अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.
थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही
आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-
- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.
- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).
- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.
- जन्म-स्वभाव; मनःस्थिती
- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा
एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?
मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते? तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !
स्वाभिमान: मोडेन पण वाकणार
स्वाभिमान: मोडेन पण वाकणार नाही
हे बाणामध्ये अभिप्रेत असावे असे मला वाटते.
माझा नुसता मराठी बाणा
माझा नुसता मराठी बाणा नाही तर पुणेरी वाण आहे.
१) छत्रपति शिवाजी महाराज पूज्य स्थानी.
२) पुलं, लता, सुनील गावसकर, सचिन वर १०० % प्रेम.
३) कमीत कमी शब्दात जास्तित जास्त अपमान करायची क्षमता.
४) बुद्धि मत्ता, मेहनत करायची क्षमता, राकट पणा, थोडा रांगडे पणा सुद्धा.
५) एकदम डोके सटक णे,
६) स्वाभिमान.
काही राहिले असेल तर अॅड करा.
'पुणे तिथे काय ऊणे' वगैरे
'पुणे तिथे काय ऊणे' वगैरे गोष्टी क्षितीज विस्तारल्यावरती ओसरल्या. अनेक सदहृदयी तसेच आपल्यात मिसळून घेणारे भेटले. अनेक जण रेसिस्ट, सेक्सिस्ट व कडू जहरसुद्धा भेटले. विस्कॉन्सिनमधी रेड नेक, शेतकरी तर न्यु यॉर्क मधला बँकर्सचा सुवाव्ह क्राऊड. कॅलिफोर्नियाचे इमेज कॉन्शस, मॉडेल सारखे लोक. तर कुठे 'मिनेसोटा नाईस' लोक म्हणजे तोंडावर गोड मागे कुचूकुचू. हे झाले परदेशी लोक.
पुणे-मुंबई मराठी लोकांमध्ये, बाणा म्हणावा असा एक गुण जरुर वाटतो तो म्हणजे काळाच्या पुढे असणे, सामाजिक बांधिलकी असणे. बाकी सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नांदेड, औरंगाबाद आदि कोणत्याही भागातील लोकांशी विशेष संपर्क नाही आला.
मला तमिळ लोकांचा "मराठी बाणा"
मला तमिळ लोकांचा "मराठी बाणा" फार आवडतो. मराठी जनतेच्या "यूपी बाण्यापेक्षा " कैक पटीने जाज्वल्य!
राघोबा आणि रामशास्त्री ! आपला
राघोबा आणि रामशास्त्री ! आपला बाणा आपण ठरवायचा.
पैसोंकेलिये (केक खानेकेलीये) हम कहीभी जा सकते है. हा पण मराठी बाणाच बर का.
ज्याचा केक त्याच चांगभल.
स्वाभिमान: मोडेन पण वाकणार
स्वाभिमान: मोडेन पण वाकणार नाही
हे बाणामध्ये अभिप्रेत असावे असे मला वाटते.>>>>> सहमत.
शक्य तितके इंग्रजी नि हिंदी
शक्य तितके इंग्रजी नि हिंदी शब्द बोलण्यात वापरणे (यावरून असे समजू नये की त्यांना मराठीचे प्रेम नाही, पण आपल्याला इतरहि भाषा येतात हे दाखवण्याचा उद्देश. शिवाय आपण महाराष्ट्रापुरते संकुचित नाही हेहि दाखवायचे असते. आपले विद्वतापूर्ण बोलणे महाराष्ट्रा बाहेरील लोकांनाहि समजले पाहिजे ना!)
चांगल्या कविता, चांगले लेखन, चांगली गाणी, चांगले नट, चांगले चित्रपट या गोष्टी फक्त हिंदी किंवा इंग्रजीतच असतात (मराठीत नसतात असे नाही, पण हिंदी इंग्रजीचा उल्लेख केल्यास महाराष्ट्राबाहेरील लोकांनाहि कळेल की आपण किती शहाणे आहोत)
.... मला तमिळ लोकांचा "मराठी
.... मला तमिळ लोकांचा "मराठी बाणा" फार आवडतो. मराठी जनतेच्या "यूपी बाण्यापेक्षा " कैक पटीने जाज्वल्य!....
मार्मिक आणि मर्मभेदी !
....'मोडेन पण वाकणार नाही' ..
....'मोडेन पण वाकणार नाही' .....
हा वाक्प्रयोग 'मराठी बाणा'ला जोडूनच येतो खरा. पण 'मराठी' असण्याचे ते एक लक्षण / एक गुणविशेष असावा.
मान्यवरांचे प्रतिसाद मजेशीर
मान्यवरांचे प्रतिसाद मजेशीर आहेत.
इथे विचारला तसा "मराठी बाणा म्हणजे काय ? मराठीपणाची खास अशी लक्षणे कोणती ?" हा प्रश्न मी अन्यत्रही अनेकांना विचारला. बहुतेकांचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :-
सकारात्मक मुद्दे :-
- खानपानाच्या खास सवयी
- मराठी भाषेवर प्रेम / अभिमान
- साधेपणा, समाजात बडेजाव फारसा नसणे
- व्यवहाराला सरळ असणे / फसवणूक न करणे
- काळापुढे विचार करणारा समाज / माणसे
- समाजसेवा करण्यास तत्पर असणे
- महापुरुषांचा अभिमान असणे
- मराठी साहित्य आणि नाटकांवर प्रेम (याबद्दल मी साशंक आहे, मराठी नाटकांना फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे असे काही दिसून नाही आले. भरपूर वाचन म्हणजे वपु-पुलं यांची चारदोन पुस्तके आणि छावा-श्रीमान योगी-स्वामी-ययाती असाच बहुतेकांचा समज दिसतो)
नकारात्मक :-
- स्वभाषेचा अभिमान नसणे
- अन्य मराठीभाषिकांना मदत न करण्याची वृत्ती
- इतिहासात जास्त रमणे
- राजकारणाची अतिव आवड
- दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करण्याबद्दल, इतरांमध्ये मिसळण्याबद्दल उदासीनता
- पैसे कमावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाबद्दल उदासीनता / अप्रीती
- थोडा भांडकुदळपणा / वाद घालण्याची वृत्ती
- अति हिशेबीपणा
अर्थात हे मुद्दे प्रत्येकाने आपापल्या अनुभवावरून ठरवले असतील. इथे लिहिणाऱ्यांचे आभार.
काही राहिले असेल तर अॅड करा.
काही राहिले असेल तर अॅड करा.
>>> दुपारी एक ते चार झोप...
काही राहिले असेल तर अॅड करा.
काही राहिले असेल तर अॅड करा.
>> पुण्याच्या कुठल्याही गोष्टीचा अनाठायी अभिमान
मराठीपणाचे एक व्यवच्छेदक
मराठीपणाचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असे वागणे. (अशा अर्थाची म्हण अजून दुसर्या कोणत्या भाषेत आहे ?) कम-अस्सल, अधले मधले काही चालतच नाही.
मराठीपणाचे अजून एक व्यवच्छेदक लक्षण म्हणजे पाय जमीनीवर असणे
ह्याला कारणीभूत म्हणजे मराठीपणाचे दुसरे एक व्यवच्छेदक लक्षण, दुसर्या (मराठी माणसा)चे पाय खेचणे
टोळी करून एकमेकांना सहाय्य करून / उत्तेजन देऊन विना गुणांची मराठी माणसे पुढे गेल्येत असे सहसा दिसत नाही. जी इfunction at() { [native code] }अर भाषिक माणसे सर्रास दिसतात.
मधल्या काळात हे दुसरे लक्षण निदान महानगरांमधून जरा कमी झालेले दिसत होते पण सध्याच्या संकुचित अस्मितेच्या राजकारणानंतर ते लक्षण परत उफाळून वर येताना दिसत आहे.
कुठल्याही क्षेत्रात सर्वोच्च पदी पोचलेली मराठी माणसे बघता बहुतेक सर्वजण प्रामाणिकपणा, कौशल्य आणि कामावर निष्ठा अशा निव्वळ गुणांवर तिथे पोचलेली आढळतात.
अनिंद्य यांची एकूण चर्चेचा
अनिंद्य यांची एकूण चर्चेचा गोषवारा देणारी पोस्ट वाचताना 'भाषेचा अभिमान' हा मुद्दा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही रकान्यांत आलेला पाहून मजा वाटली.
बाकी यातला कुठलाच सकारात्मक मुद्दा मराठीपणाचं व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल का याबद्दल मी साशंक आहे. उदा. नाटकांची परंपरा बंगाली लोकांनाही आहे, तशी उदा. भारताबाहेर ब्रिटिशांनाही. खानपानाच्या सवयी कुठल्याही समूहाच्या असणारच. इतिहासात(च) रमायची खोड उभ्या भारताला आहे, तसाच महापुरुषांचा (अनाठायीसुद्धा) अभिमानही.
खरंतर हा प्रश्न बिगरमराठी लोकांना विचारायला हवा की त्यांना काही 'फॅमिली ट्रेट्स' दिसतात का आपल्यात.
मतभेद व्यक्त करणे?
मतभेद व्यक्त करणे?
इथे 'साउथिंड्यनपणा' धागा निघाला असता तर शतकी प्रतिसाद मिळाले असते बहुतेक. किंवा 'अमेरिका रिटर्न्ड मराठीपणा' ला हजारात.
... हा प्रश्न बिगरमराठी
... हा प्रश्न बिगरमराठी लोकांना विचारायला हवा....
होय, मी अ-मराठी लोकांना हा प्रश्न विचारतो नेहेमी, फार मजेदार उत्तरे मिळतात. त्यात 'तुम्ही लोक कंजूष असता' ते 'खूप मिरच्या खाता बॉ तुम्ही' पर्यंत विस्तृत रेंज दिसते
त्यांचा सॅम्पल साईझ छोटा असतो हे आहेच
What People Think About
What People Think About Marathi | Street Interview | Jeheranium | JM
https://www.youtube.com/watch?v=YUVjPRS-tlY
ह्याचे अजून दोन भाग आहेत.
भाषा ही संवाद ची गरज आणि
भाषा ही संवाद ची गरज आणि माध्यम आहे.
इतकाच भाषेचा अर्थ आहे .
पण फक्त ही शुद्ध व्याख्या आणि त्याचा अर्थ हा फक्त कागदावर असतो.
माणसं माणसं ही वेगळी आहेत.
प्रत्येकाचे ग्रुप आहेत.
जेव्हा हितसंबंध जपण्याची वेळ येते तेव्हा हे अनेक ग्रुप active होतात.
जात,धर्म,भाषा,राज्य ,देश असे लोकांचे कट्टर ग्रुप आहेत.
सौजवल विचार करून सर्व सामान आहेत असे विचार आता चालत नाहीत.
जेव्हा मराठी बोलणारे ह्यांचे हित आणि हिंदी भाषा बोलणारे ह्यांचे हित असा प्रश्न निर्माण होईल .
तेव्हा तुमचं किती ही जवळचा हिंदी भाषिक मित्र असला तरी तो तुम्हाला साथ देणार नाही .
तो त्यांच्याच ग्रुप मध्ये जाणार
हिंदू मुस्लिम दंगलीत चार पिढ्यांचे प्रेमाचे सबंध असणार पण विभागले गेले.
त्या मुळे अती उदार होवू नका .
नाही तर तुमचे अस्तित्व च नष्ट होईल.
मराठी भाषिक जन्माने म्हणून नेहमीच भाषिक वादात आपल्याच मराठी भाषेचा अभिमान असलाच पाहिजे
तुमचे अस्तित्व च त्या वर अवलंबून आहे.
उदार मतवादी मराठी म्हणून तुम्ही भाषिक मतभेद वर्ज मानता.
पण ह्या तुमच्या ह्या विचारला काहीच किंमत नसते गैर भाषिक वेळ आली तर तुमची कत्तल करण्यास पण मागे पुढे बघणार नाहीत.
त्या मुळे
जिथे जिथे भाषेचा संबंध येईल तेव्हा स्वभाषा असणाऱ्या लोकांचे समर्थन.
हे व्यावहारिक शहाणपण आहे..
उगाच च जास्त उदार होवू नका.
पहिले भारतीय नंतर मराठी
असले काही खऱ्या आयुष्यात नसते.
पहिले मराठी आणि नंतर च भारतीय हे व्यवहारिक आहे.
सर्व भाषिक अगदी कडवे असतात ह्या बाबतीत.
मराठी लोक च स्वप्न च्या दुनियेत असतात
झोपेत असतात.
लाथा बसतात आणि झोप मोडते तेव्हा ह्यांची स्वप्न तुटतात.
तेव्हा वेळ निघून गेलेली असते
@ हर्पेन,
@ हर्पेन,
छान आहे उपक्रम
@ स्वाती_आंबोळे,
.. 'भाषेचा अभिमान' हा मुद्दा दोन्ही रकान्यांत ... खरंय.
स्वप्रतिमा आणि इतरेजनांचा अभिप्राय अशा दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न आहे. मराठीजनांना भाषेचा पुरेसा अभिमान नाही, ते तमिळ / गुजराती / तेलगू बघा कसे स्वभाषेतच बोलतात, आपण इंग्रजी किंवा हिंदीला फार जवळ करतो असं एक मत
आणि
महाराष्ट्रापासून इतके दूर असलात तरी तुमची मुले सुंदर मराठी बोलतात असे कौतुक, मराठी भाषेचा गर्वच नाही तर माज आहे, स्वभाषेतच बोलतो /बोलावे इत्यादी.
दोन्ही प्रकारची मते दिसलीत, त्यामुळे दोन्ही रकान्यात
व्यापारी हित जपण्यासाठी
व्यापारी हित जपण्यासाठी,आधुनिक शिक्षण घेण्यासाठी,वेळ पडली तर च संभाषण साठी बाकी भाषा शिका आणि वापरा पण .
पण जी आपली ओळख आहे मराठी भाषिक म्हणून ती जपलीच पाहिजे तुमचे आडनाव च तुमची ओळख सांगते.
तमिळ भाषा शिकलात, तीच भाषा वापरली तिथेच राहत असाल.
पण जेव्हा तुमची ओळख सांगितली जाईल किंवा दुसरे तुम्हाला ओळखतील ते मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणूनच च .
तुम्ही तामिळी कधीच होवू शकणार नाही.
मुंबई मधील पर प्रांतीय इथे चार पाच पिढ्या राहत असेल तरी ते .
स्वतः ल गुजराती,मारवाडी,बिहारी म्हणून च ओळखतात.
ते आम्ही मराठी आहोत महाराष्ट्रीयन आहोत आणि आम्हाला महाराष्ट्र cha अभिमान असे कधीच व्यक्त होत नाहीत.
तमिळ भाषा शिकलात, तीच भाषा
तमिळ भाषा शिकलात, तीच भाषा वापरली तिथेच राहत असाल.
पण जेव्हा तुमची ओळख सांगितली जाईल किंवा दुसरे तुम्हाला ओळखतील ते मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणूनच च .
तुम्ही तामिळी कधीच होवू शकणार नाही.
>>>करेक्ट... म्हणून शिवाजीराव गायकवाड ला तमिळ म्हणून कोणी ओळखत नाही... बरोबर ना...
शिवाजीराव गायकवाड ? कोण बरे
शिवाजीराव गायकवाड ? कोण बरे तो ?
तंजावूरचे राजे भोसले
ग्वाल्हेरचे शिंदे
इंदूरचे होळकर
धारचे पवार
बडोद्याचे गायकवाड ....
नावे इतिहासातली असली तरी मंडळी मराठी वाटतात बॉ
देवासचे कुमार गंधर्व, गडगचे
देवासचे कुमार गंधर्व, गडगचे भीमसेन जोशी, इंदोरचे दाते वगैरेही.
हॅलो. बंगलोरचा राहुल द्रविड.
हॅलो. बंगलोरचा राहुल द्रविड.
मी स्वतः. आमचे पूर्वज आंध्र
मी स्वतः. आमचे पूर्वज आंध्र आणि तमिळ प्रांताचे राजे होते (पल्लव) हे कुणाला आज खरं वाटणार नाही. आता तलवारी, भाले जाउदेत, बिजागर्याही गंजू लागल्यात.
>>>....खानपानाच्या खास सवयी..
>>>....खानपानाच्या खास सवयी....>>>
हा रेल्वेतला >>> खानपान>>> बाणा आहे, उगीचच मराठीत घुसडला.... मराठीत खाण्यापिण्याच्या सवयी असे आहे.
उगीचच मराठीत घुसडला....
उगीचच मराठीत घुसडला.... मराठीत खाण्यापिण्याच्या सवयी असे आहे.
शुद्ध भाषेबद्दल जागरूकता / आग्रह हे ऍडवु का वर मराठीपणाच्या लक्षणात ?
शुद्ध भाषेबद्दल जागरूकता /
शुद्ध भाषेबद्दल जागरूकता / आग्रह हे ऍडवु का वर मराठीपणाच्या लक्षणात ?
ऍडवु!!
नको. असा मराठी बाणा नको.
तोडो नाही जोडो. इंग्लिश ह्यामुळेच समृद्ध झाली. मराठीतही उर्दू फारसी तुर्की शब्दांची रेलचेल आहे.
हिंदी भाषेला विरोध नाही. पण हिंदी राष्ट्र भाषा आहे ह्या घोषणेला विरोध आहे.
ऍडवु!! नको. असा मराठी बाणा
ऍडवु!!
नको. असा मराठी बाणा नको......
अरेरे, माझा पांचट जोक करण्याचा प्रयत्न फसला जौद्या.
'अमेरिका रिटर्न्ड मराठीपणा'
'अमेरिका रिटर्न्ड मराठीपणा'
हे काय आहे ? कुणी प्रकाश टाकेल काय ?
Pages