भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लिओ पात्रा चा भाऊ होता ओडीन. तो त्या देशाचा युवराज होता.>>>>
या युवराजाचे एकीवर प्रेम बसले होते. तिच्याही मनात याच्याबद्दल ओढ होती आणि युवराज फेरीला बाहेर पडले की ती धावत त्यांना भेटायला येत असे. परंतु ती सामान्य कुळातील असल्याने त्यांच्या घरच्यांची याला परवानगी नव्हती, त्यामुळे तिच्या कडे बघत उसासे टाकत युवराज आपल्या लोखंडी रथावर बसून घरी परतत. Happy

कुछ कुछ होता है पाहिला असावा.(इंसान का सर सिर्फ 3 लोगो के सामने >> Happy

बापरे एका फोटोने ईतके क्रीऐटीव कॅामेंट्स .. फारच भारी … मंडळी एकदमच विचारवंत आहेत Happy

मला वाटलं कि आता एखाद्या चित्रपटाची पटकथा तयार होतेय कि काय

सगळेच Lol

अस्मिता, अगं लहान आहे ग कोकोनट. थोडा मोठा झाल्यावर बरोबर या दादांच्या पंजावर पंजा टाकून जाईल बघ Wink

दोघा भावांचे गूळपिठ Happy
1c2cdcb4-637c-4848-a7ca-650a8d7ee1e4 (1).JPG बेन्च वर चढून खिडकीतून बाहेर बघायचे आणि कुणी दुसरा कुत्रा किंवा त्यांच्या पसंतीचा नसलेला प्राणी/ माणूस दिसला की भुंकायचे हेच काम. Happy
d0079390-e26c-4273-a6cf-120ceee3d40c.JPG

Supercute ..!
त्यांच्या पसंतीचा नसलेला प्राणी/ माणूस दिसला की भुंकायचे हेच काम >>> Lol

कसले भारी पोझ देतायत दोघही...माउई मोठा दादा आणी ऑस्कर छोटा भाऊ वाटतोय.
बाकी भुभुज पण आता बाळ न राहता तरुणाई की गलियोमे फिरायला लागले की...मजेदार किस्से आहेत सगळ्याचे.

काल ऑश्कुला भेटायचा योग आला. खूप गुणी आणि शांत, क्युट बाळ आहे. अजिबात मस्ती नाही. त्याच्यापुढे माऊई एकदम व्रात्य बिग ब्रदर दिसत होता. पण दोघेही एकत्र मजा करत होते.

काल १ डिसेंबर हॅरीचा बर्थडे होता. घरच्या घरी साजरा केला . आणि कॉलनीतल्या भुभूजना ट्रिट दिल्या.
त्या सगळ्यांन घरी बोलावले असते तर मजला दणाणून गेला असता Lol

हे फोटोज

FullSizeRender.jpeg

आणि कॉलनीतल्या भुभूजना ट्रिट दिल्या.
त्या सगळ्यांन घरी बोलावले असते तर >>>> भारी कल्पना आहे ही!

हॅरी कडे पाहून तो एक "आपण बरे नि आपले बरे" टाइप भुभू वाटतो.

Pages