‘पाठवणी’ म्हटलं की डोळ्यासमोर हमखास उभं रहातं ते लग्नघर(सिरियल किंवा मुव्ही मधील म्हणूया हवं तर)! सासरी निघालेली मुलगी, भावूक झालेले जवळचे नातलगं, ती हुरहुर, भरुन आलेले डोळे! आता अगदी एकाच शहरात आणि आधुनिक काळात असलो तरी पाठवणी शब्दाबरोबर येतेच हुर हुर.
आता थोडे संदर्भ बदलतायत तशी पाठवणी पण. पूर्वी लग्नाच्या वेळी केली जायची पाठवणी आता थोडी अलिकडे म्हणजे शिक्षणासाठी बाहेरदेशी जाताना होते. आणि मुलिचीच नाही तर मुलाची पण होते. पापड, लोणची, मेतकूटापासून ते forex सगळ्याची तयारी केली जाते. आई, आजी, मावशी, काकू, आत्या लाडू, चकल्या , चिवडा इ. फराळाचे डबे तयार करतात. तिकडे गेल्यावर काय करावं , काय करु नये , कसं वागावं ह्याच्या येता जाता सुचना दिल्या जातात. Consulate chya dates, visa appointments, documents, ticketing , तिकडचं housing arrangements हे सगळं लगीनघाईच्या तोडीस तोड असतं. मग जायच्या दिवसाची अजुनच धांदल. Packing, बॅगांच (२२ किलो) वजन, गाडीचं बुकींग, विमानाची वेळ, सोडायला येणारे नातेवाईक! बाहेर देशी निघालेली मुलगी/ मुलगा, भरुन आलेले डोळे, तीच भावुकता तीच हुरहुर!आता आपलं मुल परत कधी भेटेल, सगळं नीट जमेल ना, तब्बेतीची नीट काळजी घेईल ना हजारो प्रश्नांची जाळी आईबापाच्या चेहर्यावर.
संदर्भ अजुन थोडे बदलले. आपला लेक गेला की दहावीला. अजुन दोन वर्षांनी बारावी, मग तो college साठी कुठल्या University /State मधे जाईल? किती लांब जाईल? एकटा कसं manage करेल? सगळं नीट होईल ना,? असंख्य प्रश्न , तीच हुरहुर.
येवढ्या छोट्या (?) माझ्या लेकराची पाठवणी आलीच की तोंडावर!
पाठवणी
Submitted by मीस्वच्छंदी on 1 September, 2022 - 13:01
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाठवणी ची चेष्टा करण्याचा
पाठवणी ची चेष्टा करण्याचा अजिबात उद्देश नाही. पण..
काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे, माझ्या भाचीचं लग्न होतं. ही भाची गेले सात आठ वर्षे शिक्षण आणी नोकरी करता घराबाहेरच राहात होती. मुंबईत नोकरी आणी सासरही तिथलंच. त्यामुळे लांब माहेरच्या नागपूरपेक्षा सासरीच तिचं जास्त जाणं येणं होत होतं.
लग्न होऊन पाठवणीचा प्रसंग सुरू झाला.. विडियो कॅमेरा तिच्यावर रोखल्या गेला. ‘बाबूल की दुवाए..’ सुरू झालं. वाकून नमस्कार.. मिठया वैगेरे सुरू झाल्या.. ती धाकट्या बहिणीला मिठी मारत कुजबुजली, “सायू.. जरा माझ्या पुढे मागे राहून कॅमेरा अडव.. मला अजिबात रडू येत नाहीय..” सायूला स्वत:चं हसणं आवरत नव्हतं..
(No subject)