मायबोलीकर मैत्रीणीशी भेट - (फोटोसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 2 May, 2022 - 10:30

अखेर, फायनली, आयुष्यात पहिल्यावहिल्यांदा ....
नुकतेच एका मायबोलीकर मैत्रीणीला भेटायचा योग आला Happy

तसे बघितले तर तुमचा अभिषेक आयडी कार्यरत असताना मायबोलीच्या वर्षाविहाराला एके वर्षी हजेरी लावली होती. आणि त्यानिमित्ताने काही सन्माननीय सभासदांशी भेटही झाली होती. पण तिथेही मी माझ्या माणूसघाण्या स्वभावाला अनुसरूनच वागलो होतो. वविला हजेरी लाऊनही तिथे मी जणू नव्हतोच. त्यामुळे टेक्निकली एखाद्या मायबोलीकराशी ठरवून भेट घ्यायची ही माझी पहिलीच वेळ. आणि आता भेट घेतलीय तर धागाही काढणारच ना. शेवटी धाग्यावेताळ आहे मी Happy

पण छे!.. असे डायरेक्ट कसे माबो मैत्रीणीचे नाव फोडणार.. त्या आधी पाल्हाळ लावणे गरजेचे. कारण हा (देखील) माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच Happy

तर, लहानपणापासून तसा मी मुलींशी बोलायला लाजणाराच. त्यात पुढे जाऊन या भित्यापाठी ईंग्लिश नावाचा ब्रह्मराक्षस आला. आणि जे मी मुलींपासून चार हात दूर राहायचो ते ईंग्लिश बोलणार्‍या मुलींपासून आठ हात दूर तोंड फिरवूनच राहू लागलो. अश्यातच माझे कॉलेजजीवन संपले.

जॉबला लागलो आणि ऑर्कुटला अकाऊंट उघडले. तो ऑर्कुटचा अखेरचा काळ होता. पण तिथे मला शोध लागला की मी मुलींशी प्रत्यक्ष बोलू शकलो नाही तरी चॅट नक्कीच करू शकतो. आणि ती फार सुंदर करू शकतो. थोडक्यात तिथे मुले मुली भेद मिटला. कालांतराने भिन्नलिंगी आकर्षणाचा फंडा काम करून गेला आणि मी मुलींशीच जास्त चॅट करू लागलो. पण तरीही प्रत्यक्ष आयुष्यात मुलींशी बोलायची बोंब कायम होतीच. अश्यात एका ऑर्कुट मैत्रीणीने समोरून पुढाकार घेतल्याने प्रत्यक्ष भेटायचा योग आला. मुळातच भाबडा बॅचलर असल्याने अगदी डेटला जातोय असे समजूनच गेलो. पण प्रत्यक्षात माझी तंतरलीच. यावरही विनोदी अंगाने ईथे लिहून झालेय.

माझी पहिली ऑर्कुट भेट.. नव्हे.. माय फर्स्ट ऑर्कुट डेट..!!
https://www.maayboli.com/node/40718

त्यानंतर असला आगाऊपणा कधीच करायचा नाही असे ठरवले. पण योग जुळून येतात तेव्हा भोग भोगावे लागतात.

वर्षभराने दुसर्‍या एका ऑर्कुट मैत्रीणीशी भेटायचा योग आला. त्या भेटीआधीच आमची घट्ट मैत्री जुळली होती. त्यामुळे ती भेट फर्स्टक्लास झाली. तीन प्रत्यक्ष भेटीनंतर तिने माझ्याशी लग्न करायची ईच्छा व्यक्त केली. त्यानंतर तीन महिने सतत भेट घेतल्यानंतर मी सुद्धा अखेरीस तिला होकार दिला. आज (तिच्या) दुर्दैवाने ती माझी बायको आहे.

पुढे आमच्या लग्नात बरेच ऑर्कुट मित्रमैत्रीण आले, काहींसोबत पिकनिकलाही जाणे झाले, त्यात मजाही आली. पण पुढे ऑर्कुटचा बाजार उठला आणि मी मायबोलीवर ऋन्मेष बनून अवतरलो.

तुमचा अभिषेकचे लग्न झाले असल्याने ऋन्मेष आयडीला मी गर्लफ्रेंड दिली. जेणेकरून तो कमिटेड आहे हे क्लीअर व्हावे. आयडीची गुप्तताही पाळायची होती. तसेच डुआयडी वापरून कोणाशी खोटे देखील बोलायचे नव्हते. त्यामुळे मायबोलीवर ईतकी सक्रियता दाखवूनही मी कधी ऋन्मेष आयडीतून कोणाशी वैयक्तिक संवाद साधायला गेलो नाही. कोणाशीही घनिष्ट वा कुठलेही वैयक्तिक संबंध बनवायला गेलो नाही. परीणामी ऋन्मेष म्हणून ईथे वावरताना कोणाशी प्रत्यक्ष भेट व्हायची शक्यता जवळपास शून्य होती.

मग हळूहळू ऋन्मेष हाच तुमचा अभिषेक हे लोकांना समजत गेले. काही मायबोलीकर माझे फेसबूकवर फ्रेंड झाले. तर काही व्हॉटसपवर आले. पण मुळातच माझा स्वभाव जसा आहे ते पाहता कोणाशी भेटीगाठीचा योग चटकन येत नव्हता. नाही म्हणायला फार वर्षांपूर्वी एकदा वर्षूदीला भेटायला जाणार होतो. तिनेच गेटटूगेदर ठेवले होते. पण ऐनवेळी अर्जंट काम निघाले. आणि तो योगही बारगळला. ऋन्मेषची एखाद्या मायबोलीकराला ठरवून भेटायची पाटी कोरीच राहिली.

त्यात मी मायबोलीवर ईतके किडे करत वावरणार की ईथे आपल्याबद्दलचे मत कधी कोणाचे काय असेल आणि ते कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळे एखाद्या मायबोलीकराशी ठरवून भेट घ्यावी हे मी माझ्या बकेट लिस्ट मध्ये कधीच अ‍ॅड केले नाही.

आणि अश्यातच एके दिवशी फटा पोस्टर निकली हिरोईन स्टाईल तिने मायबोलीवर एंट्री मारली! Happy

मायबोलीवर कोणीही नवीन आयडी (अर्थातच जेन्युईन) आला तर मला आनंदच होतो. जसे ते घरातल्या अवलीगिरी करणार्‍या लहान मुलाला पाहुणे आलेले बघून आणखी चेव येतो अगदी तसे. नवीन वाचक, नवीन प्रतिसादक मायबोलीवर येतील तरच धागे काढण्याला अर्थ आहे असे मला वाटते. अश्यात नवीन सभासद देखील प्रतिसाद द्यायची आणि धागा काढायची आवड राखून असतील तर आणखी आनंद होतो. कारण लिहिणारे आहेत तोपर्यंत आपल्या आवडत्या मायबोलीचे चक्र चालू आहे. आयुष्यातला आनंद कायम आहे Happy

पण ती वेगळी होती. त्यामुळेच ती मला माझ्यासारखी वाटली. तिच्या एका धाग्यातील लिखाणाची शैली बघून तिला कोणीतरी चटकन `लेडी ऋन्मेष' म्हटले आणि आपल्यातील वेगळेपणातही काहीतरी साम्य आहे याची खात्री पटली. पुढे हळूहळू कासवाच्या गतीने बोलणे होऊ लागले, ओळख वाढू लागली, फेसबूक आणि व्हॉटसप चॅट / स्टेटस मधून तिच्याबद्दल आणखी समजू लागले तसे आणखी बरेच गोष्टीत साम्य आढळून आले. मैत्रीची केमिस्ट्री जुळू लागली.

मायबोली व्यतिरीक्त पर्सनल गप्पाही होऊ लागल्या. पण ठरवले असते तरी भेटणे शक्य नव्हते. कारण ती अमेरीकेत तर मी भारतात. आणि मुळात तसे ठरवून भेटायची गरज दोघांनाही भासत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी जेव्हा ती भारतात आली, ते ही नवी मुंबईत, म्हणजे अगदी माझ्या बिल्डींगसमोरून, माझा घरासमोरून रिक्षाने पास झाली.. तेव्हाही फक्त "आपला ऋन्मेष ईथे राहतो बरं" अशी मनातल्या मनात म्हणत गेली... भेटावे असे दोघांनाही वाटले नाही.
चॅटवर औपचारीक बोलणे तेवढे झाले ..

अरे आज मी तुझ्या बिल्डींगसमोरून गेले..

अच्छा, मग कॉल करायचा ना, घरीच आली असतीस..

अरे, म्हणजे रिक्षात होते..

ओके पुढच्यावेळी नक्की येशील..

हो शुअर....
-------------

ईतके मिळमिळीत बोलणे झाले Happy

त्यानंतर काळ पुढे सरकला. मैत्रीतील घनिष्टता वाढली. तसे तिच्या यंदाच्या भारतभेटीत तिला हक्काने विचारले, यावेळी ईकडे येणे झाले तर नक्की भेटशील... आणि अपेक्षेप्रमाणे ती तयार झाली.

पण एक प्रॉब्लेम होता. गेले वर्षभरात आमच्या नवीन घरात कोणी पाहुणे आल्याचे आठवत नाही. पोरांनी घराची अशी हालत केलीय की आम्हीही कोणाला आवर्जून घरी बोलावत नाही. त्यात ही बाई, ऊप्स सॉरी, तिला आवडत नाही बाई म्हटलेले, तर ही मुलगी अमेरीकेहून येणार, तिला काय पोरांनी रंगवलेल्या सोफ्यावर बसवणार...

पण सुदैवाने तिने घरात भेटायला मला ऑकवर्ड वाटतेय म्हणत बाहेरच धावती भेट घेता येईल का म्हणून विचारले आणि मी उगाचच खट्टू झाल्याचे दाखवत आनंदानेच बाहेर भेटायला तयार झालो.

चॅटवरचे बोलणे वेगळे आणि प्रत्यक्षातले वेगळे हे मला अनुभवाने चांगले ठाऊक होते. प्रत्यक्षात माझ्या तोंडून शब्दही फुटणार नाही हे देखील माहीत होते. त्यामुळे विचार केला की सोबत लेकीला न्यावे. आपली जीभ थिजली तरी लेकीची टकळी चालू राहील आणि एकदाची भेट पार पडेल.

हो, एकदाची भेट पार पडेल ईतपतच उत्सुकता मनात होती. मला कुठल्याही सोमिमित्राशी भेटायला धाकधूकच वाटते. म्हणजे आपली सोशलसाईटवरच्या आभासी जगात झालेली एक ईमेज असते. त्यानुसार कोणी भेटायला आले आणि त्याला तसा मी आढळलो नाही तर त्याला पचका झाल्यासारखे नाही का वाटणार हा विचार मनात येतोच.

असो,

ऐनवेळी ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी तिचा फोन आला. ती आमच्या ईथे नाक्यावर पाचच मिनिटात पोहोचत होती. तुला यायला जमेल का विचारत नव्हती, तर पाचच मिनिटात येच म्हणत होती. लेक कुठेतरी खेळायला गायब होती. माझे वर्क फ्रॉम होम नुकतेच आटोपले होते. आंघोळ करायची बाकी होती. पण आता तोंड धुवायलाही वेळ नव्हता. टीशर्ट अंगावर चढवतानाच चेहर्‍यावर पाण्याचे चार हबकारे मारले. त्यात केसही ओले झाले. ते तसेच बोटांच्या कंगव्याने विंचरले. घरी कोणाला काही सांगायचे टाळले. कारण पुन्हा तिचे नाव गाव फळ फूल सांगण्यात चार मिनिटे खर्च झाली असती. त्यामुळे थेट घड्याळ घातले, पाकिट घेतले, जे रिकामेच होते. त्यामुळे स्वतःवरच चरफडत शूज चढवले. त्याआधी सॉक्स स्वच्छच आहेत हे वास घेऊन चेक करायला विसरलो नाही. शू लेस बांधायचे काम लिफ्टमध्येच उरकले. लिफ्टमधून बाहेर पडल्यावर लॉबीमधील आरश्यासमोरून चालता चालताच पुन्हा एकदा बोटांनी केस सेट केले आणि एका मायबोलीकर मैत्रीणीच्या पहिल्या भेटीसाठी सज्ज झालो Happy

लांबूनच तिला पाहिले आणि छातीतील धडधडीवर नियंत्रण ठेवत तिला सामोरे गेलो, पण भेट झाल्यावर मात्र धडाधड सारे अंदाज चुकत गेले. सुरुवातीच्या दोनेक मिनिटात काय बोलावे आणि काय करावे, की नुसतेच हसावे हे न समजल्याने कुछ कुछ होता है मधील राहुल-अंजलीच्या समर कँप भेटीचा सीन कॉपी करून झाला. पण त्यानंतर मात्र कुठलीही बास्केटबॉल मॅच न खेळता तिसर्‍याच मिनिटापासून आम्ही व्यवस्थित न लाजता बोलू लागलो. दहा मिनिटांची धावती भेट घ्यायची असे ठरवले होते. पण गप्पांच्या विषयात शाहरूख, मायबोली, माझे वाढलेले केस, दाढी आणि डु आयडी असे सारेच विषय माझ्या आवडीचे आल्याने अर्धा तास उभेउभेच बोलण्यात गेला. पायाला तड लागली तसे कुठेतरी बसून गप्पा मारूया म्हणत मिनी सी शोअर गाठले.

उन्हाळ्यातल्या संध्याकाळी थंड वार्‍याची झुळूक, लोकांनी गजबजलेला तरीही शांत स्वच्छ परीसर, क्षितिजापर्यंत जाणारी नजर, हातात भेळ, समोर जलाशय आणि मित्रांसोबत कट्ट्यावर बसून मारलेल्या गप्पा. मला ही जागा नेहमी माझे दुसरे घरच वाटत आलेय. जसे मुंबईत आलेल्या माझ्या मित्रांना मी माझगावचा डोंगर फिरवून आणतो तसे ईथे मला भेटायला आलेल्या मित्रांना मी नेहमीच आमचे सी शोअर दाखवतो. छान सुर्य मावळेपर्यंत गप्पा मारू शकतो. त्यानंतर कंपलसरी कट्टा खाली करावा लागतो. नाहीतर मच्छर जमतात आणि गेटटूगेदर होते Happy

पण हो, तिथेही माझ्या अपेक्षांना तडा जात आमच्या छान गप्पा झाल्या. कारण विषय पुन्हा आपले तेच. या मायबोलीमुळे एक बरे होते, मुलगी अमेरीकेहून आली असली तरी मायबोलीचा धागा जुळल्याने शुद्ध मराठीतच बोललेले चालणार होते. त्यामुळे एकदा रंगात येताच मला शब्दांचा तुटवडा पडणार नव्हता. त्यातही ती जशी आजवरच्या ऑनलाईन भेटींत जाणवली, प्रत्यक्षातही तशीच निघाल्याने एखाद्या नवख्या मुलीशी पहिल्यांदाच भेटतोय असेही वाटले नाही. फक्त दिसायला तेवढी फोटोपेक्षा सुंदर होती. म्हणजे आतिशयोक्तीच करायची झाल्यास माधुरी दीक्षित लग्नानंतर अमेरीकेला गेल्याने भारतीयांचे जे मोठे नुकसान झाले त्यानंतर हेच Happy

अर्थात ईथे महाराष्ट्र सरकारचे आभार मानायला हवेत. कोरोनचे निर्बध शिथिल केल्याने आता मास्क घालायची गरज उरली नव्हती. अन्यथा सातासमुद्रापारची भेट होऊनही मास्कच्या आडूनच दर्शन घ्यावे लागले असते.

दहापंधरा मिनिटाच्या भेटीचे दिडदोन तास झाले पण गप्पांनी मन भरले नव्हते. आणि कुठलीही भेट जेव्हा अपुर्णच राहिली असे वाटते तेव्हा समजावे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त... क्यों की हम एक बार जिते है, एक बार मरते है, प्यार भी एक ही बार करते है... पर दोस्त हजार करते है, और उनसे बार बार मिलते है Happy

थोडक्यात नशीबात अजून एका भेटीचा योग लिहिला होता...

पहिली भेट माझ्या ईलाक्यात झाली तर दुसरी तिच्या, म्हणजेच ठाण्याला ठरली.

या भेटीला खरे तर दोघांनी एकमेकांच्या मुलांना सोबत आणायचे ठरवले होते. कारण दोघेही आपापल्या मुलांसोबत रमणारे जीव. आणि दोघांनाही मुलांचे फोटो स्टेटसला टाकायची भारी आवड. हे वर उल्लेखलेले एक साम्य म्हणू शकता. पण त्यामुळे दोघे एकमेकांच्या मुलांना छान ओळखू लागलो होतो. त्यांना भेटायची उत्सुकता होती. पण नेमके त्याच विकेंडला माझी मुले महाबळेश्वरला गेली असल्याने ते राहिलेच. माझ्या मुलांसाठी तिने आणलेल्या गिफ्ट्स मग मीच स्विकारल्या. हो, तिने माझ्या मुलांसाठी चक्क भेटवस्तू आणल्या होत्या. हे माझ्यासाठी नक्कीच सरप्राईजिंग होते. असले काही मुलींनाच सुचू शकते. मी मात्र आपली भेट हीच भेटवस्तू म्हणत सोबत साधे चॉकलेटही नेले नव्हते..

दोघेही घरून भरपेट जेऊन आल्याने दोघांनाही भूक शून्य होती. पण तरीही आपल्याकडे भेटीगाठी गेटटूगेदर हॉटेलातच करायची पद्धत असल्याने तिनेच सुचवलेले एक हॉटेल गाठले. एक प्लेट कांदाभजी आणि मसाला ताक ऑर्डर केले.

यावेळी गप्पांचे विषय वाढले होते. समोरच्या टीव्हीवर सुरू असलेल्या आयपीएल मॅचपासून ते अमेरीकेतल्या आयुष्यावर बोलू काही म्हणून झाले. पोरांचे कौतुकच नाही तर ती छळतातही कशी याबाबतच्या सहवेदना वाटून घेतल्या. सासरच्या लोकांबद्दल केले जाते ते टिपिकल गॉसिप करून झाले. आपापल्या जॉबबाबत समोरच्याला टेक्निकली समजो न समजो चार गोष्टी सांगितल्या गेल्या. ठाणे आणि नवी मुंबई या शहरांबद्दलच्या चांगल्यावाईट मतांची देवाणघेवाण झाली. त्यात एकमताने नवी मुंबईला विजयी घोषित केले. थोड्याफार बालपणीच्या आठवणीही शेअर केल्या. आणि सरतेशेवटी आपली मैत्री मायबोलीमुळेच झाली म्हणून तिचेही आभार मानले गेले.

दुसरी भेट ही नेहमीच स्पेशल असते. पहिली भेट चला भेटूया म्हणून झाली असते. तिथे समोरच्याला केवळ चाचपले जाते. त्यात पुन्हा भेटावीशी व्यक्ती वाटली तरच ठरवून दुसरी भेट होते. जर ती झाली नाही तर हे मैत्रीचे नाते केवळ ऑनलाईनच होते असे समजण्यास वाव असतो.

मला पर्सनली ही भेट महत्वाची वाटली, कारण मी जरी कितीही म्हणत असलो की मायबोली हे मला माझे दुसरे घरच वाटते, तरी ऋन्मेष म्हणून ईथे वावरताना त्यामागच्या अभिषेक या व्यक्तीला कोणी कसलाही चांगला वाईट पूर्वग्रह न ठेवता एखाद्या मायबोलीकर मित्राला भेटावे तसे भेटू शकते का याबाबत मनात एक शंका होती. पण तसे होऊ शकते हा विश्वास या भेटीने दिला. कदाचित एक अढी समोरच्याच्या नाही तर माझ्याच मनात असावी ती निघाली. जे मी आता सहजपणे एखाद्या मायबोलीकराला भेटू शकतो. मला कल्पना आहे की असे म्हटल्याने लगेच काही मला भेटायला लाईन लागणार नाही Wink पण यापुढे मायबोलीवर वावरताना एक वेगळा आणि छानसा उत्साह नक्कीच माझ्यात असेल, आणि त्याबद्दल या मायबोलीकर मैत्रीणीचे आभार तर मानायलाच हवेत Happy

अरे हो, तिचे नाव घ्यायची तर गरज नाही. ते तुम्ही ओळखलेच असेल. पण आता ऋन्मेष जे लिहितो त्यावर शंका घ्यायची आपल्याकडे एक पद्धत आहे. त्यामुळे तिच्यासोबत एक सेल्फीही काढला. पण परवानगीशिवाय तो ईथे टाकू शकत नाही. त्यामुळे तुर्तास या कांदाभज्यांवरच समाधान मानूया. चला या, उचला एकेक Happy

IMG_20220502_053957.jpg

परवानगी मिळाल्याने फोटो धाग्यात अपडेटतो Happy

IMG_20220531_014001.jpg

धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसती कांदाभजी ?

नक्की म्हाळसा होती का ?

ती तर किमान चार डिशेस बनवते

ती तर किमान चार डिशेस बनवते >> Lol सरांच्या घरी गेली असती तर सरांनी ५ - ६ डीश बनवून घेतल्या असत्या त्यामुळेच बाहेर भेटली Wink

पावसाळ्यात पावसाळी सम्मेलन असते,

त्याआधी दादरला टी शर्ट वाटप असते.

तिथे मायबोलीकर एकदम होलसेलमध्ये भेटतात

नुसती कांदाभजी?
>>>

दोन्ही भेटीत मिळून खाल्ले बरेच काही. जसे की,
कांदाभजी
मसाला छास
पावभाजी
ग्रिलड सॅंडवीच
वेज थाली विथ स्पेशल गुलाबजाम Happy

पण फोटो केवळ कांदाभजी आणि मसाला छासचा आलाय. तो देखील त्यांच्या नशीबाने आला. कारण मुद्दाम काढलेला नसून भेटीची आठवण म्हणून आमचे फोटो काढताना टेबलावर त्यांची उपस्थिती होती. त्यातूनच क्रॉप केलाय Happy

सर्वांचे मनापासून धन्यवाद Happy
मी मायबोलीवरच्या शंभर जणांना शंभर वेळा भेटावे आणि प्रत्येक भेटीचा एक शतकी धागा निघावा हिच ईश्वराकडे प्रार्थना _/\_ Happy

कांदाभजी अशी प्लेट मधे खातात होय ?
मस्त कागदावर घेऊन मिर्ची आणि फोल्ड मारलेली चटणीची पिशवी अशी थोडी अडचण करून खाण्यातच मजा येते. Happy

कांदाभजी अशी प्लेट मधे खातात होय ?
मस्त कागदावर घेऊन मिर्ची आणि फोल्ड मारलेली चटणीची पिशवी अशी थोडी अडचण करून खाण्यातच मजा येते.
>>> हो आणि खाली पायाजवळून झुरळे फिरत असतील तर अजूनच जास्त फील येतो...

इथे तर धमाल सुरु आहे.
त्या माबोकर मैत्रिणीपेक्षा भज्यांचीच चर्चा जास्त दिसते.
<<मी मायबोलीवरच्या शंभर जणांना शंभर वेळा भेटावे आणि प्रत्येक भेटीचा एक शतकी धागा निघावा हिच ईश्वराकडे प्रार्थना>>
त्या शंभर भाग्यवंतांची लिस्ट कधी प्रसिध्द करणार? सोडत काढणार की जो पहिला त्याचा नंबर की तुम्ही तुमच्याच अवतारांना भेटणार?

रानभुली हो.. कांदाभजी तशीच खायला आवडते. पण त्याला मग सोबत छान मुसळधार पडून गेलेला पाऊसही हवा Happy

बाकी चव छान होती कांदाभजीची. मी पार्सल घरीही घेऊन आलो आणि दोन दिवस पुरवून खाल्ली. हॉटेलचे नाव विसरलो. म्हाळसा सांगू शकेल.

त्या शंभर भाग्यवंतांची लिस्ट कधी प्रसिध्द करणार?
>>>
छे हो, आज सहासात वर्षात एका कोणाशी भेट झालीय. आता चौदा वर्षांने दुसऱ्या कोणाशी होईल. ते तर मी असेच शंभरला शंभर आकडा जुळवला. एवढा वेगात गेलो तर धृतराष्ट्रानंतर मीच नाही का Happy

ऋ सर ,
आपण एक गटग करू की. तुम्ही, भभा, अर्चनाजी, मी. मायबोलीला जळवता येईल. आपण सगळे स्वतंत्र आहोत हे पण सिद्ध होईल.

मी माझे जीन्समध्ये खोचलेले पाकिट काढून त्यातून रुपये पैसे नोटा चिल्लर मोजेपर्यंत ती चटकन एखाद दुसरा डॉलर काढून कीप द चेंज बोलून मोकळी व्हायची.
मी पार्सल घरीही घेऊन आलो आणि दोन दिवस पुरवून खाल्ली. >>>> अरे काय हे!! मऊ लागलं म्हणून कोपराने खणू नये... Lol जाऊ दे, हर एक फ्रेंड जरूरी होता है म्हणा... . बॅगचा फोटो तिला चालत असेल तर जरूर देणे. उगाच बॅग काय फॅशनची होती त्याची उत्सुकता.
मूळ मुद्दा लिहायला आले ते विसरले - म्हाळसा, १०० प्रतिसाद झाले बरं. आता कांदा भजी कशी होती ते सांग...

@ सीमंतिनी,
मी असे कोणाला कधी भेटायला वगैरे जात नसल्याने मला अश्या प्रसंगांची सवय नाही. म्हणजे फॅमिलीसोबत असताना बिल समोर आल्यानंतरच आपण खिश्यातून पाकिट काढतो. रिक्षाही पुर्ण थांबल्यावर मीटरमध्ये किती झाले हे बघूनच मग चिल्लर मोजायला घेतो. पण दुसरे कोणी सोबत असताना आधीच पैसे काढून ठेवावे हे लक्षात यायचे नाही. हे मी तिला बोल्लोही. तर तीच म्हणाली. डोन्ट वरी, मीच खर्च करते. मी डॉलरमध्ये विचार करते. आता जॉबलाही लागलेय. महिन्याला अमुकतमुक डॉलर मिळतात वगैरे वगैरे.. ठिक आहे म्हटले. उगाच कश्याला विषय वाढवून रुपयाचे आणखी अवमूल्यन करा Happy

बाकी म्हाळसा आपला कांदाभजी वृत्तांत आता विकेंडलाच लिहेल म्हणतेय. थोडे थोडे म्हणता ईथे बरेच डॉलर खर्च झाल्याने सध्या ते कमवायच्या मागे आहे Happy

मीन अ व्हाईल मी बॅग शोधून फोटो काढून डकवतो ईथे.. Happy

बाकी म्हाळसा आपला कांदाभजी वृत्तांत आता विकेंडलाच लिहेल म्हणतेय. थोडे थोडे म्हणता ईथे बरेच डॉलर खर्च झाल्याने सध्या ते कमवायच्या मागे आहे>> इतके डिटेल्स दिलेच आहेत तर एक काम कर, माझ्या वाट्याचा वृत्तांतही लिहून टाक

माझ्या वाट्याचा वृत्तांतही लिहून टाक >>> चालतंय की.. पण जर मी लिहीला तुझ्यावतीने तर त्यात माझेच भरभरून कौतुक लिहिले जाईल. त्यापेक्षा तूच प्रामाणिक लिही Proud

बाई दवे,
बॅगचा फोटो खालीलप्रमाणे Happy

IMG_20220519_192222.jpg

अरे काय लावलंय राव !
मी टाकू कि तू टाकतो, तू टाकतोस कि मी टाको.
कुणीतरी टाको आता जल्दी. भज्याच तो बनाना है ना ? इतका हमकु बंडगार्डन के अण्णा ने भी कभी ताटकळके नही ठेव्या था. ये पहले आप पहले आप मे भजी का कोबी बन जायेगा. अब तुम टाको कोई तो, नही तो हमिच्च टाकेगा फिर नही बोलना कि पहले नही बोला था. फिर सहन करना पडेंगा.

शामा.. आयडीया भारी आहे.. मी वृतांन्ताची सुरूवात करून देते.. पुढे ज्याला वाटेल त्याने हवेतसे वळण द्या

अभी तो फुलेरा मे है. रिंकी को देखने लडकेवाले आये है. सचिव जी की नशामुक्ती कि गाडी के ड्राईव्हर ने टुन होकर गाडी पेड अर चढा दी है. लडके को लडकी मॉडर्न चाहिए. आप आप वाली नही चाहिए. बहुत समस्याएं है भई. अभी आप जो है, शुरू करो, हम ये सब निपटा कर यहा आ जाते है थोडी देर में.
का करे अब. सब जगह देखना पडता है.

@म्हाळसा,
बाद में ना केहना बेबी पहले देदू वॉर्निंग
पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग

अरे फिकर नॅाट-
नाच नाच के तोड दो सॅंडल
दोस्त मेरा करलेगा हॅंडल Proud

हो बिलकुल,
डर ने की क्या बात है
सब पे अपना राज है

१०० प्रतिसाद झाले तरी....
ये तो बस शुरुवात है
अभी तो पार्टी.........

कांदाभजीचा बिल कोणी भरला, हे नाही लिहिलं .... आणि इतर लोक भेटतील तेव्हा सेम मेनु असेल का? आणि आत्ता जर तूच भरला असेल तर तेव्हाही तूच भरणार का? नाही म्हणजे त्याप्रमाणे लिस्ट कमी जास्त होऊ शकते ना?

अहो सुर्या लिहिलेय की प्रतिसादात एवढे रामायण त्या बिलावरून..
मी नाही भरले बिल Happy

बाकी आपण भारतीय भारतीय भेटणार असू तर तू तू मै मै करून बिल भरू
जर अमेरीकन पार्टी असेल तर मात्र तिला कापू Happy

Pages