मखमली तलत महमूद--(वीक एंड लिखाण)

Submitted by निशिकांत on 21 May, 2022 - 09:53

गेल्या आठवड्यात दोन महत्वाच्या घटना होत्या. पहिला मातृदिन आणि दुसरा म्हणजे महान गायक तलत महमूद याची पुण्यतिथी. वीक एंड लिखाणात गेल्या रविवारी आईवर लिहिले, आज तलत महमूद बद्दल लिहिण्याचा विचार घोळत होता. आज तोच प्रयत्न करणार आहे.
माझी पत्नी, सौ. जयश्रीला गाणे गायचा आणि ऐकायचा खूप छंद आहे. कोणत्याही प्रकारचे संगीत असो, ती रमून जाते. तिने आम्ही औरंगाबादला असताना शस्त्रीय संगिताचे शिक्षण पण घेतले आहे. तेथे तिचे जे गुरू होते त्यांचा सात आठ वर्षापूर्वी फोन खणाणला. मला त्यांनी आवर्जून सांगितले की सध्या  सिनेसंगिताची एक लिंक ऑनलाईन उपलब्ध आहे. ही लिंक फक्त आठ दिवसासाठी उपलब्ध आहे. ही लिंक तलत महमूद यांच्या लंडनस्थित मुलाने लोड केली आहे. बघा आवडल्यास डाउनलोड करा. आम्हा दोघंचीही संगितातली ऋची पाहून त्यांनी आम्हास ही माहिती कळवली.
आम्ही लगेच सर्व गाणी संगणकावर डाऊन लोड केली. जवळ जवळ पंचावन्न मिनिटांची रेकॉर्डिंग झाली. रात्री आम्ही दोघांनी सर्व गाणी एका ब्लँक सीडी वर रेकॉर्डिंग करून ऐकली. आम्ही दोघेही मंत्रमुग्धच झालो ऐकून. ही सारी गाणी तलतने लंडनस्थित आल्बर्ट हॉल येथे लाईव्ह कार्यक्रमात गायली होती. सर्व फिल्मी, गैरफिल्मी गाण्यांचा समावेश यात आहे. या रेकॉर्डिंंगचे वैशिष्ट्य असे की सर्व गाण्यांना साथ फक्त संवादिनी आणि तबला यांची आहे. या कार्यक्रमाची  अ‍ॅनकरिंग स्वतः तलतने केली आहे. वाद्य विरहीत गाणी ऐकताना समाधी लागून जाते. हॉल भारतीय आणि पाकिस्तानी प्रेक्षकांनी खच्चून भरला होता आणि प्रेक्षकांनी जी दाद दिली ती अप्रतीम अशीच होती.
अशा या अष्टपैलू गायकाचा जन्म चोवीस फेब्रुवारी, १९२४ रोजी लखनौ यथे झाला. देशातील बरेच कलाकार आपल्या कलेचा गुलदस्ता घेऊन मुंबई किंवा कलकत्ता येथे जातात. तलत हे असेच मुंबईला आले.
कांही वर्षापूर्वी माझ्या दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली.  तेंव्हा ८/१० दिवस डोळ्यावर काळा चष्मा लाऊन, खिडक्याचे पडदे बंद करून अंधारात वेळ घालवत होतो . अंधाराशी हितगूज करता करता काळोखाशी दोस्ती पण झाली ! वेळ घालवण्यासाठी सर्व प्रकारचे संगीत- गाणी, गजला, रागदारी, भावगिते आणि विशेष करून तलतची गाणी वगैरे वगैरे ऐकले. आणि हे करताना मला बरेच कांही गवसले. अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणि गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला.
तलतचे कोणते गाणे सर्वात जास्त आवडते हे सांगणे महाकठीण काम आहे. किती म्हणून सांगावी? तलतचा मोरपिसासारखा मुलायम आवाज, आणि त्याची जीव ओतून गायची आदा ऐकणार्‍यांना एका हिमालयाच्या उंचीवर घेऊन जातात. स्वर्ग सुखाचा अनुभव घेवून श्रोते चिंब होतात.
मी या लेखात शब्दांच्या महत्वाबद्दल बोललोय. मी आज जे गाणे आपणासमोर पेश करणार आहे त्याचे बोल खाली देत आहे. बघा शब्दांची जादू आणि नजाकत. शब्दांची नजाकत या गाण्यात प्रकर्षाने जाणवते. विशेषतः " गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं" या ओळीत आपल्या कवितेतील आत्मविश्वास शायराने ठासून भरलेला दिसतो जो यथार्थ पण आहे. या गाण्याचे गायक, गीतकार, संगीतकार, पदद्यावरील नट सारेच काळाच्या पडद्याआड गेले आणि सहजच मनात उसासे देत शब्द उमटतात "जमानेने देखे जवां कैसे कैसे" किंवा "जाने कहां गये ओ लोग" आणि आगतिक भावना डोळ्यातून घळघळतात.

.जलते है जिनके लिए
 तेरी आँखों के दिये
ढूंड लाया हूं वही
 गीत मै तेरे लिए

दर्द बन के जो मेरे दिल मे रहा ढल ना सका
जादू बन के तेरी आँखों मे रुका, चल ना सका
  आज लाया हूं वही
गीत मै तेरे लिए

दिलमे रख लेना इसे हाथोंसे ये छूटे न कहीं
गीत नाजुक है मेरा शीशे से भी टूटे ना कहीं
गुनगुनाउंगा येही गीत मै तेरे लिये

जब तक ना ये तेरे रस के भरे होटों से मिले
यूं ही आवारा फिरेगा यह तेरी जुल्फों के तले
गाये जाउंगा येही गीत मै तेरे लिए

असा हा होनहार महागायक  नऊ मे, २०९८ रोजी आपणाला सोडून पैगंबरवासी झाला आणि एका युगाचा अंत झाला.

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
नोट-- ज्या समूहावर गाण्याची लिंक पोस्ट केलेली आणि हा विषय चालत नाही, अ‍ॅड्मिनने हा लेख डिलीट करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>अंधारात मला खरेच नवा प्रकाश मिळाला.आपण गाणी ऐकताना नॉर्मली धुन; चाल आणि संगीत ऐकतो आणि गाण्याच्या शब्दांकडे फार कमी लक्ष असते. मी सर्व गाणी शब्दांकडे (काव्याकडे) लक्ष देवून ऐकली आणि मला वेगळाच अनुभव मिळाला.
करेक्ट! डोळे मिटून गाणे फार वेगळे कळून येते. खूप फरक पडतो.
---------
लेख आवडला. तलत मेहमूद माझ्या फार फार आवडीच्या गायकांपैकी एक आहे.

छान लिहिलंय. तलतला मिळालेली गाणीच अशी आहेत की शब्दांकडेही लक्ष जातंच.

याद रह जाती है और वक्त गुजर जाता है
फूल खिलता भी है और खिलके बिखर जाता है
सब चले जाते हैं कब दर्द- ए- जिगर जाता है
दाग जो तूने दिलाया दिलसे मिटाया न गया

तलत मुंबईला अभिनेता व्हायला आला होता. काही चित्रपटांतून तो चमकलाही.
प्यार पर बस तो नही है मेरा लेकिन फिर भी
ये बता दे के तुझे प्यार करू या न करू

राही मतवाले तू छेड इक बार
जाने कब चोरी चोरी आई है बहार

या गाण्यांत त्याला पाहता येईल

अरे कमाल आहे. आत्ताच मघाशी मला फेसबुकवर हा लेख अनायसे एका ग्रुप वर वाचायला मिळाला व तिथे याच लेखावर प्रतिक्रिया देऊन आलो. इथं पाहतो तर तोच लेख Happy तर आता प्रतिसाद तोच पेस्ट करतो:
---
वाह सर जी! फार छान माहितीपूर्ण लेख. अंधारातली साथ वाचून भरून आले. तलत यांच्या रेशमी आवाजातील गाणी म्हणूनच नंतरच्या पिढ्यांनासुध्दा आवडत गेली. "जलते है जिनके लिए..." वाचता वाचता कधी गुणगुणू लागलो कळलं नाही. ही त्या आवाजाची जादू Happy सुंदर लेखासाठी धन्यवाद _/\_