पुरुष एकदाही उपस्थित महिलांना uncomfortable होईल असे वागले नाहीत. Huge compliment !

- समारंभात एकएकट्या आलेल्या स्त्रिया, त्यांचा सहज वावर. याचे फार अप्रूप वाटले दोन्ही ग्रुप्सना. आमच्याकडे हे फार कमी घडते असे त्यांनी सांगितले.

Negative कॉमेंट्स कमी होत्या, त्या नंतर लिहितो. Happy

वाचतोय...मराठी मनाचे वेगवेगळे पैलू माहित होतायेत...
बरेच मुद्दे वर आलेत....
शौर्य, मर्दुमकी या बाबतीत निःसंशय आपण इतरांपेक्षा जास्तच होतो...
मला मराठी माणसांची ही वैशिष्ट्य खूप भावतात... मराठ्यांची थोरल्या महाराजा नंतरची मुसद्देगिरी आणि मर्दुमकी...

>>>>>>>>मराठी स्त्रियांचे कुटुंबातील महत्व आणि निर्णय प्रक्रियेतील स्थान. हे त्यांना फार उजवे वाटले.
होय!!!

विषय छान आहे. अनिंद्य, भरकटणाऱ्या धाग्याला सोडवून आणायचा प्रयत्नही स्तुत्य!!

१. उत्तर भारतीय, पंजाबी, राजस्थानी, गुजराथी ह्यांच्या तुलनेत मराठी माणसं थोडी साधी वाटतात. बऱ्यापैकी "साधी राहणी आणि उच विचारसरणी" काही प्रमाणात तरी बघायला मिळते. मला वाटत पण गेल्या काही वर्षात हे बदलतंय.
पण दक्षिणेकडील किंवा बंगाली लोकं कधीकधी अजून जास्त मूळ पकडलेली/ साधी वाटतात.

२. "अमेरिकेतील मराठी बाणा" ह्याविषयी बऱ्याच वेळा उल्लेख झालेला बघितला. त्याविषयी माझे अनुभव.

मुलांना मराठी बोलता येत असेल किमान त्यांना समजत असेल तरी त्याचे इकडे कोण कौतुक वाटते. जे मी इतर ( तामिळ, तेलगू, हिंदी, गुजराथी, चायनीज किंवा इतर आशियायी, स्पॅनिश ) भाषेतील लोकांमध्ये पाहिले नाही. उलट त्यांच्याकडे येत नसेल तर आई वडील थोडे खजील होताना पाहिलेत.
हे खरे असले तरी काही पालक प्रयत्नपूर्वक मुलांना मराठी वाचन, लिखाण, बोलणे शिकवतात, म्हणूनच मराठी शाळा चालतात.

BMM (बृहन महाराष्ट्र मंडळ ) चे अधिवेशन दर दोन वर्षांनी भरते, म्हणावे तर मराठीचा सोहळा. पण २०२२ आणि २०२४ ची वेबसाइट बघितली तर मुख्य पानावर मराठी खिरापती येव्हढही दिसत नाही.
सगळ्या मिटिंग, इतर संभाषणे इंग्लिश मधेच होतात.
>>>> मला व्यक्तिशः हे दोन्ही बरोबर वाटत नाही.

आता माझा एक प्रश्न- अशा ठिकाणी (BMM) मराठी वापरण्या विषयी आग्रही असले तर तो दुराग्रह झाला का?

Pages