भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती २

Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा

==================================================================================

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं प्राजक्ता, एवढाही नाही बरं आज्ञाधारक. Lol

अमा, तुम्हाला फार आवडेल कोकोनट. नुसता देखणाच नव्हे तर तेजस्वी आहे एकदम. कायम स्वच्छ, लुसलुशीत व लखलखीत दिसतो. त्याच्यासोबतचे आमचे फोटो पार येड्यागबाळ्यासारखे दिसतात. Lol

@ अस्मिता --- पेटस्मार्ट ट्रैनिंग चांगले आहे बेसिकसाठी आणि इकॉनॉमिकलपण.

सिम्बाला पण दिले होते पण त्याने काही ती टोपी घातली नाहि Happy

बाकी फोटो खुपच छान आला आहे

अमा, तुम्हाला फार आवडेल कोकोनट.>> नक्कीच मला तो पहिल्या पपी फोटो पासुनच लैच आव्डतो. त्याचे इन्स्टा अकाउंट आहे का ओडी सारखे? तिथे पण फॉलो करुच. अय लव्ह द स्पेशीज, द कॅट स्पेशीज अ‍ॅनि मालि या अँड प्लांट युनिवर्स. पे ट स्मार्ट रेडिट व इन्स्ता वर फार फेमस आहे.

आमच्या इथे बाहेर्च्या कुत्र्यांना खायला घालायला आजिबात बंदी केली आहे भटके कुत्रे दिसले की सिक्युरि टी काठी घेउन मागे पळत जातात. ह्या पार्श्वभूमीवर सोसायटीचे नियम पाळायचे म्हणून आम्ही वॉकची वेळ बदलली दोन्ही. व खाणे बरोबर नेणेच बंद केले. सर्व कुत्र्या मांजरांना देवाच्या हवाली केले.

हे सर्व एकदम भारी आहेत. आज त्यातली एक अचानक भेटली हिला फक्त त्या हळदीच्या काठी सरख्या ट्रीट आवडतात ती एक दिली की खूष.
दुसरीला स्किन इन्फे क्षन होते ते मी सॅफ्रोल लावुन बरे करत आणले होते. आज ती भेटली व तिची उत्तम फर स्किन पाहुन परम संतोष झाला
उपरवाला इज टेकिन्ग केअर्स. आय अ‍ॅम ओन्ली हंबल शेपर्ड.

दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आम ची व्हेट लेडी आता घरासमोरील बिझन्स पार्क मध्ये ग्राउंड फ्लोअरलाच आलेली आहे. म्हणजे आता नखे कापायचे काम इव्हिनि ग वॉक मध्ये होउन जाईल. आमच्या म्हा तारीला आटोतून व्हेट कडे जायची फार भिती वाटते. व लांब लांब नखे आटोत एकदा अडकून रक्त येउन इमर्जन्ची पण झालेली आहे. द गुड लॉर्ड वर्कस इन मिस्टिरीअस वेज.

. Sit, stay , come on वगैरे कमांड्स शिकवतात. पेटस्मार्ट नावाचं दुकान आहे, त्यांचा कोर्स होता.>>> कसलं भारी Happy
गुड बॉय ला congratulations

इथं भारतात पुण्यात असं काही आहे का बघायला हवं
ओड्या फक्त ट्रीट दिसल्या तरच सगळं इमानेइतबारे ऐकतो नैतर काही ऐकूच आलं नाही असं दाखवतो
त्यामुळे पाहुण्यांसाठी कलागुण दाखवताना कायम हातात ट्रीट ठेवाव्यालागतात

हो ना, अगदी मलाही तेच वाटलं की याला कळलं असावं

आज एकतर स्विमिंग करून झाल्यावर खुशीत आला होता आणि त्यात इतक्या उड्या मारल्या की घरी येताच ते सगळं ओकला

त्यात मागे एकदा कधीतरी मी त्याला ओरडलो होतो (वैतागून खरे तर, त्यांनतर कधीच नाही) पण त्यांनतर तो ओकी झाली की एकदम गिल्टी होऊन टेबलाखाली जाऊन बसतो, मग त्याला जवळ घेऊन थोपटून समजावं लागतं की ठिके ओकी ओकी होते, तुला कुणी ओरडत नाहीये, रिलॅक्स हो

आणि आज मग तेच सुरू होतं, खायला हवं तर होतं पण खाऊ का नको असं विचार करत होता, म्हणलं तूच कॉल घे
मग खरोखरच लगेच नई खाल्लं, बसून राहिला, नंतर कधीतरी बाउल साफ केला Happy

खायला हवं तर होतं पण खाऊ का नको असं विचार करत होता, म्हणलं तूच कॉल घे
मग खरोखरच लगेच नई खाल्लं, बसून राहिला, >>> हो व्हिडियो बघितला , बिच्चारा कन्फ्युज झाला होता.

ओह काय झालं ओड्याला बर नाही का?>>> काही विशेष नाही, काल खूप पोहला, आल्यावर भरपूर उड्या मारल्या
त्यामुळे दचमळल असणारे, घरी येऊन ओकला

एकदम ओके आहे Happy

मी पण व्हिडीओ बघितला . ऑफिसातून बघितल्याने ऐकता आले नाही. चेहरा फारच कोमेजुन गेला बाळाचा. आता तब्येत ठी क आहे ते वाचून बरे वाटले.

दादु आलेला शाळेतून, पण गेटपाशी त्याला मित्र भेटला आणि बोलत थांबला होता, त्यामुळे ओड्याला कळत नव्हतं हा आलाय पण घरी का अजून येत नाही, त्यामुळे खिडकीतून डोकावून बघणे सुरु होतं

किती गोड आहे हा, असं करायला लागलाय कोकोनट सुद्धा. खिडकीतून बघत भुंकतो पटकन या घरात म्हणून.

सिम्बा, केवढा दिसतो. सुसाट पळतानाचा व्हिडिओ बघून आले. कमेंट केली आहे. Happy

धन्यवाद सर्वांना कोकोनट कडून. कुठल्यातरी महत्त्वाच्या विचारात असतानाचा फोटो
IMG-20230817-WA0000.jpg

अमा,
एक यूट्यूब चॅनल आहे पण आम्हाला नियमितपणे अपलोड करणं होत नाही.
https://youtube.com/@Coconut_Trails
https://youtube.com/shorts/dKFNBnQ1DA8?feature=share

@ अस्मिता. ---> तुमचा कोको एकदम नट आहे चेहऱ्यावर एक्स्प्रेशन देण्याबाबत Lol , त्याचे सगळेच फोटो एकदम छान असतात

सिम्बाच हुदडणे भारी, बॉल तोण्डात पकडून पळापळी चालू आहे, ओडीन केवढा मोठा दिसायला लागलाय...कोकोनटच लाडाच नाव प्रिन्स ठेवायला हव इतका राजबिन्डा आहे.

Pages