अमेरिकेतील भारतीय आणि वर्णद्वेष

Submitted by उपाशी बोका on 25 August, 2022 - 22:42

https://mobile.twitter.com/davenewworld_2/status/1562841630713200646?s=2...

व्हिडिओ बघितला की विषय लगेच लक्षात येईल. मेक्सिकन अमेरिकन बाई ४ भारतीय बायकांना टपली मारून जात आहे.

पोलिस आले, पण तिला सोडून दिले. इंटरनेट वर आरडाओरडा झाला म्हणून दुसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली आणि बाँडची रक्कम $१०,००० ठेवण्यात आली आहे.

मवाळ म्हणून भारतीयांना त्रास दिला जातो का? भारतीयांचा success इतरांना खुपतोय का? अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? उद्या तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Sad त्या महिलांनी योग्य ती पाऊले उचलली. शक्य असल्यास रेकॉर्ड करणे - कधी फोन पर्समध्ये असतो आणि मामला २-४ वाक्यात आटोपतो. तेव्हा रेकॉर्डींग शक्य नसते. पोलिस आणि मॉल सिक्यूरिटी बोलावणे. सगळ्यात महत्त्वाचे तिला "गो बॅक टू योर कार" इ सांगत न बसता शक्य असेल तर स्वतः तिथून निघून जाणे. ह्यात पळपुटेपणा काही नाही कारण जर ती आर्म्ड (शस्त्रधारी) असेल तर निशस्त्र चारजणी मिळून तिला काही करू शकत नाही. एखादी क्लोज काँबॅट इ शिकलेली असेल तर मग काय वाटेल ते पंगे करावेत. (प्यायलेली/नशेत होती काय??)

बाकी इतर मुद्दे भारतीयांचे यश इ. साठी पास...

<< ती आर्म्ड (शस्त्रधारी) असेल तर साध्या चारजणी मिळून पण तिला काही करू शकत नाही. >>
Are you sure? व्हिडिओ बघितला का? ती बाई पर्स चाचपताना दाखवली आहे. भारतीय Concealed carry का करत नाहीत?

हो, बघूनच प्रतिसाद दिला. ती म्हणते 'आय विल *** शूट युअर **' . कुठे विषाची परीक्षा...
काही भारतीयांकडे शस्त्रे असतीलही. ह्याबद्दलचे स्टॅटीस्टक्स माहिती नाही.

रेकॉर्डिंग आधी काय झाले ते आपल्याला माहित नाही... ( मेक्सिकन बाई ने वापरलेली भाषा आणि मारपीट चुकीची आहेच..) पण या काकवा नि तिला कमेंट मारून उचकवला असेल नसेल हू नोज??

पाहिले काही कॉमेंट वाचले .तिच्या कृती चे कोणी समर्थन केले नाही .
पण maxican amerikan, Indian amerikan,African American, असे प्रकार अजून तिथे आहेत
दोन दोन पिढ्या गेल्या तरी अमेरिकन ते झाले नाहीत किंवा त्यांना अमेरिकन समजले जात नाही
ब्रिटिश अमेरिकन असा कोणता तिथे गट आहे का.?
उस्तुक्ता म्हणून विचारतो

भितीदायक आहे! सॉरी म्हणावं आणि निघुन जावं. टेक्सस मध्ये दिसतंय तसं असेल तर मग ताबडतोब! काही कुठेले प्रश्न सोडवत बसू नये की भारतीयांना का असले विचार करू नये. मग घेट्टो मध्ये येऊन चर्चा करावी. बस्स! किंवा मग कॅलिफोर्निआ मध्ये जावं.
व्हेपन असलेल्या चांगल्या ट्रेन्ड पुलिसचं आयत्यावेळी काय होतं? माहितच आहे.
आता देसी लोकांनी खिशात बंदुका ठेवल्या, बंदुका ठेवायला ना ट्रेनिंग लागतं का आणखी काही. त्यात डीएसकलेशन सोडून गोळी सुटली तर? इथे व्हिडिओ असुन त्या बाईला तेव्हा पुलिसनी काहीच केलं नाही. गोळी सुटली असती आणि व्हिडिओ नसता... (आता बॉडी कॅम का लावत नाही विचारू नका! म्हणजे झालं) तर केवढ्याला पडतं? बरं आपल्याकडे बंदुक आहे तर तिच्याकडे पण आहे. आता इथे चार वि. एक आहे. उद्या एक वि. एक मध्ये पण गन असणार आहे. आता कॅमेरा धरू का गन चालवू का नेम धरू का ती चालवते आहे का बघू... तिचा नेम आपला नेम... का आपला बचाव करू का तोंडाचा पट्टा चालवू का आजूबाजूला तिची कुठली गँग येते आहे का ते बघू... त्यात पाल्पिटेशन वाढलेलं. घाम फुटलेला.. मला विचारही करवत नाही. जस्ट बॅक ऑफ, आणि गो अवे!
गन सोडा.. त्या तिघी/ चौघींनी तिच्यावर हात उगारला असता. मारलं असतं. तर त्यांना नक्की जेलची हवा खायला लागली असती.

पोलिसांना इतकं डीएसकलेशनचे ट्रेनिंग देऊन देऊन त्यांना ही ते जमत नाही. तरी ते दर काही वर्षांनी ही ट्रेनिंग घेत असतात. गन ठेवून १५० वर्षांत प्रश्न सुटला का? की आणखी गन घेऊन तो सुटेल?
दुर्दैवी आहे इतकंच.

उद्या तुमच्यावर अशी वेळ आली तर काय कराल?>> पोलिसांना रीपोर्ट करेन. तोंडसुख ही घेईन. या अशा घटना जेलसी पोटी सगळी कडे घडत असतात. अजून मुंबई मधे बिहार वाल्या ला आमचा बिजनेस खातो म्हणुन मारहाण होतेच की Sad

बाहेरून येतात आणि आमच्या संधी घालवतात असा काहिसा त्यांचा द्वेष द्रुष्टीकोण असावा, जो संकुचित आहे.

मध्यंतरी ही क्लिप पाहिली होती. मिलिटरी मधून रिटायर झालेल्याची. एकदम चपखल आहे.
https://www.youtube.com/watch?v=5xDANla3L24

तुमच्यावर किंवा तुमच्या बरोबर असलेल्या जवळच्या लोकांवर जर कोण हल्ला करत असेल, फिझिकली त्रास देत असेल तर मधे पडणे व प्रतिकार करणे हे साहजिक आहे. ते करावेच. मात्र जेथे कोणी व्हर्बली धमकी देतोय, आव्हान करतोय अशा, विशेषतः बिनडोक "स्ट्रीट फाइट्स" मधे स्वतः तेथून निघून जाणे हाच चांगला मार्ग आहे, असेच साधारण हा माणूस सांगतोय. ते पटते. कारण तुम्ही मार खाल्लात तर त्रास होईलच पण मार दिलात तरी होईल.

सगळ्यात महत्त्वाचे तिला "गो बॅक टू योर कार" इ सांगत न बसता शक्य असेल तर स्वतः तिथून निघून जाणे. >>>
सॉरी म्हणावं आणि निघुन जावं. >>> सॉरी वगैरे वैयक्तिक चॉईस आहे पण किमान निघून जावं Happy

>>>>>>>>>त्या तिघी/ चौघींनी तिच्यावर हात उगारला असता. मारलं असतं. तर त्यांना नक्की जेलची हवा खायला लागली असती.
करेक्ट आणि पोलिस केस झाल्याने, ग्रीन कार्ड व नागरिकत्व झालेले नसेल तर ते कधीही नंतर झालेही नसते. म्हणजे रक्त व घाम गाळून प्रयत्न करायचा व नामुष्कीने परत जायचे असे झाले असते. या असल्या चिलटांकडे दुर्लक्षही करता येणे अवघड असते. म्हणजे जर तिने हात उगारला तर १००% आपण उसळून मारणारच. पण त्यात लॉन्ग टर्ममध्ये आपलाच तोटा - असे एकंदर गणित आहे.

क्रेझी बाई ! कदाचित त्या बायका त्यांच्या रीजनल भाषेत बोलत असल्यामुळे ऑफेन्ड झाली असावी. मी अमेरिकन आहे आणि इन्ग्लिश मधे बोलते असे काहीतरी म्हटली.
पण अर्थात हे टेक्सास मधे झालंय. गन दिसली नाही व्हिडिओत पण असेलच तिच्याकडे. तिची बडबड ऐकून संताप होतोय पण मीही असेच म्हणेन की तिथून निघून जाणे इज बेस्ट स्ट्रॅटेजी. नंतर काय ते सोशल मिडिया कँपेन वगैरे करावेत एस्केलेट करायचे असेल तर.
टेक्सस आहे हे लक्षात घेतल्यावर पोलिसांच्याही भरवश्यावर राहू नये असेच म्हणेन.

दुर्दैवी घटना आहे. त्या बाईला अटक झाली हे योग्यच झालं.

काही काही प्रतिसाद फारच स्टिरिओटिपिकल वाटले. माझ्या मते पोलिसांना बोलावणे हा सगळ्यात योग्य मार्ग आहे.

<<भारतीयांचा success इतरांना खुपतोय का?>>
शंभर टक्के सत्य. विशेषत: टेक्सास सारख्या मूर्ख, रेसिस्ट लोकांच्या स्वर्गात दुसरे काय करणार?
फक्त असल्या मूर्ख बाईशी वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करावे. तिच्याजवळ गन असती तर तिने मारलेहि असते!
जमल्यास ताबडतोब व्हिडिओ काढायला सुरुवात करावी . त्या व्हिडीओत आजूबाजूची माणसेहि समाविष्ट करावीत. कदाचित ती गप्प बसेल. म्हणजे कोर्टात केस गेली तर त्या माणसांना साक्ष द्यायला बोलवता येईल.
पोलिस काहीहि करणार नाहीत. कारण पोलिसहि टेक्सास चेच - प्रचंड रेसिस्ट,

नन्द्या७५ यांच्याशी सहमत.
याशिवाय स्थानिक राजकारणात थोडा सहभाग हवा, असे वाटते. नुसता मेणबत्ती मोर्चा काढून उपयोग नाही, कोर्टात लढले पाहिजे. साऊथ एशियन कम्युनिटी वोटबँक आहे आणि सधन आहे हे स्थानिक राजकारणी लोकांना कळले पाहिजे.

सॉरी फॉर द डार्क ह्यूमर पण मी रेझिस्ट नाही (रेसिस्ट नका वाचू!) करू शकलो.

Screenshot_20220826-201553_Chrome.jpg

जिथं शाळेच्या नावातच लिंच आहे तिथं काय बोलावं lol!

On a serious note:-
मला काहीच अनुभव नाही अमेरिकेचा म्हणायचं झाल्यास, सेकंडली मायबोलीचे "डेमोग्राफिक्स" पाहता, माझे काही सरळ प्रश्न पण कैक मनांस लागतील, statistics/ counter statistics ची फय्यर झडेल, inference काहीच निघणार नाही असे वाटते. त्यामुळे तूर्तास इथेच थांबतो. कारण मला sterotype न करता उत्तरे मिळतील का नाही ह्याची मला पूर्ण हमी नाही.

टीप :-
अमेरिकन हिस्टरी इज माय फेवरेट पार्ट ऑफ वर्ल्ड हिस्टरी अँड लिंकन इज माय फेवरेट प्रेसिडेंट.

याशिवाय स्थानिक राजकारणात थोडा सहभाग हवा, असे वाटते. >> ही घटना जिथे घडली त्या सिटी मधे भारतीयांची मेजॉरिटी आहे नि एक जण सिटी काँसिल वर आहे.

साऊथ एशियन कम्युनिटी वोटबँक आहे आणि सधन आहे हे स्थानिक राजकारणी लोकांना कळले पाहिजे. >>> ते होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी टाउन मधल्या पदांवर, रेप्रेझेण्टेटिव्हज म्हणून भारतीय लोक दिसू लागले आहेत.

संस्थांमधेही आहेत - एफबीआय पासून ते लीगल टीम्स पर्यंत. ओबामा, ट्रम्प व बायडेन सर्वांच्या स्टाफ मधे बरेच देसी होते.

लोकसंख्येच्या व आर्थिक क्षमतेच्या मानाने जितके असायला हवे तितके हे अजून नसेल. पण गेल्या १० वर्षांत बरेच वाढले आहे.

पण एकूण "कम्युनिटी" मधे सामील व्हायला हवे हे मात्र १००% बरोबर.

पण एकूण "कम्युनिटी" मधे सामील व्हायला हवे हे मात्र १००% बरोबर

सहमत, आपण जिथे राहतो तिथल्या समाजात मिळून मिसळून राहणेच उत्तम असते, असे वाटते.

इंडियन अमेरिकन कम्युनिटी ही अमेरिकेतील वन ऑफ द रीचेस्ट इमिग्रंट वांशिक गट आहे म्हणतात ते खरे आहे का ?

भारतीय लोकांपैकी व्यवसायात किती लोक असतात, उद्योजक किती आणि सर्व्हिस/ टेक/ फायनान्स वगैरे इंडस्ट्री मध्ये नोकरदार किती, हे विभाजन लोकसंख्या अँगलने कुठं वाचायला मिळेल ?

एकंदरीत व्हिडिओ पहा ही बाई नीच मनोवृत्तीची वाटते. निदान धडा शिकवायला तिला शिक्षा व्हावी. एकंदरीत प्रकरण व्हायरल झाले तर बाईंची अपकीर्ती होईल. अगदी परमोच्च दर्जाचे रेसिस्ट मानले जाणाऱ्या टेक्सास राज्यातही अशा प्रकारे वर्णद्वेष उघड दाखवणारी ला कुणी समर्थन देणार नाही.
तिच्याशी भांडण्या ऐवजी ठीक आहे. आम्ही जातो परत. पण मग आमचे तिकीट काढून द्याल का? इ प्रश्न विचारावेत. आपण परत जायला फार फार उत्सुक आहोत पण पैशाची अडचण आहे. ती भागवाल का असे विचारून बाईंची पंचाईत करावी!

इंडियन अमेरिकन कम्युनिटी ही अमेरिकेतील वन ऑफ द रीचेस्ट इमिग्रंट वांशिक गट आहे म्हणतात ते खरे आहे का ? >>> हो पण रिचेस्ट म्हणल्यावर जे डोळ्यासमोर येइल ते म्हणजे बरेच देसी लोक इस्टेट्स बाळगून आहेत वगैरे - हे थोडे वेगळे. वांशिक गटांची सरासरी आर्थिक स्थिती बघितली/ वार्षिक उत्पन्न पाहिले तर भारतीय बहुधा सर्वात वर आहेत. किमान टॉप २-३ मधे तरी.

भारतीय लोकांपैकी व्यवसायात किती लोक असतात, उद्योजक किती आणि सर्व्हिस/ टेक/ फायनान्स वगैरे इंडस्ट्री मध्ये नोकरदार किती, हे विभाजन लोकसंख्या अँगलने कुठं वाचायला मिळेल ? >>> भरपूर आहेत आणि नुसते "एथनिक" व्यवसाय नव्हे (इण्डियन ग्रोसरी, रेस्टॉ ई) पण मेनस्ट्रीम व्यवसायातही आहेत. अगदी गॅस स्टेशन्स (पेट्रोल पंप), सबवे फ्रॅंचायजी ही एक लेव्हल झाली. "पटेल मोटेल्स" हे तर खूप कॉमन आहे. पण इकॉनॉमीमधल्या वरच्या लेव्हललाही आहेत.

बाकी मधे एक लिस्ट व्हॉट्सअ‍ॅप मधे फिरत होती - आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, गूगल, अडोबी, मास्टरकार्ड, ट्विटर, फेडेक्स - व इतर अनेक मोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय वंशाचे आहेत.

बाकी टेक्सास बद्धल प्रचंड गैरसमज आहेत हे इथे प्रतिसाद वाचून कळते... सगळे टेक्सास आणि डल्लास रेसिस्ट नाहीय...
हे जनरलायझेशन म्हणजे दिल्ली ncr स्त्रियांसाठी सुरक्षित नाही म्हणजे अक्खा भारत सुरक्षित नाही असे झाले....

सल्ला देणे खुप सोप पण त्या त्या सिच्यएशन मधे हॅन्डल करण अवघड, ती मुर्ख बाई चक्क अन्गावर धावुन येत होती फारच डेन्जर सिच्यएशन त्यामानाने निट हॅन्डल केल पण तरी हुज्जत न घालता, कुठलही एस्कलेशन न होवु देता तिथुन निघुन जाण जास्त बरोबर होत.

ती बाई एक इग्नरंट फूल आहे यांत अजिबात शंका नाहि. परंतु तशा सिचुएशनमधे विडियो रेकॉर्डिंग करत आल्टरकेशनला खतपाणी देत राहिल्यास सिचुएशन एस्कलेट होणारच. पुलिस केस पुढे झालीच तर त्या भारतीय बायकांनाहि मिस्डिमिनर चार्ज लागु शकतो...

video disturbing आहेच पण पूर्णतः अनपेक्षित नाही. काही दिवसापूर्वि एका high स्कूल च्या मुलाला बुल्ली करतानाचा असाच एक विडिओ viral झाला होता टेक्सास मधला.
थोडं फार रेसिसम (borderline ) होतं क्वचित कुठे. बहुतांशी व्हाईट (गोरे ) लोकंvs colored (इकडे asian, इंडियन , काळे (आफ्रिकन ), मेक्सिकन म्हणजे थोडक्यात गोरी स्किन किंवा कॉकेशिअन वंश सोडून बाकी सगळे ) लोक अशा घटना बघायला मिळतात. हि बाई स्वतः ला जरी मेक्सिकन ओरिजिनची म्हणत असली तरी तिचे लूक्स, भाषा वेगळंच काही सांगते .
ती जी भाषा बोलत होती, ते मध्ये एक युनिव्हर्सिटी प्रोफेसर ची भारतीयांवरच्या द्वेषाची कंमेंट viral झाली होती, exactly त्याची री ओढत होती.

जगभरात सगळीकडेच राजकारणी मंडळी आपल्या फायद्यासाठी द्वेष पसरवण्याची कामे करत असतात, कोणताही देश त्याला अपवाद नसावा, त्यातूनच अशा घटना घडतात.

बाकी अमेरिकेमधील वंशवाद हा खूप मोठा आणि खोल विषय आहे कारण इकडे सगळेच बाहेरून आलेले आहेत (Its a कंट्री ऑफ immigrants ).

आता फक्त वंश वाद आहे त्याची पुढची पायरी वर्चस्व वादा ची लढाई असते.
अजून first step मध्येच आहे तेव्हा च योग्य ते उपचार करणे गरजेचे आहे.
Student fees माफ हा काय प्रकार आहे तिथे.

जगभरात सगळीकडेच राजकारणी मंडळी आपल्या फायद्यासाठी द्वेष पसरवण्याची कामे करत असतात, कोणताही देश त्याला अपवाद नसावा, त्यातूनच अशा घटना घडतात.
>>>>

+७८६

आपल्या ईथेही अल्पसंख्यांक विरुद्ध बहुसंख्यांक द्वेष म्हणा, वा प्रांतवाद म्हणा, वा आरक्षण आणि जातीयवाद म्हणा चालते.. आणि त्यातून दंगेही होतात. यातलेच प्रकरण वाटते हे.

सर्वसाधारणपणे बहुतांश लोकांच्या मनात आपल्या जाती-धर्म-वर्ण-वंश-प्रांत-राष्ट्राला घेऊन एक अहंकार उपजत असतो. पण तो उफाळून तेव्हाच येतो जेव्हा कोणी त्यांना संघटित करून त्या भावनेला खतपाणी घालते.

@ विडिओ, डिस्टर्बिंग आहे खरे.
मला तिथले कल्चर आणि वातावरण माहीत नाही. पण एका परक्या देशात असे आपल्या घरच्या बायकांशी घडले असते तर असा विचार करता आणखी काळजी वाटली.

त्या बायकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने निघून जायला हवे होते हे खरे आहे. पण वाद घालून त्याचा विडीओ काढला नसता तर हे कोणाला कळलेही नसते वा पटले नसते की त्या तिथे असुरक्षित आहेत. उलट एवढेच असुरक्षित वाटते तर जा भारतात परत असाच कांगावा केला गेला असता असे वाटले.

अहो उपाशीबोका, <<साऊथ एशियन कम्युनिटी वोटबँक आहे आणि सधन आहे हे स्थानिक राजकारणी लोकांना कळले पाहिजे. >>
य व्होट्बँकेने ट्रंपसारख्या वर्णद्वेषी माणसाला १२ मिलियन डॉ. दिले होते, अबकी बार ट्रम्प सरकार अश्या घोषणा केल्या होत्या!
हिंदू नि भारतीय लोकांच्या एकजूट होऊ शकत नाही हे गेल्या २००० वर्षाचा इतिहास सांगतो!
<<<पण मग आमचे तिकीट काढून द्याल का? इ प्रश्न विचारावेत. आपण परत जायला फार फार उत्सुक आहोत पण पैशाची अडचण आहे. ती भागवाल का असे विचारून बाईंची पंचाईत करावी!>>>
यावर एक विनोद आहे. पण तो विषयाला धरून होणार नाही.

आता शेंडेनक्षत्र म्हणतील की ट्रंप रेसिस्ट नाही, कारण एक दोन काळी माणसे त्याच्या ओळखीची आहेत!
तो न्यू यॉर्कमधे असताना कसा वागला मेक्सिकन लोकांबद्दल त्याचे काय मत आहे, हे सगळे तात्पुरते विसरून जायचे.

<<सगळे टेक्सास आणि डल्लास रेसिस्ट नाहीय.>> अगदी बरोबर. There are good people on both sides असे ट्रंपनेच म्हंटले होते!! आता कुणि यावर शंका घेतील तर शेंडेनक्षत्र, राज तुम्हाला जाम शिव्या देतील.
कुणा गुंडाने यांच्यावर हल्ला केला तरी ते म्हणतील त्याच्यातहि काही चांगले गुण होते!

शेंडेनक्षत्र आहे, राज आहे म्हणून या धाग्यावर जरा मजा आहे, जरा तरी विनोदी वातावरण निर्माण होते,

Pages