‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Submitted by अनिंद्य on 1 January, 2023 - 04:35

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही Happy

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दकोशात दिलेला अर्थ - परवां. परव्हां—नस्त्री. मागचा किंवा पुढचा दिवस, थोडा काळ मागील; पुढील अल्प काळ. 'हें पोर परवांचें पण फार बोलतें.' -क्रिवि. कालच्या मागच्या किंवा उद्याच्या पुढच्या दिवशीं. [सं. परस्वस्, परश्वः पर + वासर]
https://dsal.uchicago.edu/cgi-bin/app/date_query.py?page=1939

मराठी लोक च स्वप्न च्या दुनियेत असतात
झोपेत असतात.
लाथा बसतात आणि झोप मोडते तेव्हा ह्यांची स्वप्न तुटतात.
तेव्हा वेळ निघून गेलेली असते

सर्व महत्वाच्या गोष्टी मराठी लोकांनीच भारतात प्रथम केल्या आहेत.
मराठी लोकांसारखे संस्कारी लोक नाहीत.

मराठी ही भारतातील ग्रेट भाषा आहे.
तमिळ,बंगाली, तेलगू, भाषा सारखी.

बकवास भाषा आणि गर्व
कष्ट करण्याची कुवत नाही>> प्रतिसाद देण्यापुर्वी मागच्या पानावर काय आपण काय लिहिले ते तरी वाचायचे कष्ट घ्या हो सर Lol

…. मराठीत आत्या आणि मावशी यांच्या नवऱ्यांसाठी शब्द आहे का?…

मराठीत आत्या आणि मावशी च्या पतीसाठी निश्चित संबोधन / शब्द नाही असे मला वाटते. ते नाते डेव्हलपच नसेल झाले म्हणून असेल कदाचित. हिंदी, उर्दूत (अनुक्रमे फूफा आणि मौसा) तसे शब्द आहेत. तेलुगुतही आहेत.

तस्मात नात्यांचा- नातेवाईकांचा फार पसारा न करणे हा मराठी गुणधर्म धरावा का ?

मराठीत आत्या आणि मावशी च्या पतीसाठी निश्चित संबोधन / शब्द नाही असे मला वाटते.>>>
छान.
ते नाते डेव्हलपच नसेल झाले म्हणून असेल कदाचित.>>
कितीतरी छान!

>>> मराठीत आतेच्या आणि मावशीच्या नवर्‍याला वेगळं संबोधन नाही. आईचे आईवडील आणि वडिलांचे आईवडील दोघांनाही आजीआजोबा म्हणतो.
हो, तसंच सध्या 'पोन्नियिन सेल्वन' ऐकताना लक्षात आलं की धाकट्या भावाला तमिळमध्ये 'तंबी' म्हणतात. (हे संबोधन आधीही ऐकलं होतं, पण अर्थाकडे लक्ष दिलं नव्हतं). मराठीत मोठ्या भावाला दादा म्हणतात, पण धाकट्यासाठी संबोधन नाही.

हिंदीत मोठ्या काकाला ताऊ , काकीला ताई (सध्या बडे पापा आणि बडी मम्मी) , धाकट्याला चाचा मोठ्या दिराला जेठ , धाकट्याला देवर - तसंच जेठानी देवरानी.

मराठीत बायकोचा भाऊ, बहिणीचा नवरा - दोघेही मेहुणे. हिंदीत साला- जीजा.
बहिणीच्या नवर्‍यासाठी दाजी हे संबोधन महाराष्ट्रात काही भागांत वापरतात हे मालिका पाहून कळले.

रच्याकने - शब्दकोशात मेहुणा याचा एक अर्थ आतेचा किंवा मामाचा मुलगा असाही आहे.

>>> रच्याकने - शब्दकोशात मेहुणा याचा एक अर्थ आतेचा किंवा मामाचा मुलगा असाही आहे.
इन्टरेस्टिंग - मामाची मुलगी करून घ्यायचे म्हणून की काय?

आई चे आई वडील झाले काय किंवा वडिलांचे आई वडील झाले काय दोघांचा मान उच्च च
आजी आजोबा
हिंदी भाषिक तसा भेदभाव करतात.
म्हणून
दादा दादी
नाना नाही.
असले प्रकार

हिंदी मध्ये अजून अवघड आहे.
कर्ता पुरुष
बाबू.(, आपण लहान मुलांना बाबू म्हणून हाक मारतो)
कर्ती स्त्री .
बाई. (आपल्या कडे घरकाम करणारी किंवा शिक्षिका)
आजी आजोबा.
एकच शब्द आणि एकच मान.

आपल्या कडे चुलते म्हणजे ..
काका काकी.
हिंदू भाषिक लोकात तिथे पण भेदभाव आहे.
ताईजी मोठी काकी ..चाची
लहान काकी.
किती हा भेदभाव..

कुठल्याही भाषेत शब्द एखादा विशिष्ट अर्थ ठाशीवपणे कम्यूनिकेट करण्याच्या “गरजे”पोटी निर्माण होत असावेत. ‘नाना’ ‘दादा’ आपल्याकडेही वापरतात पण आजोबांसाठी exclusive नाही

भेद भाव आहे त्या मागे.
बाजू का सावरत आहात

आपल्या कडे कोणी वापरत नाही.
खूप हुशार लोक फक्त वापरत असतील..नाना .नानी.
आणि दादा ,दादी

>>> ‘नाना’ ‘दादा’ आपल्याकडेही वापरतात पण आजोबांसाठी exclusive नाही
हो, तसेच अप्पा, अण्णा किंवा ताई, माई, अक्का. कानडीत यांतील प्रत्येक संबोधनाला निराळा अर्थ आहे ना? तिथे मोठ्या वहिनीला इन्नी किंवा इन्ना म्हणतानाही ऐकलं आहे.

आपल्या कडे एकदम योग्य आहे
वहिनी.
हे फक्त मोठ्या भावाच्या बायकोला बोलले जाते.
लहान भावाची बायको बहिणी सारखी समजली जाते.
नावाने हाक मारतात.
दोन्ही मध्ये योग्य ते भाव आहेत.
बाकी भाषिक राज्यात ते नाहीत

जस्ट रियलाइज्ड की इथे आपण “मराठी बाणा” आणि “मराठीपण” सोडून बाकी सर्व भाषांची चर्चा करतो आहोत Happy Happy

भाषा ही फक्त संवाद साधण्यासाठी वापरले जाणारे टूल नसते.
भाषे वरून ..
संस्कृती, समाज रचना,सामाजिक प्रगती .विचाराचे प्रगल्भ .
सर्व माहीत पडते

इन्टरेस्टिंग - मामाची मुलगी करून घ्यायचे म्हणून की काय? >>> तसेच असावे. इव्हन पाहुणे शब्द महाराष्ट्रातच दोन वेगळ्या अर्थाने वापरतात ना? आमच्या काही ओळखीच्यांमधे मुलीच्या सासरकडच्या लोकांकरता वापरतात. पाहुणे आले आहेत म्हणजे ते लोक आले आहेत. तर इतर अनेक लोक कोणीही नातेवाईक, ओळखीचे काही काळ आपल्या घरी येणे याला "पाहुणे आले आहेत" म्हणतात.

तो "दुनियादारी" पिक्चर मधला "पाव्हणे-पाव्हणे-पाव्हण्यांचे मेव्हणे" असा काहीतरी डॉयलॉग त्याच संदर्भाने असावा.

कन्नडमध्येही लहान भाऊ- तम्मा, मोठा भाऊ-अण्णा, लहान बहीण-तंगी, मोठी बहीण-अक्का असे वेगवेगळे शब्द आहेत.

मराठीत मोठ्या मेव्हण्याला 'भावोजी'पण म्हणतात ना?

माझी एक मैत्रीण आत्याच्या मुलांना भावजी म्हणायची. (मला हे कंडिशनिंग वाटून फार ओंगळवाणे वाटले होते हे नववीतही)

नातलगांना 'पाव्हणं' म्हणणं सुद्धा सामान्य आहे, ते आपल्या घरीच आलेले असले पाहिजेत असे काही नाही.

संवाद, 'मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाव्हणे' असा आहे बहुतेक Happy जितेंद्र जोशी म्हणत असतो.

पाहुणे आणि सोयरे- ग्रामीण महाराष्ट्रात फार महत्वाचा विषय! तासंतास चर्चा झडतात त्यावर.

दोन्ही शब्दांचा त्या कुटुंबाचे व्याही असा अर्थ

आपल्या कडे पण मोठी बहीण आक्का,त्या नंतरची ताई असे संबोधले जाते.
लहान बहीण ल नावाने हाक मारतात.
पण मोठ्या बहिणीला नावाने हाक मारली जात नाही.

सोयरे आणि पाहुणे .
ह्या मध्ये फरक आहे

पाहुणे हा शब्द जनरल आहे.
आपल्या नात्यात नसणारा पण आपल्याकडे आलेला व्यक्ती.
सोयरे .
म्हणजे नात्यातील व्यक्ती

<<<दोन रुपये असतील तरी मराठी लोकांना गर्भ श्रीमंत असल्या सारखे वाटते
आणि ते त्याच भ्रमात असतात..>>>
म्हणजे मराठी लोक अल्पसंतुष्ट असतात. हे मला पटले. हे खरे आहे असे वाटते.

>> मराठीत आतेच्या आणि मावशीच्या नवर्‍याला वेगळं संबोधन नाही>>

विदर्भ मराठवाड्याततरी आत्येच्या नवर्‍याला ममामा आणि मावशीच्या नवर्‍याला काका म्हणतात.
मराठी लोकांनाच ही माहिती नसेल तर 'बाणा' आणि 'पणा'ची चर्चाच व्यर्थ!

विदर्भ मराठवाड्याततरी आत्येच्या नवर्‍याला मामा आणि मावशीच्या नवर्‍याला काका म्हणतात.>>>
संबोधनाची ही पद्धत ज्या समाजात साटे-लोटे लग्न वा एकाच घरात दोन बहिणींना देण्याची प्रथा प्रचलित होती त्यांमध्ये जास्त प्रमाणात आहे. काही ठिकाणी सासूला आत्याबाई म्हणायची पद्धत आते घरी भाचे सून या प्रथेमुळे आहे.
(जरा अवांतर - आतेभावाशी लग्न ही पध्दत समजल्यावर माझ्या काही अमराठी मैत्रिणींना (यात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय दोन्ही आल्या) कल्चरल धक्का बसला होता)

<काही ठिकाणी सासूला आत्याबाई म्हणायची पद्धत आते घरी भाचे सून या प्रथेमुळे आहे.>
आणि सासर्‍याला मामंजी हे मामा वरून आलं असेल का?

Pages