मायबोली गणेशोत्सव २०२२ निकाल आणि समारोप

Submitted by संयोजक on 25 September, 2022 - 08:24

निकाल

लेखन स्पर्धा - कॉलेजचे ते मोरपिशी दिवस
https://www.maayboli.com/node/82443

प्रथम क्रमांक - ऋन्मेऽऽष
https://www.maayboli.com/node/82403

द्वितीय क्रमांक - कविन
https://www.maayboli.com/node/82315

तृतीय क्रमांक - मोहिनी१२३
https://www.maayboli.com/node/82333
------------------------------------------------------------------

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत - मोठा गट
https://www.maayboli.com/node/82444

प्रथम क्रमांक - जरबेरा
https://www.maayboli.com/node/82384

द्वितीय क्रमांक - साक्षी
https://www.maayboli.com/node/82347

तृतीय क्रमांक - रूपाली विशे - पाटील
https://www.maayboli.com/node/82217
-------------------------------------------------------------------------------

हस्तलेखन स्पर्धा - विषय - स्वतंत्र भारत - छोटा गट
https://www.maayboli.com/node/82445

प्रथम क्रमांक - मल्हार ( मायबोली आयडी : मित )
https://www.maayboli.com/node/82341

द्वितीय क्रमांक - समर्थ ( मायबोली आयडी : मुग्धटली )
https://www.maayboli.com/node/82326

तृतीय क्रमांक - विवान (मायबोली आयडी - रूपाली विशे - पाटील)
https://www.maayboli.com/node/82318

उत्तेजनार्थ - मिताली ( मायबोली आयडी : _मयुरी_ )
https://www.maayboli.com/node/82345
----------------------------------------------------------------------------------------

चित्रकला स्पर्धा- मोठा गट - पावसाळ्यातील दृश्य
https://www.maayboli.com/node/82446

प्रथम क्रमांक - मुग्धमानसी
https://www.maayboli.com/node/82192

द्वितीय क्रमांक - uju
https://www.maayboli.com/node/82401

तृतीय क्रमांक - jui.k
https://www.maayboli.com/node/82398
-----------------------------------------------------------------------------

पाककृती स्पर्धा क्र १- तिरंगी पदार्थ - मतदान
https://www.maayboli.com/node/82447

प्रथम क्रमांक - म्हाळसा
पदार्थाचे नाव - शाम सवेरा
https://www.maayboli.com/node/82423

द्वितीय क्रमांक - साक्षी
पदार्थाचे नाव - तिरंगी रवा टोस्ट
https://www.maayboli.com/node/82412

तृतीय क्रमांक - अमितव
पदार्थाचे नाव - व्हिएतनामी फ्रेश स्प्रिंग रोल्स
https://www.maayboli.com/node/82219
------------------------------------------------------------------

पाककृती स्पर्धा-२ - कडधान्यांपासून तिखट पदार्थ
https://www.maayboli.com/node/82448

प्रथम क्रमांक - अस्मिता
पदार्थाचे नाव - कडधान्याची कटोरी चाट
https://www.maayboli.com/node/82353

द्वितीय क्रमांक - म्हाळसा
पदार्थाचे नाव - मूग ज्वारी मेथीचे नोफेल वॅाफल्स/अप्पे
https://www.maayboli.com/node/82354

तृतीय क्रमांक - साक्षी
पदार्थाचे नाव - फलाफल बॉम्ब
https://www.maayboli.com/node/82355
**********************************************************

समारोप

नमस्कार मायबोलीकरहो ,
मायबोलीला या गंणेशोत्सवात २६ वर्षे पूर्ण झाली. अशा वेळी संयोजन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा आम्हा संयोजक मंडळालातील सदस्यांना अभिमान वाटतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही तुम्ही गणेशोत्सवात दाखवलेला उत्साह ओसंडून वाहत होता.

या वेळच्या संयोजक मंडळात असलेले सदस्य निरनिराळ्या देशातील होते. परंतु जेव्हा संयोजनाच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा जग छोटे आहे असे वाटू लागले. प्रत्येक सदस्यांच्या डोक्यातून नवनवीन कल्पना येऊ लागल्या. त्यातील कठीण, सोपे अशा सर्व उपक्रमांची यादी बनवली गेली, ती यादी एवढी मोठी झाली कि पुढील २ वर्षांच्या गणेशोत्सवासाठी सोय होईल इतकी लांबलचक झाली. अर्थात सगळे उपक्रम ठेऊ शकत नव्हतो . त्यातल्या त्यात मायबोलीकरांच्या पसंतीला उतरतील असे उपक्रम निवडले गेले. सगळे वेगवेगळ्या प्रमाणवेळेत काम करत होते तरीही सगळ्यांकडून समन्वय योग्य रीतीने साधला गेला.

उत्सव सुरु झाल्यानंतर स्वरचित रचनेने उपक्रमांचा नारळ फोडला, तर इतर खेळांनासुद्धा पहिल्या दिवसापासून उदंड प्रतिसाद लाभला. इतर उपक्रम आणि स्पर्धांसाठी येणाऱ्या प्रवेशिका सुरुवातीला थोड्या संथ गतीने येत होत्या त्यामुळे संयोजक मंडळ उपक्रमांच्या निवडीबाबत थोडे साशंक झाले होते परंतु उत्सव मध्यावर आल्यानंतर स्पर्धा उपक्रम आणि खेळात भाग घेणाऱ्यांनी जो काय वेग पकडला तो बघून संयोजक मंडळात आनंदाचे घोडे जोरजोरात दौडू लागले. शशकच्या दोन्ही कथांची सुरुवात पकडून त्या इतक्या प्रकारे खुलवता येतील असे आम्हाला वाटले सुद्धा नव्हते. दोन्ही कथांच्या सुरुवातीचा एकमेकात मेळ घालून वेगळीच कथा रचून आम्ही पट्टीचे मायबोलीकर आहोत हे तुम्ही दाखवून दिलेत. लहान मुलांच्या उपक्रमांमध्ये चित्रकला आणि हस्तकलेमध्ये त्यांनी दाखवलेले बारकावे लक्षवेधक होते. हस्तलेखनस्पर्धेत मोठ्या मायबोलीकरांनी तर भरभरून प्रवेशिका दिल्या तसेच लहानांचा सहभागही काही कमी नव्हता. छोट्या दोस्तांनी उपक्रम आणि स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतल्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो. चित्रकला- मोठा गट यामध्ये जी चित्रे अली ती तर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी लावण्यायोग्य होती. कॉलेजमधील मोरपिशी दिवसांबद्दल लिहिताना आणि ते वाचताना सगळेच आपापल्या कॉलेजच्या दिवसात जरा फिरून आले नसले तरच नवल. मर्मबंधातील नात्याने तर मनातील हळवा असलेल्या एका कोपऱ्याला अलगद स्पर्श केला. गणपती एक चिंतन या उपक्रमामुळे अभ्यासपूर्ण असे धागे सगळ्यांना वाचायला मिळाले. पाककला स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी दाखविलेले नावीन्य तर दिसलेच तसेच त्यामागची मेहनत विशेषकरून दिसून आली. तुमच्या घरातील गणपतींच्या दर्शनाने आणि त्यांना अर्पण केलेल्या नैवैद्याने गणेशोत्सवाला एक वेगळीच गोडी आली होती.

एकंदरीत मायबोलीवरील या वर्षीचा गणेशोत्सव पार पाडण्यासाठी तुम्ही मायबोलीकरांनी खूप छान असा सहयोग दिलात. आमच्याकडून झालेल्या छोट्यामोठ्या चुका माफ केल्यात. त्याबद्दल संयोजक मंडळ मायबोलीकरांचे आभारी आहे. मायबोली प्रशासक आणि वेबमास्टर यांनी आम्हाला या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या संयोजनाची संधी दिल्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार.

अजून एका दुःखद गोष्टीचा उल्लेख आम्ही टाळू शकत नाही. उत्सव आनंदात साजरा होत असतानाच वाईट घटना घडल्या त्या म्हणजे मायबोलीवरील आपले सदस्य सुप्रिया जाधव आणि ब्लॅककॅट म्हणजेच डॉ. गजानन कागलकर यांचे अकस्मात झालेले निधन. सुप्रिया जाधव यांच्या नवीन गझला आणि ब्लॅक कॅट यांचे माहितीपूर्ण असे नवीन धागे/प्रतिसाद आता मायबोलीवर परत दिसणार नाहीत याची आम्हाला खंत वाटते. संयोजक मंडळाकडून सुप्रिया जाधव आणि डॉ. गजानन कागलकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्पर्धेतील विजेत्यांचे आणि इतर सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मायबोलीकरांचे आणि छोट्या दोस्तांचे अभिनंदन करून आता आम्ही या वर्षीच्या गणेशोत्सवाचा समारोप करतोय. तुमचा उत्साह, प्रतिसाद असाच अखंड अबाधित राहूदे हि गणेशचरणी प्रार्थना . यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल तुमच्या सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे आणि सूचनांचे आम्ही स्वागत करतो.

धन्यवाद,
मायबोली गणेशोत्सव २०२२ संयोजन समिती
सदस्य : सामो, तेजो, वर्णिता, किल्ली, गोल्डफिश, किशोर मुंढे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजेत्या़चं अभिनंदन!
संयोजकांचंही अभिनंदन, कौतुक आणि आभार!
मजा आली गणेशोत्सवात.

विजेत्यांचे अभिनंदन.
इतर स्पर्धकांचे सुद्धा अभिनंदन.

<<संयोजकांचंही अभिनंदन, कौतुक आणि आभार!
मजा आली गणेशोत्सवात
>> +1

विजेत्या़चं अभिनंदन!
वेळ नव्हता तरी जमेल तसा सहभागी झालो होतो. भरपूर विविधता होती उपक्रमात.
संयोजकांचंही अभिनंदन, कौतुक आणि आभार!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.
सहभागी झालेल्यांचेही आभार आणि कौतुक, सगळ्या उपक्रमात विविधता वाचायला/पाहायला मिळाली.
धन्यवाद संयोजक.. कौतुक!!

वा!! छान !!!

सर्व विजेत्यांचे व मुख्यतः संयोजक समितीचे खूप खूप अभिनंदन!!

वेगवेगळ्या आणि नविन्यपूर्ण उपक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी उत्साहात पार पडला! Happy

हार्दिक अभिनंदन ऋन्मेऽऽष, कविन, मोहिनी१२३, जरबेरा, साक्षी, रूपाली विशे – पाटील, मित मुग्धटली , मयुरी, म्हाळसा, साक्षी, अमितव, अस्मिता.

संयोजक समितीचे खूप खूप अभिनंदन!!

ती यादी एवढी मोठी झाली कि पुढील २ वर्षांच्या गणेशोत्सवासाठी सोय होईल
>>>
चला पुढच्या दोन वर्षांचे टेंशन गेले Happy
मनापासून धन्यवाद संयोजक ! तुमच्याशिवाय उत्सव साजरा होत नाही..

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !!
सर्व स्पर्धकांचे कौतुक Happy

मला मत दिलेल्यांचेही ईथेच आभार मानतो .. आणि आवडीने लिहीता येईल असा विषय दिल्याबद्दल संयोजकांचेही आभार मानतो Wink

सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

संयोजकांचेही अभिनंदन आणि आभार. उत्तम संयोजन केलंत.

आपल्या सर्वांच्या लाडक्या रघूचेही आभार. फार फार धमाल उडवून दिली त्यानं.

विजेत्यांचे अभिनंदन.

सामो, तेजो, वर्णिता, किल्ली, गोल्डफिश, आणि किशोर मुंढेजी खूप आभार!

सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि कौतुक. बालचमुला स्पेशल शाबासकी. भाग घेणाऱ्या सर्वांचेही कौतुक.

संयोजक टीम, उत्तम संयोजनाबद्दल खास कौतुक आणि टाळ्या .

विजेत्यांचे अभिनंदन, संयोजकांचे आभार व टाळ्या !
यावेळी शशक ही खरे तर स्पर्धा नव्हती पण तिथे आलेल्या सर्व प्रवेशिका फस्क्लास होत्या. माबोकरांकडे प्रतिभा खच्चून भरली आहे !

संयोजकांचे आभार आणि कौतुक! खुप छान संयोजन होते. मजा आली!

सर्व स्पर्धकांचे ही कौतुक व विजेत्यांचे अभिनंदन!

संयोजकांचे आभार आणि कौतुक! खुप छान संयोजन होते. मजा आली!

सर्व स्पर्धकांचे ही कौतुक व विजेत्यांचे अभिनंदन!

वा वा, सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
संयोजकांचे खूप कौतुक, छान स्पर्धा अन उपक्रम!

विजेत्या़चं अभिनंदन!
संयोजकांचंही अभिनंदन, कौतुक आणि आभार!
मजा आली गणेशोत्सवात.>>>+१

प्रोत्साहनाबद्दल आभार आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

सामी तुला स्पेशल धन्यवाद. तू धक्का स्टार्ट दिला नसतास तर सुकलेल्या शाईत फुंकर घालून लिखाण झालेच नसते माझ्याकडून

विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे आभार Happy

सगळ्याच उपक्रमात मज्जा आली!!
You guys kept us busy through out the festival Happy

तहानभूक, दिवसरात्र विसरुन नवनवीन/तेच तेच/ठेवणीतले आणि नव्याने तयार करुन वाक्यप्रचार टाकणाऱ्या आणि झब्बू देणाऱ्या कार्यकर्त्यांचेही विशेष आभार

विजेत्या़चं अभिनंदन!
संयोजकांचंही अभिनंदन, कौतुक आणि आभार!
मजा आली गणेशोत्सवात.>>>+१

मी य वर्षांनी माबोवर आले होते गणेशोत्सवात आणि सहज tp म्हणून ते चित्र टाकलेलं इकडे आणि झब्बू मध्ये पण एक दोन दिवस फोटो टाकलेले. खूप छान वाटतय.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! Happy

मजा आली गणेशोत्सवात, मंडप दहा दिवस नांदताजागता राहिला. त्याबद्दल कल्पक आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवणार्‍या संयोजकांचे, तसेच सहभागी उत्साही मायबोलीकरांचे अनेक आभार.

एक बाब मात्र प्रकर्षाने जाणवली ती नोंदवल्याशिवाय राहावत नाही. मायबोलीच्या अधिकृत उपक्रमात शुद्धलेखनाबाबत इतकी अनास्था प्रथमच पाहाण्यात आली. नुसत्या र्‍हस्वदीर्घादी चुका नव्हेत, तर 'जनमानसाच्या मानसावरती' किंवा 'दासबोध मध्ये' यांसारख्या विचित्र शब्द/वाक्यरचना उपक्रमांच्या घोषणांमध्ये पदोपदी खटकत होत्या. मुद्रितशोधनासाठी मदत घ्यावी अशी सुचवणी पहिल्याच दिवशी आली होती, तशी ती घेतली गेली असती तर बरं झालं असतं असं मला वाटतं.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजक समितीचे आभार . तुमच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे गणेशोत्सव छान साजरा झाला . घरगुती कारणामुळे या वर्षी सहभागी होऊ शकले नाही . आत्ता एकेक वाचते आहे .

सर्व विजेत्यांचे अभिनंदन! कॉलेज बद्दलचे बहुतांश लेख वाचलेले आहेत. त्यातील तिन्ही विजेत्यांचे लेख भारी आहेत.

संयोजकांचेही अभिनंदन व आभार. मजा आली.

Pages