बुद्धीबळाचा पितळी बोर्ड

Submitted by गारंबीचा शारूक on 24 May, 2022 - 06:52

आम्ही तसे मुंबईचे मूळ रहिवासी हे माहिती होतं.
पण एका गोष्टीमुळे आम्ही राजे पण आहोत असे वाटू लागले. जी गोष्ट संकोचामुळे मायबोलीपासून इतकी वर्षे लपवली आहे ती आज उघड करणार आहे.

कारण तसंच आहे. कॅरमच्या आठवणी असतात तशाच अजून एका घरात खेळायच्या खेळाच्या असतात.
ते म्हणजे बुद्धीबळ . आमच्याकडे अनुक्रमे एक हस्तीदंती आणि एक लाकडी बुद्धीबळ होते. ते शिसवी लाकडाचे होते. बारीक कलाकुसर आणि वेलबुट्ट्याची नक्षी होती त्याच्यावर. लाकडातले कोरीवकाम खूप सुंदर दिसायचे. लाकडी बुद्धीबळ सेट आमच्या घरात अनेक पिढ्यांपासून होता. पण नेमका कधीपासूनचा आहे याची माहिती नाही. आमच्याकडे एक ऐतिहासिक प्रोफेसर आले होते ते म्हणाले कि, हा किमानदोन ते तीन हजार वर्षांपूर्वीचा असेल. पाहीजे तर विकून देतो, कोट्याधीश व्हाल. पण आम्हाला पैशाची हाव नाही. हा वारसा जपणे जास्त महत्वाचे होते.
पण काही दिवसांनी तो सेट चोरीला गेला. खूप हळहळ वाटली. कुणीतरी म्हणाले कि चोरबाजारात सापडेल तुमचा सेट. पण आता गेला म्हटल्यावर भांडून काय उपयोग ?

मग हस्तीदंती सेट आईने लपवूनच ठेवला. हो, कारण तो असायचा दहा हजार वर्षापूर्वीचा ! कुणी पाहिला कि बाहेर बातमी पसरणार आणि मग चोरीला जायला किती वेळ लागतो ? मग आम्ही एक साधा प्लॅस्टीकचा सेट आणला.

त्याच्या मागेच सापशिडी, ल्युडो होतं. घडी घातली कि नवा व्यापार पण होता. या सर्व खेळासाठी सर्व आठ बाजूवर ठिपके असणारे दोन चौकोनी ठोकळे होते. सहा ठिपके पडले की पुन्हा चाल. मला नेहमी पुढची चाल मिळायची. काही वेळा दोन्ही ठोकळे वापरावे लागायचे. त्या वेळी मला बारा घरं मिळायची.

बुद्धीबळाची खास आठवण म्हणजे आम्ही बुद्धीबळ खेळताना हे ठोकळे फेकायचो आणि जेव्हढे ठिपके येतील तेव्हढी घरं प्यादे चालवायचे. मला नेहमी बारा घरं मिळायची. मी वजीर चालवायचो आणि थेट शत्रूच्या पक्षात दाखल व्हायचो. बारा आडवे, उभे, तिरके मोजून हव्या त्या ठिकाणी गेलं की आजूबाजूची सर्व प्यादी मी वजीर किंचित उचलून मारून टाकायचो. एकाच चालीत अर्धा सफाया होत असे. काही दिवसातच मी पंचक्रोशीत बुद्धीबळाचा अनभिज्ञ सम्राट म्हणून फेमस झालो.

नववीत गेल्यानंतर सोंगट्यांनी युद्ध खेळायचा कंटाळा येऊ लागला. म्हणून आम्ही दोन चाळीच्या मधे सिमेंट क्राँक्रीटच्या रस्त्यावर बुद्धीबळाची
मोठी ६४ काळी पांढरी घरं रंगवून घेतली होती. आम्ही चाळीतली मुलं मग कागदाचे ड्रेसेस बनवून कुणी सैनिक, कुणी वजीर, कुणी उंट, कुणी घोडा, कुणी हत्ती तर कुणी राणी बनायचे. राणीला घ्यायला समोरचा वजीर खूप प्रयत्न करायचा. मग आम्ही तिला किल्ल्यात नेऊन कव्हर द्यायचो. किल्ला म्हणजे फूटबॉलच्या खेळात भिंत बनवतात तसे सगळे सैनिक समोर लाठ्या काठ्या घेऊन उभे रहायचे.

राणीवरून घनघोर युद्ध व्हायचं. लाकडाच्या तलवारी पण बनवल्या होत्या. त्यांचा आवाज एव्हढा इंटरेस्टींग यायचा नाही. म्हणून त्याला अ‍ॅल्युइमिनियमची फॉईल लावली होती. युद्धादरम्यान खाली पाडून छाताडावर बसून ठोसे मारायचा कार्यक्रम पण रंगायचा. खरं खरं बुद्धीबळ खेळल्याचा अनुभव यायचा.

इथेही आम्ही लाकडाचे दोन ठोकळे बनवले होते. घोड्याला कितीही दान मिळालं तरी त्याने अडीच घरं चालायचं एव्हढाच नियम होता. घोडा झालेला मग समोरच्या पार्टीला चकवताना आधी समोरून अडीच जाणार आहे अशी बतावणी करायचा पण प्रत्यक्षात साईडने अडीच घरं चालून मागून जाऊन लाथ घालत असे. त्यामुळं घोड्याची चांगलीच दशहत बसली. ऊंट तिरका चालताना दोन तीन रेषांची एक तिरकी रेष करून लढाई करायचा. हत्ती नावासारखाच होता. बारावीतला एक ९० किलो वजनाचा मुलगा होता. तो प्याद्याला बाजूला करून सरळ रेषेत सुटायचा ते थेट समोरच्या हत्तीला घायाळ करून मग आडव्या रेषेतले सगळे सैन्य मारायचा. म्हणजे शेजारचा घोडा, उंट, राणी, वजीर, उंट , घोडा आणि हत्ती. मग प्यादे हत्तीला धरायला गेले की सगळ्यांच्या अंगावर बसायचा आणि आम्ही जिंकायचो. मज्जा यायची.

दहावीला आजोळी गेलो होतो. तिथे कुस्त्यांचा फड असायचा. बुद्धीबळाच्या अनुभवावर मी कुस्ती खेळायचो. कुणाला खरं वाटणार नाही पण मी मी म्हणणारे पैलवान या पठ्ठ्याने बुद्धीबळाच्या अनुभवावर मातीत लोळवले आहेत. कधी अडीच घरांची चाल, कधी तिरकी चाल तर कधी वजीराची चाल केल्याने पैलवान गोंधळून जायचा. त्याच्या या स्थितीचा फायदा घेऊन मी त्याच्या डोळ्यात माती टाकायची आणि मग त्याचे पाय धरून गरागरा फिरवून मैदानाबाहेर फेकून द्यायचो.

लवकरच मला आजोळी गेल्यावर कुस्त्याच्या फडांचे निमंत्रण येऊ लागले. मोठ्या आदराने मला न्यायला गाडी यायची. हे सर्व फड मी गाजवले आणि माझा नावलौकीक झाला.

मग पुन्हा शाळा संपल्यावर बुद्धीबळाच्या स्पर्धा भरल्या. या वेळी मात्र आमच्या पद्धतीने खेळायला मनाई केली होती.
मग यातही प्राविण्य मिळवत मी शाळेत दुसरा आलो.

त्यानंतर मुलींच्या शाळेजवळ असलेल्या मैदानावच्या हॉकी स्पर्धेत भाग घेतला. आमच्या टीमने फर्स्ट हाफला ४५ गोल मारले तर दुसर्‍या हाफला ५२ गोल मारले होते. समोरच्यांचा एकही गोल झाला नाही. यात माझे एकट्याचे ९० गोल होते !! आम्ही ती टूर्नामेंट जिंकलो हे वेगळं सांगायची गरज आहे का ? त्यानंतर आमच्या घरावरून मुलींच्या चकरा वाढल्या होत्या. आई मला बाहेर जाऊ द्यायची नाही.

टूर्नामेन्ट जिंकलो म्हणून मला गोल्डन बूट मिळाला होता. २४ कॅरटच्या सोन्याचा दहा तोळ्याचा एक बूट असे दोन बूट होते. त्यातला एक इमर्जनसी मुळे विकावा लागला. खूप दु:ख झाले. पण त्याचे काही तरी तीस चाळीस लाख रूपये त्या वेळी मिळाले होते. आज कोट्यावधी मधे असतील. त्यातले काही पैसे मला मिळाले.

मी मग पॅराजंपिंगला नाव घातले. हा खेळ पण मला आवडला. माझे जंपिंग इतकं अचूक असायचं की मी आधी सांगून खाली उतरताना त्याच स्पॉटला उतरायचो. याचा पुढे फायदा झाला. एकदा पुण्यावरून विमानाने ठाण्याला येत असताना विचार केला कि सांताक्रूझवरून यायचे तीन तास वाचवायचे तर काहीतरी भन्नाट केले पाहीजे. मग मी पायलटला सांगून दारातून उडी घेतली ती नेमकी आमच्या बिल्डींगच्या छपरावरच. पॅराशूट पण नेमकेच उघडले गेले. ते पहायला खूप गर्दी झाली.

आता मात्र मुलांना आणि मोठ्यांनाही पुन्हा बुद्धीबळाची आठवण येऊ लागली.
मी मग माळ्यावर चढून हस्तीदंती सेट शोधू लागलो. माळ्याचे छत उतरते आणि लाकडी होते. त्याला वासा होता. त्या वाशाला एक खोलगट कप्पा होता. मी त्यात हात घातला तर काय !

एक जुना पितळी सेट बाहेर आला. हा खूपच दुर्मिळ होता.
तो पहायला लांबून लांबून लोक यायचे. यातले प्यादे ग्रीक सैनिकासारखे होते. त्याच्यावर पॉलीश चढवलं की सेटला झळाळी यायची. एका जाणकाराने सांगितलं की असा सेट घरात असणे हे ते घराणे राजघराणे असल्याचा पुरावा आहे.

असूही शकतं. या बेटाचे आम्ही राजेच होतो.
समुद्रमार्गे येणारे लोक आम्हाला अशा भेटवस्तू देऊनच येणार. आमच्या परवानगीनेच ते भारतात येऊ शकत असणार.
हा सेट सापडल्यानंतर मात्र मी गंभीर झालो. राजघराण्याला साजेसं वागू लागलो. आता बुद्धीबळ खेळताना हाच सेट वापरू लागलो. घरात एक शो केस बनवून घेतली त्यात हा सेट आणि सोन्याचा बूट ठेवून दिला.

आजी आजोबांना सुद्धा माझ्यात एक सम्राट दिसू लागला होता. उगीच नाही हा सेट सापडला. कधी कधी स्वप्नात आजोबांचे खापरपणजोबांचे खापरपणजोबा याच बुद्धीबळाच्या सहाय्याने सम्राट अकबराला जेरीस आणत आहेत असे दिसायचे. मी त्या माझ्या पूर्वजाचा चेहरा पहायचा प्रयत्न केला तर ... सेम टू सेम माझ्यासारखा चेहरा !

या सर्व लक्षणांनी मी जुना कुणी राजाच असल्याची खात्री पटली. पण संकोच आणि विनयाने कधी कुणाला सांगितले नाही. जे मित्र सोबत होते ते आता राजा म्हणून दुरावतील ही भीती वाटायची. हळू हळू माझ्या राजेपणाची किर्ती सगळीकडे पसरली. त्यामुळेच व्हीजेटीआयला मी घोड्यावर जायचो.

व्हिजेटीआयमधे मी भरकटलो. इतर खेळात वेळ गेला. मग बुद्धीबळाच्या या सेटकडे दुर्लक्ष झाले.

या संधीचा फायदा चोर घेणार नाहीत तर ते चोर कसले ? हा दुर्मिळ सेटही चोरीला गेला. मला तार माझे साम्राज्यच गेल्यासारखे वाटले. हे दु:ख आयुष्यभर राहीले असते. पण मग मला मायबोली सापडली. इथे माझ्या निरनिराळ्या आवतारात मी दु:ख विसरण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी झाला.
मायबोलीवर येण्या आधी मी बॉडीबिल्डींग स्पर्धेत भाग घेतला होता. मिटर युनिव्हर्सच्या बाजूलाच मिस्टर गॅलेक्सी स्पर्द्।आ भरली होती. त्याचे विजेतेपद मला मिळाले. पोटाला पडलेले सोळा पॅक पाहून आधीच इतर स्पर्धकांनी हार मानली होती. मी फक्त उपचार पार पाडला.

नंतर मात्र रशियातल्या इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेऊन मी ग्रॅण्डमास्टर झालो. येताना इंग्लंडला सहज उतरलो. तिथे ऑल इंडीया बॅडमिंटन स्पर्धा जिंकलो. पण त्यात माझे लक्ष नव्हते.
माझा पितळी बुद्धीबळाचा सेट कुठल्या संग्रहालयात आहे का हे मी बघत होतो. बुकिंगहॅम पॅलेसमधे जाऊन शोधायचा विचार होता. पण आत सोडलं नाही.

त्यानंतरही मी टेनिस स्पर्धाही जिंकली. पण बुद्धीबळाच्या आठवणी आजही फेफरे धरतात. त्या सेटची आठवण जात नाही. तर ज्या मायबोलीने मला ते विसरायला मदत केली त्यांच्या सोबत त्याचा एक फोटो शेअर करावाच लागेल.
51jc9bwz-TL._SY450_.jpg
धन्यवाद
आपला नम्र,
गाशा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१६.३२ चा लेख दोन तासात वाचून १६.५४ ला प्रतिसाद दिलात, टाईम मशीन मध्ये जाऊन वाचता की काय केशवकूल>>>माहित होते ही कॉमेंट येणार म्हणून.
अहो इथे सगळीच अतिशयोक्ति चालू आहे. त्यात माझे पण काही योगदान!
पुन्हा एकदा, ऋन्मेऽऽष सर . तुमचा हा लेख वाचून मजा आली.

अरेरे
ताजमहालासमोर कचऱ्याचा ढीग.

माहित होते ही कॉमेंट येणार म्हणून. >> हो ते कळले. तुमच्या मनासारखे व्हावे म्हणूनच दिलेली Happy

बाई दवे,
हा ऋन्मेष नाहीये.
हा ऋन्मेष आहे
https://www.maayboli.com/node/81663

ओडिशामधे तर एक वड्याची ( तांदुळाचे वडे) टपरी पन्नास वर्षांपेक्षा जुनी आहे. मालकाचा मुलगा आता चालवतो. दोघे बरोबर साडेपाचला येतात. चटणी वाढण्यासाठीचा करवंटीचा तुकडा वापरतो तोच आहे इतके वर्षं.

चपखल विडंबन. तंतोतंत संदर्भ. निखळ मनोरंजन. १ विनंती लेखाच्या सुरवातीलाच २५ वर्षे जुना कॅरम स्ट्राईकर ! ची लिंक द्यावी. ते वाचले तरच हे वाचण्यात मज्जा आहे.

फक्त या आठवणींचे विडंबन करू नका ही विनंती, हे फार जिव्हाळ्याचे आहे Happy >>>>
पूर्णतः फसलेला लेख, विडंबनाचा केविलवाणा प्रयत्न >>>>
एक करूणामय वेदना जाणवते. वाईट वाटले. सरांच्या भावनांवर आघात झाला आहे बहुतेक. दोघे वेगवेगळे असतील तर.
गाशा यांच्या खुलाशाच्या प्रतिक्षेत.

ऋ सर का व्यथित होतील ? सहमत आहे.
आपने ऋ सर को जाना ही नही. त्यांनी माझी फिरकी घेतली आहे. त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. ते माझे प्रेरणास्थान आहेत. मी तर अनेक वेळा सांगितले आहे कि आम्ही वेगवेगळे आहोत, तरीही लोक विश्वास ठेवत नाहीत. ऋ सर पण त्यावर खुलासा करत नव्हते. एकदाचा त्यांनीच खुलासा केल्याने मला एक स्वतंत्र अस्तित्व मिळाले याचा आनंद आहे.
आमच्या जीवनात समांतर घटना घडत असल्यानेच सर माझे प्रेरणास्थान, माझे देव आहेत. त्यांच्या आधी मी कधीही माझे अनुभव लिहीत नाही. सरांचा कॅरमचा धागा आल्यानंतरच बुद्धीबळाचा माझा अनुभव मी लिहीला. गुरूच्या आधी लिहीणे मला बरोबर वाटले नाही. Happy
वेदना बिदना काय नाय. ऋ सर तुम्हा सर्वांना पुरून उरतील .

तरी पण फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो, कालच्या माशाच्या कालवणाची शपथ घेऊन सांगा ऋ सर, तुम्ही माझ्यावर नाराज झाला का ? झाला असाल तर आज माझ्या कडे बनणार्‍या बोंबलाच्या चटणीची शपथ घेऊन सांगतो, मी या आयडीने पुन्हा काहीही लिहीणार नाही.

ऋ सर का व्यथित होतील ? सहमत आहे.
>>>

+७८६
शाहरूख विडंबन/मिमिक्रीवर चिडलेला एक सीन आठवला Happy
खालील लिंक वर ५३ मिनिटापासून पुढे बघा
https://www.youtube.com/watch?v=Af6QFNbBCRY

शाखाने आयुष्यभर दिलीपसाहेबांचे विडंबन करून पो भरले ट.

शाखाने आयुष्यभर दिलीपसाहेबांचे विडंबन करून पो भरले ट.
>>>>>

मायनस ७८६

असे करून सुपर्रस्टार होता येत नाही.
असे करून कोणी किंग ऑफ बॉलीवूड बनू शकत नाही.

ड्युप्लिकेट त्याच्या ड्युप्लिकेट बद्दल तक्रार करू शकत नाही हा मुद्दा आहे.
दुकान तर अमेरिकन मालाचंही चालतं, उल्हासनगर आणि चायनीज बनावट मालाचंही चालतं.
पण या विषयावर पुन्हा एका ड्युप्लिकेटशी पुन्हा तीच बेचव चर्चा करण्यात पॉईण्ट नाही. Happy

मुळात शाहरूख हा दिलीपकुमारचे विडंबन वा त्यांना कॉपी करतो हेच गृहीतक चुकले आहे Happy

आज तो किंग खान, बॉलीवूडचा देव म्हणून ओळखला जातो.
दिलीपकुमार हे सुद्धा युसुफ खान होते. पण त्यांना आपले नाव बदलून कुमार करावे लागले.
आज शाहरूख खानने खान हेच एक ब्रांड नेम बनवले आहे Happy

Pages