Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47
https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नव्यानेच जॉईन केलेली आमची
मी नव्यानेच जॉईन केलेली आमची "डीवायपीयू स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, नेरुळ, नवी मुंबई," ८ व ९ डिसेंबर २०२३ दरम्यान दोन दिवसीय 11th Annual National Conference of Consortium Against Rabies (CARCON) 2023 आयोजित करणार आहे. ह्या कॉन्फरेन्समध्ये देशभरातील नामांकित व्यक्ते (प्रामुख्याने रेबीजवर कार्यरत संशोधक, वैज्ञानिक व शासनाचे प्रतिनिधी), प्राणीसंघटना, व प्राणिपालक ह्यांना सहभागी करून घेण्याचा मानस आहे. तर इच्छूक मायबोलीकर (सशुल्क) नावनोंदणी करून कॉन्फरेन्समध्ये सहभागी होऊ शकतात.
ओडीनचा किस्सा Lol
ओडीनचा किस्सा Lol
कोकोनट तर्फे सर्वांना हॅपी
कोकोनट तर्फे सर्वांना हॅपी हॅलोविन.
त्याला हॅरी पॉटरचं कॉश्चुम घेतलं होतं, त्यात चष्मा माणसांचा आला. पकडून फोटो काढला.
असं दिसायला हवं होतं...
असं दिसलं.
कोकोनटची एकंदरीत खूपच मदत होते.
चष्म्यातून बघणारा कोकोनट
चष्म्यातून बघणारा कोकोनट म्हणजे "का मला बिचार्याला हे कपडे घालताय... " असा दिसतोय
क्यूट कोकोनट
क्यूट कोकोनट
कोकोनट
कोकोनट
आणखी काय काय केलं कोकोनट ने हॅलोविनला ?
हो.. कपडे घालुन हॅपी दिसणारे
हो.. कपडे घालुन हॅपी दिसणारे डॉग्स फक्त जाहिरातीत असतात lol
कोकोनट पण बिना कपड्याचाच हॅन्सम दिसतोय
जाहिरातीत कसे आनंदी करतात
जाहिरातीत कसे आनंदी करतात डॉग्स ना?की फोटोशॉप असतं?
कोकोनट पण बिना कपड्याचाच
कोकोनट पण बिना कपड्याचाच हॅन्सम दिसतोय >>> आणि खुश पण
हो.. कपडे घालुन हॅपी दिसणारे
हो.. कपडे घालुन हॅपी दिसणारे डॉग्स फक्त जाहिरातीत असतात +१
आमच्याला तर कपडे कधीच घालत नाही
मोठा झालाय कोकोनट.. साधा आणि
मोठा झालाय कोकोनट.. साधा आणि सज्जन मुलगा वाटतो तो..
मम्मा,
मम्मा,
मोठा झालोय मी आता, हे असे काहीतरी करून फोटो काढून सोशल मीडियावर?
नको ना प्लिज!!!!!
इति कोकोनट बोलतोय डोळ्यातून असे वाटले.
कोकोनट चे एक्सप्रेशन्स फार
कोकोनट चे एक्सप्रेशन्स फार बोलके आहेत!
माउई ला कॉस्च्यूम आणलाच नाही या वेळी. गेल्या वेळचाच शर्ट घालून बसला होता ट्रिक ऑर ट्रीटर्स चे "स्वागत" करायला
"फ्रेन्डली डॉग" हाच याचा कॉस्च्यूम ! कारण आल्या गेल्यावर भुंकण्यातच मजा येत होती आम्हाला. आणि तरीही मुले येण्याची वाट पहात खिडकीत बसून होता. म्हणजे यायला तर हवे पण आले तर भुंकणार !!
यायला तर हवे पण आले तर
यायला तर हवे पण आले तर भुंकणार >>> हे फारच भारी आहे पण अगदी गोड दिसतोय माव्या.
म्हणजे यायला तर हवे पण आले तर
म्हणजे यायला तर हवे पण आले तर भुंकणार !! Happy
>>>>
कसला दंबीस आणि क्युट आहे माव्या
माऊई काय गोड दिसतोय.
माऊई काय गोड दिसतोय. आमच्याकडे पण भरपूर भुंकाभुंकी झाली मग शेजारच्या पूडलला खेळायला बोलवले, पुष्कळ खेळून झाल्यावर तो गेला घरी आणि कोकोनटचीही हवा गेली. इन्स्टावर टाकलेत व्हिडिओ.
https://www.instagram.com/reel/CzFkuXyN4RoyjRaBXxlg3IHlpkdP_MHZUUytOw0/?...
अनु, जाहिरातीतलं जग वेगळं असतं. तशी मुलंही नसतात आणि भुभूही.
झकासराव
@सर्वांना,
हो, नागडंच ठेवेन त्याला...
हे कपडे तरी कपडे कुठेत, एक टाय आणि केप आहे. हा लेकीचा प्रयोग होता जो फसला. आता परत करू ते कॉश्चुम. बाकी सणावाराला एक काळा टाय घालतो त्याला.
कसला गोड आहे माउई
कसला गोड आहे माउई
म्हणजे यायला तर हवे पण आले तर
म्हणजे यायला तर हवे पण आले तर भुंकणार. >>> खरंखुरं हॅलोवीन स्पीरीट! आधी भुंकून ट्रीक आणि मग कँडीची ट्रीट. पुढ्यात एम न एम चं तसराळं असताना त्याला तोंड नाही लावलं म्हणजे खरंच गुणी बाळ आहे.
आपणही एक भूभू-बाबा व्हावं असं वाटायला लावणारा धागा आहे हा.
फक्त मी ओड्याची स्विमींगबरोबर सायकल चालवायची वाट बघतोय. कधीतरी बाबाचे गुण घेईलच
सायकल प्रकरण त्याच्यासोबत
सायकल प्रकरण त्याच्यासोबत दोनदा जोरदार पडून घेतल्यावर थांबवलं आहे
त्याला लिश बांधला तर तो ओढून सायकलस्वाराला पाडतो आणि मोकळा सोडला तर चाकात येतो पुढच्या
त्याचे बरेच किस्से लिहायचे राहिलेत
लिहितो एकेक करून
लिश बांधला तर तो ओढून
लिश बांधला तर तो ओढून सायकलस्वाराला पाडतो आणि मोकळा सोडला तर चाकात >> अरे देवा! अतिउत्साही बाळ.
माऊई फारच गोड दिसतोय. ते चेक
माऊई फारच गोड दिसतोय. ते चेक चे शर्ट घालणारे प्रेमळ बाबा लोक असतात तसा.
नारळ बाळ 'मला काय, तुम्ही मला कपडे घाला नाहीतर पानं घाला नाहीतर तसा ठेवा.सब मोह माया है' म्हणतोय असं वाटतं
सिंबा हिरो चे फोटो कुठेयत?
कोको\माऊ…. गोड.
कोको\माऊ…. गोड.
माउई गोड दिसतोय एकदम,कोकोनट
माउई गोड दिसतोय एकदम,कोकोनट म्हणत असेल " मी बॉर्न हॅन्डसमच आहे ग, वरतुन वकपडे वैगरे कशाला?"
आम्ही बारक्याच्या मित्राबरोबर ट्रिक ऑर ट्रिटिन्ग केल तर त्याची पेट पुडल 'लुना' आली होती/ट्रिक ऑर ट्रिटिन्ग करताना एका घरातुन एक च्युवावा आला भुन्कत ...एवढस बारक कुत्र ते पण हिची असली घाबरगुन्डी उडाली ...तिच्या पेट पॅरेन्टसची आणी आमची हसुन पुरेवाट.
आली गोंडूली बाळं आली.
आली गोंडूली बाळं आली.
नारळा तुला रे कशाला चष्मा... डोळे बारीक झाले बघ त्याचे
माऊई ला तर उचलूनच घ्यावंसं वाटतंय पटकन... अशक्य क्यूट!
ओड्याचा टॉलरन्स लेव्हल खूप
ओड्याचा टॉलरन्स लेव्हल खूप जास्त आहे
काल आमच्या इथे प्रचंड म्हणजे प्रचंड च फटाके वाजवले गेले
इतका की आम्हालाही त्रास व्हायला लागला धूर आणि आवाजाने
मला वाटलं होतं ओड्या घाबरेल त्याला शांत ठेवावं लागेल उलट तो निवांत होता, शेजारचे फुलझाड उडवत होते तर ते त्याला भारी काहीतरी इंटरेस्टिंग वाटत होतं, डोकावून डोकावून बघत होता आणि संपलं की परत लावा म्हणून भुंकत होता
फिरायला गेलो तेव्हाही मोकळ्या मैदानात काही मुलं फटाके उडवत होते, मीच दचकत होतो आवाज आला एकदम तर पण ओड्या नेहमीप्रमाणे निवांत बागडत होता
मला एक क्षण शंका आली की याला ऐकू येणं कमी झालं का काय म्हणून हलक्या आवाजात हाक मारली तर लगेच आला
म्हणलं मग हा इम्युन आहे फटाक्यांना
फक्त मैदानात कुणी अर्धवट पेटलेले फटाके किंवा फुलबज्या टाकलेल्या नाहीत ना इतकंच बघावं लागलं मला
(No subject)
हॅरी ओड्याइतका इम्युन नाहीये
हॅरी ओड्याइतका इम्युन नाहीये . दिवाळीचे फटाके जसे वाजत आहेत तसे घाबरून घरात एका कोपऱ्यात तोंड पाडून शांत राहतोय. खाली जायचा पण हट्ट करत नाहीये .
अमा, स्वीटी विथ पैठणी मस्त.
अमा, स्वीटी विथ पैठणी मस्त.
सर्व भुभूज आणि त्यांच्या
सर्व भुभूज आणि त्यांच्या पेरेन्ट्स ना दिवाळीच्या शुभेच्छा!!
माउई तसा घाबरत नाही फटाक्यांना पण काल पूजा झाल्यावर आम्ही फटाके लावत असताना दोन मिनिट बाहेर आला. काय करतोय ते पाहून मग सरळ आत निघून गेला आणि खिडकीत सोफ्याच्या पाठीवर चढून बसला आम्हाला बघत. चेहर्यावर शिष्ट भाव जसं काही "चालू द्या तुमचं पोरापोरांचं , मी जातो घरात" असं मोठ्या माणासांनी म्हणवी तसे वाटले.
स्वीटी क्यूट दिसते आहे पैठणी मधे
ओडीन फटाक्यांना घाबरत नाही हे
ओडीन फटाक्यांना घाबरत नाही हे किती बरं आहे, इथे फटाक्यांना घाबरून Fourth of July च्या दिवशी भरपूर कुत्री हरवतात.
"चालू द्या तुमचं पोरापोरांचं , मी जातो घरात"
>>> मोठा आजोबाच आहे.
स्वीटी, मस्त.
Pages