एकतर्फी

Submitted by खुशालराव on 4 August, 2022 - 07:30

राकेश अंधारात बसून ऋतुजा साठी रडत होता. त्याला स्वत:चा राग येत होता, मध्येच ऋतुजा ने त्याचा एकदातरी विचार करायला हवा होता असं त्याला वाटत होतं... रात्रीचे 3 3:15 झाले राकेश रडत रडतच झोपी गेला.
************

"किती सुंदर आहेना ही पोरगी?" अजय कॉलेज च्या गेटमधून आत येणाऱ्या मुलीकडे पाहत राकेशला म्हणाला... राकेश त्याच मुलीकडे मंत्रमुग्ध झाल्यासारखा बघत होता, अजयच्या बोलण्याकडे त्यांचे लक्ष सुध्दा नव्हते... "ऋतुजा" नकळतपणे राकेश च्या तोंडातून तीचे नाव आले.... "साल्या तुम्ही ओळखता एकमेकांना?" अजय राकेश ला विचारत होता पण राकेशमात्र स्वतःच्याच तंद्रीत हरवलेला पाहुन अजयने राकेश ला टपली मारून ताळ्यावर आणले... "अरे मी विचारले तुम्ही ओळखता का एकमेकांना? " अजय म्हणाला. "अं... हो... चल" राकेश पळतच ऋतुजा जवळ पोहोचला - त्याच्या मागे मागे अजयही आला...
"अरे.., राकेश ना रे तू?" ऋतुजाने राकेशला पळत येताना पाहून काहीसे आठवतच प्रश्नार्थक मुद्रेने राकेशला म्हणाली... "हो मग.... मीच... मित्र आहे म्हणायच लक्षात..! मला वाटलं विसरली असेल मला... " राकेश. "असे कस होईल जाड्या.. बराच हैंडसम झालास की!" ऋतुजा.
"अजय ही माझी बालमैत्रीन, ऋतू... ऋतुजा.. " राकेश. "हाय. मी अजय" अजय ऋतुजाशी हातमिळवत म्हणाला...
राकेश आणि ऋतू दोघांची घरे जवळ जवळ होती त्यात दोघेही पाचवी ते दहावी एकाच शाळेत एकाच इयत्तेत पण वेगवेगळ्या तुकडीत शिकत होते, रोज एकमेकांसोबत शाळेत जाणे, सोबत डब्बा खाणे असा दिनक्रम असल्याने दोघांची मैत्री अगदी घट्ट झालेली नंतर ऋतुजाच्या वडीलांची बदली झाली आणि त्यांचा परीवार नाशिकमध्ये शिफ्ट झाला.

"खरे सांगू राकेश! ज्यावेळी आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट झालो मला खुप आठवण आली... आय मीन आपल्या शाळेची पुण्यात घालवलेला वेळ, मित्र मैत्रिणी सगळ्यांचीच खुप आठवण यायची... कित्येक दिवस मला तिकडच्या शाळेत करमलच नाही.... पण हळूहळू सवय होत गेली, आठवणीवर काळाचा पडदा आला आणि मी तिथे रमले...." चहाच्या टपरीवर चहा पिताना ऋतुजा अजय आणि राकेश सोबत बोलत होती..
" हो का...? बरं... आणि माझि? माझि आठवण नाही आली कधी?" राकेश.
" नाही रे तुझी आठवण का येईल मला? ना आपण लहानपणी कधी सोबत खेळलो, ना सोबत कधी वेळ घालवला, ना कधी सोबत अभ्यास केला मग कशाला उगाच आठवण येईल मला तुझी..." ऋतुजा खट्याळपणे हसत हसत म्हणाली.
"अच्छा... म्हह... बरोबर आहे.. कशाला आठवण येणार. तुला माहीती आहे मला तर अशी कोणी मैत्रीण आहे माझी हेसुद्धा लक्षात नव्हते..." अस म्हणत राकेशने अजयला टाळी दिली...
" बाय द वे आपल्या अजय साहेबांनासुध्दा चित्रकलेची आवड आहे बरं.. तुला सांगतो अयज, काय भन्नाट चित्र काढते ऋतू.... "राकेश.
" हो... का..!अरे वाह छानच आहे की... मला तसं इतक चांगल चित्र काढायला जमत नाही पण आवड आहे तर प्रयत्न करत राहतो." अजय.
"बरं चल मी निघतो राकेश... माझि ती माझी वाट पाहत असेल.. " अजय.
"ह्म्म... ह्म्म्म.. गर्लफ्रेंड आहे वाटत.. अरे मग बोलव की तिला इकडेच त्या निमित्ताने माझी ओळख तरी होईल.. "ऋतुजा.
" अग ए येडे त्याच्या बाईक बद्दल बोलतोय तो.. "राकेश ऋतुजावर हसत म्हणाला...
********************************
"ए विन्या हा आपला राकेश म्हणतोय, मला वाटतं मला प्रेम झालय.. " अजय विनोदला राकेशची उडवत सांगत होता... गेल्या दोन अडीच वर्षात अजय, राकेश, विनोद आणि ऋतू अगदी जिव्हाळ्याचे मित्र झाले होते.. विनोद फ्रेशर्स पार्टी नंतर तिघांच्या टोळीत सामिल झाला होता...
"मी सिरीयस आहे यार.... खरच कोणीतरी आहे माझ्या मनात जिच्यावर मी खुप प्रेम करतो पण... " राकेश बोलता बोलता थांबला.
"मला माहीत आहे रे.... आणि मला हे सुद्धा माहित आहे की ती मुलगी कोण आहे... " अजय गंभीरतेने राकेशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला...
"काय रे ए मला सोडून तुम्ही आपल्या अड्ड्यावर काय करताय? आणि साहेबांना काय झाल? ए राख्या काय झाल रे तोंड का पाडलयस?" ऋतुजाने विचारले.
"अग काही नाही मी म्हणल की नेक्स्ट विक मध्ये सलग दोन दिवस सुट्टी आहे तर कुठेतरी नाईट आऊटला जाऊ तर..." विनोदने विषय बदलुन सांगितला...
" माकडा तुला माहित नाही का त्याचा बारका भाऊ एकटा असतो त्यामुळे तो ईच्छा असुन... डोन्ट वरी बाॅस अपन तेरे लिए वन डे ट्रीप निकालेंगे... अब तो खुश..?" ऋतुजाने मुड हलका करण्यासाठी टपोरी स्टाईल मध्ये समजूत काढली...
"जर तु पाणी पुरी चारत असली आज तर खुश.. " ऋतुजाकडे बघुन राकेश नाटकी हसत बोलला...

"बस क्या दोस्तों को खुश देखने के लिए इतना तो करेगी ही हमारी ऋतु... आंडू पांडु समझा क्या!" अजय राकेश आणि विनोद ला टाळी देत सुरात सूर मिसळत म्हणाला.
"ए चला मी निघतै मला क्लासला जायला उशीर होईल नाहीतर" ऋतुजा पाणीपुरी वाल्याला पे करून काढता पाय घेत म्हणाली..

"एक विचारू राकेश म्हणजे तु अजयला बोलला असेल पण मला वाटत तीच आहे? हो ना? " विनोद ऋतुजा गेल्यावर परत मुळ मुद्यावर येत म्हणाला...
"मी अजयला सुध्दा बोललो नाहीये यावर आणि तसही मला वाटतय की तुमचा गैरसमज हैतोय" राकेश म्हणाला..
"काय गैरसमज होतोय आमचा? घाबरू नकोस रे प्रपोज करून टाक तु ऋतू ला.. तसही तिला तु आवडतोस.. नकार नाही देणार ती तुला" अजय म्हणाला.
" हा भाई मला असच वाटत.... त्यातल्या त्यात आपल शेवटच वर्ष आहे... मला पण असच वाटत की तु प्रपोज कर तिला... तस तर मी वेळ मारून नेण्यासाठी बोललो ट्रिप बद्द्ल पण अस वाटतय खरच वन डे ट्रिप प्लान करावी लागणार... एक काम करू सोमवारची प्लान करू." विनोदने अजयच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
"पण मी ऋतू बद्दल बोलत नाहीये. " राकेश च्या या वाक्यावर दोघेही त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते.
"ऋतुजावर प्रेम नाहि करत तु? मग कोणावर प्रेम करतोस तु? " अजयने विचारले.
"अनुजा... मी अनुजावर प्रेम करतो, ऋतू ची लहान बहीण... ऋतू माझि फक्त मैत्रीण आहे... "
****
अस का केल ऋतूने.. का सोडून गेली ती आम्हाला सगळ्यांना... राकेश अंधारात बसून ऋतुजा साठी रडत होता. त्याला स्वत:चा राग येत होता, मध्येच ऋतुजा ने त्याचा एकदातरी विचार करायला हवा होता असं त्याला वाटत होतं... दुरून पाहीलेल ऋतुजाचे पार्थिव त्याच्या डोळ्या समोरून जात नव्हते.... रात्रीचे 3 3:15 झाले होते, डोक्यावर आलेला ताण, मनाला आलेला क्षीण आणि आयुष्यभराची खंत घेऊन राकेश रडत रडतच झोपी गेला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेच ना!
सुरूवात आणि शेवट काही लिंक लागेना.