एकदा

Submitted by अनन्त्_यात्री on 18 July, 2022 - 09:41

अक्षयाचे पात्र भरुनी
वाहते जेथे सदा
सांडवा तिथला कसा ते
सांगशिल का एकदा?

अद्भुताचा ढग निळा
ओथंबतो जेथे सदा
बरसतो तेथे कसा ते
सांगशिल का एकदा?

शांततेची पैंजणे
झंकारती जेथे सदा
कोणता स्वर वर्ज्य तेथे
सांगशिल का एकदा?

Group content visibility: 
Use group defaults

छानच....