Submitted by आशुचँप on 14 August, 2022 - 16:47

https://www.maayboli.com/node/77227
पहिल्या धाग्याने २००० चा टप्पा गाठल्याने नवा धागा
==================================================================================
आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही काही फुड आयटम्स डॉग साठी
काही काही फुड आयटम्स डॉग साठी चान्गले नाहीत. अवाकाडो, द्राक्षं , चॉकलेट वैगरे. ते सगळं बघत बसण्यापेक्श्या आम्ही त्याला काही देतच नाही , फक्त डॉग फुड..
@ अस्मिता - Flea tick ची पण
@ अस्मिता - Flea tick ची पण लिंक देता का ? - ते मी आमच्या वेट कडून रिफील घेतो स्वस्त पडत म्हणून ...
बाकी रॉक्सय चा फोटो एकदमच छान आलाय
कुठल्याही GSD चे पिल्लू फोटो पहिले कि असं वाटतं कि सिम्बा पण परत लहान व्हावा
रॉक्सी फार गोड दिसतेय.
रॉक्सी फार गोड दिसतेय.
खूप दिवसांनी आले इकडे तर मस्त
खूप दिवसांनी आले इकडे तर मस्त मस्त पोस्टी वाचायला मिळाल्या
खाण्याबाबतीत आमचा एलोन पण प्रचंड चुझी आहे . त्याला रोज चिकन भात आणि संध्याकाळी दूध भात देतो . त्यातच भाज्या घातल्या तर खात नाही ...
डॉग फूड खात नाही ... रॉयल कॅनिन देत होते ..पण आताशा त्याला तोंड पण लावत नाही
तर माझा एक प्रश्न आहे दूध देऊ कि नको
आमच्या VET ने दूध द्या असे सांगितले होते.
GSD साठी चांगला VET पण सुचवा ...पुण्यामध्ये
इथे तरी व्हेट दूध नका देऊ असे
इथे तरी व्हेट दूध नका देऊ असे सांगतात. डॉग्ज ना दूध पचत नाही , गॅसेस चा त्रास होऊ शकतो वगैरे. माउई ला होतोही तसा त्रास हे लक्षात आले आहे.
पण भारतात बर्याच घरात दूध पोळी दूध भाकरी देतात, इंग्लंडात पण लोकांना डॉग्ज ना दूध देताना पाहिले आहे ( हे सोमि वर) त्यामुळे नक्की खरे काय कुणास ठाऊक!
मीही हेच वाचलेलं
मीही हेच वाचलेलं
पण मला एका व्हेट ने द्या बिनधास्तपणे दूध पोळी म्हणून सांगितलेलं
मग मी व्हेट च चेंज केला
बरेचसे भुभु लॅक्टोस एनटोलरन्ट असतात
ओड्याला दूध देत नाही पण तरी कधी कधी खोलीचे गॅस चेंबर करून टाकतो
आणि वर स्वतःच उठून बघतो कुणी आवाज केला
म्हणतो पहिले बाहेर जा तर बावळट चेहरा करून बघत बसतो
ऑश्कु प्रचंड पिकि इटर आहे,
ऑश्कु प्रचंड पिकि इटर आहे, व्हेहिटेबल्स अज्जिबात आवडत नाहीत, मिट लव्हर आहे एकदम.. भोपळा मात्रं आवडतो.
ह्युमन फुड्स पैकी गरम पोळी, भाकरी, डोसा,दाणे, चिप्स, फिश फ्राय, इन जनरल कडाम कुडुम/कुरकुर वाजणार सगळं फुड आवडतं पण आम्ही शक्यतो ह्युमन फुड नाही देत , बार्बेक्यु चिकन खाताना तर समोरून हालतच नाही, मग आळणी व्हर्जन करते त्याच्यासाठी
मी पण मै सारखाच फॉर्म्युला वापरते डेली फुडसाठी, व्हेजिटेबल्स कमी टाकते पण.
म्ह्णूनच मी confused आहे
म्ह्णूनच मी confused आहे
दूध देऊ कि नको
अजूनपर्यंत त्रास असा काही नाही ... पण नंतर नको व्हायला
@मृणाल १ --> शक्यतोवर दूध
@मृणाल १ --> शक्यतोवर दूध देऊ नका, अगदीच दिलेतर गाईचे द्या आणि तेही एकदम कमी प्रमाणात. त्यांच्या लिव्हरवर परिणाम होतो जास्त दुधाने
धन्यवाद हरितात्या.
धन्यवाद हरितात्या.
लानाला/एलॉनला व्हायचा असता त्रास तर लगेच झाला असता, लॅक्टोज ईनटॉलरन्स हे लॉन्ग टर्म नसतं सहसा.
मृणाल, मी दही देते आणि ते पचते व आवडते तर इतकं की पहिल्या वाढदिवसाला दह्याचा डबा देऊ की काय ह्या विचारात आहे.
दही केव्हांही बेस्ट च
दही केव्हांही बेस्ट च
आजारपण असतानाही
भूक मंदावली असेल तर
आणि आता उन्हाळ्यात दह्यासारखं काही नाही
दही आणि ताक मुबलक द्या, काहीही अपाय नाही
आता जरा कठोर आई होऊन आवडेल ते
आता जरा कठोर आई होऊन आवडेल ते न देता गरजेचे जे आहे तेच खायला लावेन .... जमावावे लागेल
काल ताक भात खाल्ला बाई आमच्या
काल ताक भात खाल्ला बाई आमच्या बाळाने
(No subject)
कसला ऐटबाज फोटो आलाय! हँडसम
कसला ऐटबाज फोटो आलाय! हँडसम बॉय!
तो खरंतर माझ्या डोळ्यात डोळे
तो खरंतर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघतोय, त्याला खेळायचे आहे आणी मी कॅालवर अडकलोय
सिम्बा भारीच एकदम...
सिम्बा भारीच एकदम...
मॉडेल दिसतोय...
मॉडेल दिसतोय...
वाव
वाव
देखणे पिल्लू
देखणे पिल्लू
रॉयल
रॉयल
ऐटबाज
ऐटबाज
ओड्या आणि त्याचा बडी रिओची
ओड्या आणि त्याचा बडी रिओची इतकी मस्ती सुरू असते ना
त्यातही रिओ जास्तच, लैच वावरे आहे पोरगं आणि त्यापायी अडचणीत सापडतो
आम्ही जिथं फिरायला जातो तिथं एकदा दोघांना दोन भुभिची पिल्ले दिसली, छोटीशी होती झाडीत लपून क्याव क्याव करत होती
दोघेही हे काय नवीन म्हणून बघायला घुसले तर त्यांची आई कुठंतरी खायला म्हणून गेलेली ती तिरासारखी धावत आली
तिला बघताच ओड्याने इंट्युशन किंवा अनुभव म्हणा
लगेच माघार घेतली आणि सुरक्षितपणे आमच्या इथे येऊन उभा राहिला
पण रिओ ला काही अंदाज नव्हता तो पिल्लांकडे जातच राहिला
आम्ही इकडून ओरडून त्याला माघारी बोलवत होतो तरीही ऐकेनेआ
मग व्हायचं तेच झालं, आईने थेट अटॅक केला त्यावर मग आला माघारी पळून
त्याला तपासलं तर धुम्बीपाशी थोडं लागलेलं, थोडक्यात चावा बसला होता तिचा
लगेच त्याला घरी नेऊन धुतला आणि त्याचा बाबा व्हेट कडे घेऊन गेला
नशिबाने अगदी वरवर होता ओरखडा त्यामुळे काही करावं लागलं नाही
पण हा असा उद्योग करत असतोच
आम्ही आता दोघे दोन बाजूना दोन उभे राहतो आणि एकमेकांकडे काठी/बॉल टाकतो
मधल्या मध्ये हे दोघे फुल स्पीडने पळत असतात
त्यातही ओड्या ची मज्जा, त्याला माहिती असतं की काठी तिकडे टाकली की मी उचलणार आणि परत लांब टाकणार, आशा वेळी तो फार कष्ट घेत नाही, डुलत डुलत पळतो
जाऊ दे मला नकोच होती असं दाखवत चक्क दुसरीकडे निघून जातो
पण जर काठी अलीकडे पडली आणि त्याला वाटलं की आपण उचलून पळून जाऊ शकतो तर मग अचानक सुसाट गियर टाकून पळत येतो आणि इतकं पळत आल्यावरही मी जर लवकर पोचलो काठीपाशी आणि चपळाईने उचलली तर साफ निराशा दिसते चेहऱ्यावर
रिओ जास्तच उचापती दिसतोय,
रिओ जास्तच उचापती दिसतोय, मागे मेलेला साप आणला होता ना ?
रिओ जास्तच उचापती दिसतोय,
रिओ जास्तच उचापती दिसतोय, मागे मेलेला साप आणला होता ना >>>.
हो, त्याचा बाबा हैराण झालाय पार
आहे गोंडस पण महाव्रात्य, मला म्हणे ओडीन कधी शांत बनला??
आता ओड्या पण मस्ती करायचा पण अशी कधीच नाही. पण त्याना म्हणलं अजन एक सहा महिने तरी लागतील
रिओ अगदीच निरागस बाळ दिसतोय.
रिओ अगदीच निरागस बाळ दिसतोय.
सिंबा लैच हँडसम
रॉक्सी खूप क्यूट!
@आशुचँप --> ओड्याचा पोहतांनाच
@आशुचँप --> ओड्याचा पोहतांनाच विडिओ पहिला, कसला मस्त पोहोतोय
कुठे आहे हि जागा ?
आमच्या घराजवळच आहे
आमच्या घराजवळच आहे
एक दहा मिनिटांवर कॅनाल आहे तिकडे सोडतो आम्ही पोहायला
सध्या फारच अडचण होत आहे, उन्हाळ्यात म्हणून मोठ्या प्रमाणात लहान पोरं, लोकं येत आहेत पोहायला, फुल्ल टॅंक वर जशी गर्दी असते तशी असते
त्यात मग ओड्या ला सोडतनाही
तो काही करणार नाही याची खात्री पण लोकांशी भांडत बसायचा पेशनस नाही
पण सध्या एक नवी फॅन मिळाली आहे ओड्याला
कॅनाल वर पोहत असताना एक मुलीने पाहिले, ती इतकी खुश झाली, म्हणे कस शिकवलं वगैरे
मग तिला म्हणलं ओड्या चे इंस्टा वर अकाऊंट आहे त्याला फॉलो करा
तिने लगेच केलं आणि नंतर पहिलं तर ती मॉडेल वगैरे होती, हजारो फॉलोअर्स आहेत तिला
आणि तिनेही ओड्या चा पोहतांचा व्हिडीओ शेअर केलाय
म्हणलं मज्जाय
अरे वा, म्हणजे ओड्यापण
अरे वा, म्हणजे ओड्यापण सेलिब्रिटी झाला म्हणजे. छान.
इतकी शांतता ??? सगळे कुठे
इतकी शांतता ??? सगळे कुठे गेलेत सध्या ?
Pages