आता मर्चंट नेव्ही कडे जाऊ नका

Submitted by नितीनचंद्र on 8 June, 2022 - 11:17

मल्टी युनिव्हर्सिटी नावाचा एक उपक्रम ह्र्दयेश देशपांडे ( चु.भु,दे.घे ) यांनी पुण्यात काही वर्षांपुर्वी इंजिनीयरींग शिकलेल्या व नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या साठी सुरु केला होता. मी गाईड या पदासाठी अर्ज केला होता. अश्यांचे एक हाय टी डॉ. विजय भटकर सरांच्या समवेत देशपांडे सरांनी आयोजीत केले होते.

समस्या एकच होती की इंजिनीयरींग शिकलेल्या तरुणांना कोअर इंजिनीयरींग नको आहे. त्यांना आय टी कंपनीत जॉब हवा आहे. कारण आय टी कंपनीत हात काळे करायला नको आणि पगार जास्त आहे.

डॉ विजय भटकर सर म्हणाले इंजिनीयरींग शिकलेले तरुण आय टी साठी पटकन ट्रेन होतात हे मी ओळखले पण आता उत्तम व हुशार इंजिनीयर्स कोर इंजिनीयरींग मधे जात नाहीत. कोर इंजिनीयरीगला चांगले इंजिनीयर्स देण्यासाठी मल्टी युनीव्हर्सीटी इंटर्नशीप उपलब्ध करुन देईल.

ही गोष्ट होती साधारणपणे २००३ सालची. पुढे या उपक्रमाचे काय झाले माहित नाही.

यानंतर पास झालेल्या इंजिनीयर्स नी पुढे मर्चंट नेव्हीत जायला सुरवात केली. पण आता तिथेही नोकर्या १०० आणि इच्छुक ४०० अशी परिस्थिती आहे.

बर एकदा ट्रेनी म्हणून जहाजावर गेलात की पुढे फोर्थ इंजिनीयर ही परिक्षा द्यावी लागते. कधी कधी अनेकांना ही परिक्षा पास झाल्यानंतर बोटीवर जायला मिळत नाही कारण जागा १०० उपल्ब्ध इंजिनीयर्स २०० अशी परिस्थीती आहे.

हे सर्व सांगताना, काय करा हा सल्ला मी देऊ शकत नाही.

ते आपले आपण शोधावे लागेल. अनेकांना अनेक वर्ष झगडावे लागेल.

पण सध्या तरी मर्चंट नेव्ही हा पर्याय अजिबात चांगला नाही असे माझे मत आहे.

Group content visibility: 
Use group defaults

१) हे डॉ विजय भटकर कशाचे डॉक/डॉक्टरेट आहेत?
२) मर्चंट नेव्हीत मोठी मालवाहू /तेलवाहू जहाजे आल्याने नोकऱ्या कमी झाल्या असतील.

माझ्या नात्यात एकाने ४ वर्षे १२ नन्तर हा कोर्से केला पण शेवटी जहाजावर नोकरी न मिलाल्याने आय टी मध्ये काहितरी कोर्से करून पोटापाण्याची सोय लावली