टॕटू

Submitted by रंगिला on 16 May, 2022 - 19:08

तिच्या हातावर काढलेल्या टॕटू मुळे ती फारच आकर्षक वाटत होती. माझी तिची फक्त तोंड ओळख. तिच वय साधारण ३५ . अविवाहीत अशी तिची ओळख.

एका समारंभात ती भेटली आणि मी मनापासून या टॕटू प्रकाराची चौकशी तिच्या जवळ केली.

खुप दुखल असेल नाही ? असे परमनंट टॕटू करून घेताना ? ती मंद हसली.

त्या हसण्यात मला " झक मारली" असा अर्थ तिच्याकडे पहाण्यात ध्वनित होताना दिसला.

सांगना, मी जरा सलगी वाढवत तिला पुन्हा बोलायला भाग पाडले.

खुप इंटरेस्ट आहे का ? टॕटू मधे ? तीने विचारले .
सध्या तरी एखाद्या व्यक्ती ने टॕटू कोरल्यावर पहाण्यात आहे. मी तिच्या मनगटापासून जितक्या सहजपणे दिसणाऱ्या शरिराच्या भागाचे निरीक्षण करता करता त्यात कोरलेल्या चित्राच्या गुढ पणात स्वतः ला हरवुन बसलो.

मी उद्या परत टॕटू पार्लरला जाणार आहे.

मी येऊ ? लोचटा सारखे मी विचारले

जरूर तीने हसत म्हणले. हे नविन टॕटू कोरणे म्हणजे काय त्रास असतो ते कळेल.

दुसऱ्या दिवशी मी तिने सांगीतलेल्या पत्यावर तिने सांगीतलेल्या वेळेच्या आधी हजर झालो. ती आली. तिने तिची स्कुटी पार्क करून मला स्माईल दिल.

आई शप्पथ कसल जिवघेण होत ते . मी तिच्यासोबत टॕटू पार्लरमधे गेलो. हाय जानु असे म्हणत त्या पन्नाशीच्या टॕटू मास्टर ने पस्तिशीच्या अविवाहीतेला कवेत घेतले.

तेच पुरूष दैवाचे .... माझ्या मनात त्या नाट्यगीताच्या ओळी घुमू लागल्या.

हू इज धिस आॕऊट डेटेड ? माझ्याकडे तुच्छतेने पहात त्याने विचारले.

त्याच्या डोळ्यात पहात ती म्हणाली अरे तो फ्युचर कस्टमर आहे. त्याला पहायच होत कसा करतात टॕटू. मीच त्याला म्हणल ये माझ्या सोबत अस म्हणत तीने मला खुणावले.

पार्लरच्या आतल्या भागात जिथे एसी चा थंडपणा जाणवत होता तिथे तो मी आणि ती तिघेच होतो.

आपण डिझाईन हे फायनल केलय बेबी बरोबर ? चल तयार हो असे त्याने फर्मावले.

त्या बरोबर ती पाठमोरी झाली.तिने शरिरावरून टाॕप बाजुला केला . आत एक अंर्तवस्त्र आणि नितळ गोरी पाठ दिसत होती. सोबत कमरेवर आधी कोरलेले टॕटु दिसत होते.

मी पार वेडा झालो. असे वाटले मागुन हिला घट्ट पकडून तिच्या मानेपासुन ओठ टेकवायला सुरवात करावी.

बेबी , हलु नकोस असे म्हणत त्याने एक टेप्लेःट तिच्या त्या उघड्या पाठीवर फिक्स केली.
मी भारलेल्या अवस्थेत हे सगळ पहाताना विचार करत होतो की हीने मला केवळ तोंड ओळख असताना हा चान्स का दिला ?

तासाभरात पहिले सिटींग संपले आणि त्या टॕटु ची आॕऊट लाईन तिच्या पाठीवर तयार झाली.

फार त्रास नाही ना झाला बेबी असे तो प्रोफेशनली म्हणाला.

तिने नुसतीच नकारार्थी मान हलविली आणि टाॕप घातला. मग माझ्याकडे पाहिल्यावर मला दुःख तिच्या चेहेर्यामधुन ओसंडताना दिसले.

पहिल्या सिटींग चे पैसे स्मार्ट फोनवरून तिने पे केलै आणि आम्ही बाहेर आलो. या टॕटू मधे सेक्स अपिल आहे . तिच्या पेक्षा मी वयाने १५ वर्षांनी मोठा. बायको सोबत सगळ आयुष्य अंधारात केलेला माणुस. बायकोने कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घातली आहेत हे न पहाता, अंधारात ती उघडायचे कौशल्य मिळवलेला.

तिच्या कडे पहात मी म्हणले काॕफी ?

तिने त्या वेदना होत असताना मला विचारले म्हणजे डेटवर नेतो आहेस ?

मी फक्त मंद हसलो. आज काॕफी सोबत मला पहायचच होत की अजुन काय घडतय

आजवर वयाने मोठा असुन कधीच मला आदराने संबोधले नव्हते. ही या जनरेशनची रित असेल.

जवळच्या काॕफी शाॕप मधे गेल्यावर तिने मला विचारले तुला ?
मी म्हणालो कॕपेचिनो.

यापेक्षा काॕफी चा अनुभव माझ्या गाठी नव्हता. काॕफी शाॕप मधली डेट तर माझी पहिलीच.

तिने सरावलेली असल्यामुळे तिच्या स्पेशल काॕफी ची आॕर्डर दिली आणि म्हणाली तुला समजले ? टॕटू मधे काय असत ते ? माझ्या डोळ्यात डोळे घालत एक मधाळ हास्य चेहेर्यावर पसरवत तिने विचारले.

मी आता तिच्या भाषेत उत्तर दिले हो पण पुर्ण नाही. तु बोलावशील तेंव्हा सगळे समजेल.

तिलाही माझ्या बोलण्याचा नेमका अर्थ समजला.

इकडच्या तिकडच्या गप्पा मारून मी बील पे केल आणि घरी आलो.

मी गेले दोन वर्षे फ्रीलान्सर म्हणुन घरूनच काम करतो . माझे काम सुरू असताना तिचा दोनच दिवसात तिचा टेलेग्रामवर सुचक मेसेज आला, उद्या दुपारी काय करतो आहेस ?

मी लिहले मी उपलब्ध आहे. मग ये या पत्यावर असे सांगुन तिने पत्ता आणि गुगलमॕप पाठवला.

त्या मिनीटापासून मी हवेत आहे. ती आई वडिलांना सोडून एकटी का रहाते ते आता समजले.

काय कपडे घालावे ? कोणता परफ्युम तिला आवडेल या विचारात मी गढलो. दुपारपासुन रात्री पर्यंत मी बेखुदी चा अनुभव घेत होतो. रात्री झोपलो पण उद्या कधी उजाडतोय याची वाट पहात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रोचक
पुढचा भाग आहे ना?
मला उगीच वाटतं ही सुंदरी दिल चाहता है मधली ख्रिस्तीन निघेल Happy

अय्यो,
लेखकाचे नाव डबल चेक् केले, बेफी च वाटले आधी Happy

छान भाग

अय्यो,
लेखकाचे नाव डबल चेक् केले, बेफी च वाटले आधी >> +123

भाग तिसरा , चवथा आणि पाचवा सुध्दा मनात घोळत आहेत. प्रोत्साहना शिवाय टंकणे म्हणजे भुके शिवाय जेवणे, तल्लफी शिवाय घेणे .....

तुमची लेखनशैली बेफी यांच्यासारखी वाटतेय लोकांना.. आणखी काय प्रोत्साहन पाहिजे?

प्रोत्साहना शिवाय टंकणे म्हणजे भुके शिवाय जेवणे, तल्लफी शिवाय घेणे ..... >> वा वा! आता येवु द्या पुढचा‌ भाग..

तुमची लेखनशैली बेफी यांच्यासारखी वाटतेय लोकांना.. आणखी काय प्रोत्साहन पाहिजे?
>>> +७८६