कडधान्यांची सलाड बास्केटः मायबोली आयडी: अश्विनी मावशी

Submitted by अश्विनीमामी on 8 September, 2022 - 03:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तीन ताजे पण जास्त न पिकलेले लाल भडक बंगलोर टोमाटो, एक वाटी भिजवलेली मोड आणलेली मटकी, अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ. ( हेच माझे दुसरे कडधान्य ) कोथिंबीर, लाल तिखट, एक दोन चमचे चीज चे तुक डे. बिग बास्केट वर मिक्स मिळते ते सजावटी साठी. धने जिरे पूड, लिंबू रस, मीठ, असल्यास मोमो बरोबरची चटणी किंवा कोणता ही तुमच्या आव्डीचा सॉस. एक दीड चमचा तेल

क्रमवार पाककृती: 

अगदीच सोपीपाककृती : प्रथम तव्यात तेल गरम करुन त्यात मोड आलेली मटकी, भिजवलेली डाळ परतायला घ्या. एक वाटी मटकी असेल तर अर्धी वाटी डाळ घ्या. परततानाच त्यात तिखट, मीठ, धने जिरे पूड, कोथिंबीर घाला व मध्यम आचेवर परतत रहा. पाच ते सात मिनिटात मिश्रण कोरडे खुट खुटीत होईल. मग आच बंद करुन त्यावर लिंबू पिळा व बाजूला ठेवा.
SAHITYA.jpgTAWA.jpg

असल्यास मोमो बरो बरची चटणी किंवा आव्डीचा सॉस मिश्रणा त घाला. पण फार पचपचीत व्हायला नाही पाहिजे. सुके मिश्रण छान लागते

आता हे गार होईपरेन्त टोमाटोच्या बास्केट बनवून घ्या.

basket prep.jpgBASKET PREP01.jpg

वरील मिश्रण त्यात भरा व थोडी कोथिम्बीर भुरभुरवा. झाले.

आता प्लेट मध्ये थोडे चीज, काकडीचे काप, बारीक किसलेला कोबी कश्यावरही ठेवून सर्व्ह करा.

FINAL PRESENTATION.jpg

मी आज डब्यात आणले.

वाढणी/प्रमाण: 
वरी ल प्रमाण एका माणसाचे आहे. टोमाटो साइज वर आहे.
अधिक टिपा: 

ह्यात किसलेले पनीर, लसुण चे तुकडे, बारीक चिरलेली कांदापात, पण छान लागेल. बास्केट संपल्यातर नुसते सारण खाउन मस्त लागते.

माहितीचा स्रोत: 
फार पूर्वी हैद्राबादचे लिंगम पल्लीचे डाँ गोगटे ह्यांच्याकडे गेलो होतो जेवायला. तिथे त्यांच्या आईने ह्या बास्केट केल्या होत्या. मी असले परतुन कडधान्य नेहमी खाते.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. मस्तंच.. बास्केटची आयडिया भारीच!
<<<<मी असले परतुन कडधान्य नेहमी खाते.>>>
मम.. माझं comfort food आहे हे.

अ‍ॅडमिवे/ वेब मास्टर: पा ककृती क्लासिफिकेशन मध्ये पारंपारिक मराठी आहे तसे आधुनिक मराठी/ फ्युजन मराठी पण हवे. किंवा काय सिलेक्ट करावे. हे सलाड तसे कुठेच फिट बसत नाही. पारंपारिक नाही.

टोमाटोला खाली एक बेस बनवून घ्यायचा थोडी चकती कापायची. म्हणजे बास्केट नीट बसेल. मग सुरीने छेद घ्यायचे मधले हँडल ठेवुन. हे झाले की आतला गर अलगद सुरीने किंवा मेलन बॉलर ने कोरुन काढायचे. किंवा काकडी अर्धी कापून मधल्या सीड कोरून काढूनही मध्ये सारण भरता येइल.

सारण भरुन उकडुन तिख्ट दिंडे करता येतील.

किंवा छोटे छोटे नाचणी डोसे करुन त्याव र एक एक चमचा सारण ठेवता येइल.