वेगळा भाग - १७

Submitted by निशा राकेश on 12 July, 2022 - 06:52

भाग – १७

थोड्याच वेळात मागून त्याच्या खांद्यावर एक हात पडला, त्याने मागे वळून पाहिलं तर बायडाचा लहान भाऊ दत्तू उभा होता त्याच्या हातात काहीतरी होत,

“बाब्या , तू जा इथन ,कुणी पायल तर मारतील तुला , त्यांनी अक्काला बी लय मारलं,”

“काय , तिला मारलं,” बाबू दुखावलेल्या स्वरात म्हणाला.

“जा इथून , आन हे घे “ दत्तू ने त्याच्या हातात कहीतरी दिल.

“काय आहे ह्यात”

“लग्नाचं लाडू , “

बाबू ने पुरचुंडी घेतली आणि त्यानंतर त्याने मागे वळून देखील पाहिलं नाही,

घरी आल्यावर तब्बल आठ दिवस तो घरातच बसून होता , ना शाळेत गेला ना कामावर , अशोक घरी येऊन भेटून गेला , त्याने बाबुला समजवायचा खूप प्रयन्त केला पण बाबूच्या कानात जणू काही शिरतच न्हवत, तो फक्त एकटक तंद्री लाऊन हरवल्या सारखा तासन-तास नुसता एकाच जागी बसून राही, आईला त्याची काळजी वाटू लागली,पण तिच्या हातात काहीच न्हवत, बाबूची अशी अवस्था बघून ती हताश होऊन जाई.

एक दिवस असाच बाबू खाटेवर झोपून वर आढ्या कडे एकटक पाहत स्वतःच्या विचारात हरवला असताना , झेंडु आली आणि तिने टीव्ही सुरु केला आणि बाहेर कोणीतरी तिला आवाज दिला म्हणून तो टीव्ही तसाच चालू ठेऊन ती बाहेर निघून गेली.

टीव्ही वर कुण्या एका दाढी वाल्या आणि अंगभर सफेद कफनी घातलेल्या कोण्या बाबांचं प्रवचन चालू होत , ते बाबा कोणीतरी अध्यात्मिक गुरु होते ते आपल्या शांत आणि सुंदर आवाजात भक्तांना संदेश देत होते , ते म्हणत होते “दर्द प्रगट करने का प्रयोजन क्या है, दर्द झुटा हो या सच्चा इससे क्या फरक पडता है , घाव को दिखाते फिरने कि जरुरत क्या है, बाजार मे घाव खोलने का कारन क्या है, घाव दिखाने का रस तो एक हि है के घाव के मध्यम से सहानुभूती मांग रहे हो , कोई तुम्हारे दुख मे सहभागी हो , दुख मे कोई साथ भी हो गया तो वो कितनी देर साथ रहेगा,तुम जरा इसे ऐसा सोचो कोई तुम्हारे पास आके अपणे दुख कि कथा कहता है सच्ची हि सही, तब तुम्हे क्या बडी प्रसन्नता होती है , उब पैदा होती है , इनसे कब छुटकारा हो , दुख मे किसको रस है , क्या प्रयोजन है के दुख को कहे , सुख को कहो , सुख को बाटो , अगर तुम सुख को बाटोगे तो तुम्हारा दुख तिरोहित हो जायेगा , क्युकी सुख बाटके तुम्हे जो प्रेम मिलेगा , वो दुख बाटके मिली सहानुभूती से अन्य है , अब तुम्हे लगेगा के अपना दुख भी ना कहे , ये तो दमन है , नही दमन के लिये मैने नही कहा , दरवाजा बंद मत करो, दुख को अपने से हि कहो , दिल खोल के कहो, रोओ, चिल्लाव , मगर ये जरा भी आकांशा ना हो के कोई आपको देखें , दुख को क्या दिखाना, “
हे सर्व ऐकत को कधी उठून बसला हे त्याच त्यालाच कळल नाही , तो गुंग होऊन गेला त्या प्रवचनात आणि अचानक टीव्ही बंद झाला , त्याने पाहिलं तर वीज गेली होती , तो तसाच पायात चप्पला सरकवून घाईघाईत घरा बाहेर पडला , वाटेत त्याला आई भेटली , ती त्याला काही विचारणार पण त्याने तिला अजिबात पाहिलं नाही तो तसाच ताडताड पावलं टाकत तिच्या समोरून निघून गेला , धावत पळत धापा टाकत त्याने टेकडी गाठली, त्याची आणि बायडा ची भेटण्याची जागा तिकडे जाऊनच तो थांबला, तिथे बसला, तिकडच्या मातीवरून त्याने हलकेच हात फिरवला , ती माती हाताच्या मुठीत पकडून ती हवेत उडवू लागला , त्याला रडायचं होत खूप मोठ्याने , ओरडायच होत , पण त्याला तसं करता येईना , त्याने खूप प्रयन्त केला तरी त्याला ते जमेना , शेवटी न राहवून त्याने स्वतःच्या जोरदार मुस्काटात मारली, एक नाही दोन नाही तीन चार असे तो स्वतःला मारून घेऊ लागला , स्वतःच्या हाताच्या माराने त्याला रडायला आल आणि तो खूप वेळ तिथेच बसून रडत राहिला , स्वतःला मोकळ करीत राहिला.

तब्बल दोन तास स्वतःच्या दु:खाशी एकट्याने सामना करून झाल्यावर तो उठला , घरी जाण्याआधी त्याला पुन्हा त्या जागेकडे वळून पहावस वाटत न्हवत तरीही त्याने पाहिलं , आणि त्या जागेला उद्देशून तो म्हणाला, “ नाही सहन झाल कि पुन्हा येईल पण इथून पुढे माझ सर्व दुख आता तुलाच सांगेन बाकी कुणाला नाही” अस म्हणून तो झपझप पावलं टाकत तो टेकडी उतार झाला.

घरी आई दारात त्याची वाट बघत बसली होती , त्याला बघून ती उठून उभी राहिली , बाबूने तिला पाहिलं दोघांची नजरानजर झाली
“अशी काय बसलीये दारात , मला भूक लागलीये काय बनवलंस जेवायला” अस म्हणून तो आत निघून गेला.

आठ दिवसांनी बाबूला माणसात बघून आई च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आकाशात बघत देवाला हात जोडले.

त्याने दुसर्या दिवसा पासून कामाला जायला सुरुवात केली, शाळेत देखील तो जाऊ लागला , त्याला आठवण तर खूप यायची , आठवण आली तरी तो त्या दुखी: होत न्हवता ,उलट आणखीन आणखीन तिला आठवत तो त्याच ते दुख: बोथट करू पहायचा , जास्तच जर वाटल तर टेकडी वर जाऊन नुसता बसून राहायचा,

त्याने त्या नंतर टीव्ही वर त्या बाबाजींचा कार्यक्रम यायची खूप वेळा वाट पहिली पण त्या नंतर खूप दिवस त्याला हे बाबाजी टीव्ही वर पुन्हा कधीच दिसले नाहीत, पण त्यांनी त्या दिवशी सांगितल्या प्रवचनाचा त्याच्या मनावर जादूमय रित्या परिणाम झाला होता , तो सगळ्यान समोर आनंदी राहू लागला होता, हसू लागला होता , स्वतःच दुख: स्वतः जवळ ठेऊन इतरांना हसवू लागला होता , त्याला ते सवयी ने चांगल जमू लागल होत.

आणि अशातच एक दिवस घरी आल्यावर पाहतो तर काय आई अवेळी झोपली होती आणि झेंडु स्वयंपाकाची तिच्या परीने खटपट करीत होती, तो आई जवळ जाऊन बसला , त्याने तिच्या कपाळाला हात लावला तीला ताप आला होता , त्याने तिला कसबस उठवून डॉक्टरांकडे दाखवून आणल, आई तापाच्या ग्लानीतच होती दोन दिवस तो कामावर न जाता तिची काळजी घेत तिच्याच शेजारी बसून होता .

आईला थोड बर वाटू लागल्यावर तुला अचानक ताप कशाने आला हे विचारल्यावर आईने त्याला तिच्या काखेत एक छोटी चण्याच्या दाण्या इतकी गाठ आल्याच सांगितलं, ती गाठ जवळपास दोन महिने तशीच होती आणि त्या दिवशी ती अचानक खूप दुखू लागल्यामुळे तिला बहुतेक ताप आला असावा अस ती म्हणाली , बाबुला आईच्या गाठीच नाही म्हटलं तरी थोड टेन्शन आल , तो आईला दुसर्याच दिवशी एका सरकारी इस्पितळात घेऊन गेला , डॉक्टरांनी त्या गाठेची प्राथमिक तपासणी करून त्याला दोन दिवसांनी ऑपरेशन साठी यायला सांगितलं , आईच ऑपरेशन झाल डॉक्टरांनी ती गाठ आणि त्याच्या आसपासचा काही भाग काढून तपासणी साठी पाठवला , आईला त्या दिवशी भुली मुळे कदाचित इतक काही दुखण जाणवलं नाही पण दुसर्या दिवसा पासून तिला तिच्या डाव्या काखेत असहनीय वेदना होऊ लागल्या , डॉक्टरांनी तिला वेदनाशामक औषध दिली पण काही तरीही तिला विशेष काही फरक पडत न्हवता , आणि चार दिवसांच्या आत त्याच जागी त्या गाठीला छेडल्यामुळे कि काय तो भाग पुन्हा आंब्या इतका सुजला .

बाबू आईची तशी अवस्था पाहून घाबरला , त्याने त्या दिवशी खूप वेळ थांबून डॉक्टरांची भेट घेतली , डॉक्टरांनी त्याला त्याच्या केबिन मध्ये बसवलं , त्याला धीर दिला आणि खूप संयमाने त्याला आईच्या प्रकृतीची माहिती दद्यायला सुरुवात केली .

“बाबू , तुझे वडील कुठे आहेत, मला त्याच्याशी बोलाव लागेल” डॉक्टरांनी बाबुला विचारल.

“दादा , तर आता कामाला गेलेत , तुम्ही मला सांगू शकता , आईला नेमक काय झालय”

“सांगतो , हे बघ बाबू आईला जे काही झालय, त्याच्यासाठी उपचार आहेत , आणि आपण ते आईला व्यवस्थित देणार आहोत, फक्त तुला आणि तुझ्या घरच्यांना सर्व गोष्टी धीरान घ्याव्या लागतील”

“ धीरा न , आईला काय झालंय , मला काय स्पष्ट सांगा” बाबू ने डॉक्टरांना अधिरतेने विचारले.

“बाबू गेल्यावेळी आपण जे ऑपरेशन केल , त्याचा काही भाग काढून आपण तपासणी साठी दिला होता , त्याचे रिपोर्ट आलेत” अस म्हणून

डॉक्टरांनी बाबुला एक इंन्व्लोप दाखवलं.

बाबू शांत पणे त्याच पुढच बोलन ऐकत राहिला.

“बाबू , ती गाठ कॅन्सर ची आहे”

“----------------------------“ बाबू सुन्न झाला होता.

“मी समजू शकतो तुझ्या वयाच्या मानाने हि गोष्ट तुला पचवण किती कठीण आहे ते , पण जे आहे ते स्वीकार आणि तुझी आई ह्यातून नक्की बाहेर पडेल”

बाबू त्यांच्याशी एकही शब्द न बोलता तिथून बाहेर पडला

त्याने एकवार आई कडे जाऊन पाहिलं , आईला झोपेची गोळी दिल्यामुळे तिला झोप लागली होती , आणि दादा तिच्या शेजारी तिच्याकडे एकटक पाहत बसून होते.

बाबू ने ते रिपोर्ट त्यांच्या जवळ दिले , आणि तो इस्पितळातून बाहेर पडून टेकडीच्या दिशेने जाऊ लागला .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users