तलाव

Submitted by Rajkumar Jadhav on 27 April, 2022 - 22:49

घन गर्जती तडित चमकती
पवन भरारे दिशा न उरती
गाईगुरे ती घरी परतती
पक्षी पिलेही घरट्यात जाती
वृक्ष लता आलिंगन घेती
फुला फळांचे सडे विखरती
उघडूनी बाष्पाची भांडारे
पर्जन्याच्या राशी सांडती
अमोल दौलत निसर्गाची
ओढे-नाले उधळूनी देती
एक तलाव शांतपणे
साठवून ठेवी सगळे
स्वतः बुडोनी जगास तारी
परोपकार भरला चित्ती

- राजकुमार जाधव

एखाद्या तलावासारखं मोठ्ठ मन असणारी परोपकारी वृत्तीची माणसं संकटांची किंवा होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता आपले कर्तव्य समजून इतरांना मदत करत राहतात.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users